रांची, 2 जानेवारी: आपल्यापेक्षा आपल्या धाकट्या भावावर (Younger brother) वडील (Fahter) अधिक प्रेम (Love) करतात आणि संपत्तीतील हिस्साही (Property) त्यालाच देतात, याचा राग (Anger) मनात खदखदत असलेल्या तरुणाने आपल्या वडिलांनी धारदार शस्त्राने हत्या (Murder) केली. दोन भावांपैकी वडील धाकट्या भावावर अधिक जीव लावत असत. संपत्तीतील जास्तीत जास्त वाटा त्याला देत असत, असा आरोप थोरल्या भावाने केला आहे.
अशी घडली घटना
झारखंडमधील गोड्डा भागात राहणाऱ्या चुन्नी यादव यांना दोन मुलं आणि चार मुली होत्या. त्यापैकी थोरला मुलगा सुबोध यादव हा गेल्या काही वर्षांपासून वडिलांवर नाराज होता. वडिलांनी अनेकदा त्यांच्या संपत्तीतील हिस्सा विकला होता आणि त्याचा मोठा वाटा ते लहान मुलाला देत असत. त्यामुळे वडील आपल्यासोबत दुजाभाव करत असल्याची खदखद सुबोधच्या मनात होती. आपल्यावर होत असलेल्या या अन्यायाला वाचा फोडण्याचा निर्णय त्याने घेतला होता.
वादानंतर खून
घटनेच्या दिवशी याच विषय़ावर सुबोध आणि त्याचे वडील चुन्नी यादव यांच्यात कडाक्याचं भांडण झालं. त्यानंतर धारदार शस्त्र घेऊन सुबोधनं आपल्या वडिलांच्या गळ्यावर वार केले. घाव वर्मी लागल्यामुळे चुन्नी यादव यांचा मृत्यू झाला.
हे वाचा -
पोलीस कारवाई सुरू
पोलिसांनी आरोपी सुबोधला अटक केली आहे. आपणच खून केल्याची कबुली त्याने दिली असून धाकट्या भावाला अधिक संपत्ती देण्याच्या रागातून आपल्या हातून हे कृत्य घडल्याचं त्यानं म्हटलं आहे. वडिलांकडे असणाऱ्या जमिनीपैकी बरीचशी जमीन ही आईच्या श्राद्धासाठी त्यांनी विकली होती. त्यातील उरलेले पैसेही धाकट्या भावालाच दिले होते. आपल्याला आणि इतर बहिणींना ते काहीही देत नसत, अशी त्याची तक्रार होती. पोलिसांनी सुबोधविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.