नवी दिल्ली, 2 जानेवारी: मंत्रालयात (
Ministry) काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याचा (
Officer) व्हॉट्सअप नंबर (
Whatsapp number) हॅक (
Hack) करून पैसे लुटण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या एका टोळीला (
Gang) पोलिसांनी अटक (
arrested) केली आहे. नागरिकांचे व्हॉट्सअप नंबर हॅक करायचे आणि त्या नंबरवरून त्याच्याच कॉन्टॅक्ट लिस्टमधील इतरांकडै पैशांची मागणी करायची, अशी मोडस ऑपरेंड त्यांनी राबवली होती. त्यामुळे अनेकजण व्हॉट्सअपवरून येणारे मेसेज हे त्याच व्यक्तीचे समजून पैसेही देत असत. मात्र दिल्ली पोलिसांनी कारवाई करत गुन्हेगारांना पकडलं आहे.
अशी झाली लुबाडणूक
दिल्लीतील रस्ते वाहतूक विभागात काम करणाऱ्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा व्हॉट्सअप नंबर हॅक करण्यात आला होता. त्या नंबरवरील त्याचा डीपीदेखील बदलण्यात आला आणि त्या नंबरवरून त्याच्या काही कॉन्टॅक्ट्सना पैशांची मागणी कऱणारे मेसेजेस पाठवायला सुरुवात झाली होती. अनेक प्रयत्न करूनही त्यांना स्वतःचं व्हॉट्सअप वापरता येत नव्हतं. मात्र आपल्या नंबरवरून इतरांना मेसेजस पाठवले जात आहेत, हे मात्र लक्षात येत होतं.
घेतली पोलिसांत धाव
या अधिकाऱ्यांनी पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी तातडीनं तपास सुरू करत टेक्निकल सर्व्हिलान्स आणि लोकेशन यांच्या आधारे आरोपींचा पत्ता शोधून काढला. त्यानंतर तिथं धाड टाकत गुन्हेगारांना अटक केली. दोन्ही गुन्हेगार हे नाजयेरियन नागरिक असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. दिल्लीतील एका इमारतीत ते चोरून राहत होते आणि तिथूनच हा गोरखधंदा करत होते. पोलिसांनी आता त्यांच्या मुस्क्या आवळल्या आहेत.
हे वाचा-
16 वर्षांपूर्वी झालेला विवाह हायकोर्टाने केला रद्द; लग्नापूर्वी लपवली ही गोष्ट..
शिक्षिकेलाही लुटलं
याच सायबर दरोडेखोरांनी रायबरेलीत राहणाऱ्या एका शिक्षिकेलाही गंड घातला होता. शिक्षिकेकडून त्यांनी तब्बल 40 लाख रुपये लुटले होते. Okou Chistian आणि Labaye ke Justin या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. अधिक तपास सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.