मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Goat Milk : कोरोनापासून बचाव करू शकतं शेळीचं दूध? काय सांगतात तज्ज्ञ पाहा

Goat Milk : कोरोनापासून बचाव करू शकतं शेळीचं दूध? काय सांगतात तज्ज्ञ पाहा

Goat Milk : महासाथीशी लढण्यासाठी लोकांनी कोरोना प्रोटोकॉलचे पालन करण्याबरोबरच प्रतिकारशक्ती वाढवण्यावर विशेष लक्ष दिले पाहिजे. शेळीचे दूध हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवत असल्याचं आढळून आलं आहे.

Goat Milk : महासाथीशी लढण्यासाठी लोकांनी कोरोना प्रोटोकॉलचे पालन करण्याबरोबरच प्रतिकारशक्ती वाढवण्यावर विशेष लक्ष दिले पाहिजे. शेळीचे दूध हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवत असल्याचं आढळून आलं आहे.

Goat Milk : महासाथीशी लढण्यासाठी लोकांनी कोरोना प्रोटोकॉलचे पालन करण्याबरोबरच प्रतिकारशक्ती वाढवण्यावर विशेष लक्ष दिले पाहिजे. शेळीचे दूध हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवत असल्याचं आढळून आलं आहे.

नवी दिल्ली, 01 डिसेंबर : कोरोना विषाणूचे (Corona Virus) संकट आजही जगावर घोंगावत आहे. भारतात दुसरी लाट जवळपास ओसरली असली तरी दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या कोरोनाच्या नव्या अवताराचा धोका सर्वांनाच सतावत आहे. या महासाथीशी लढण्यासाठी लोकांनी कोरोना प्रोटोकॉलचे पालन करण्याबरोबरच प्रतिकारशक्ती वाढवण्यावर विशेष लक्ष दिले पाहिजे. शेळीचे दूध (Goat milk) हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासोबतच डेंग्यू-कोरोनासारख्या (Goat milk and corona) आजारांवरही प्रभावी असल्याचं आढळून आलं आहे.

कोरोनापासून बचाव करण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी बकरीचे दूध पिण्याचा सल्ला दिला आहे तो कानपूरच्या  चंद्रशेखर आझाद कृषी विद्यापीठाचे चंद्रकेश राय यांनी.  झी न्यूजने दिलेल्या बातमीनुसार वेब दुनियाशी बोलताना डॉ. चंद्रकेश राय म्हणाले होते की, जर लोकांनी रोज 240 ग्रॅम शेळीचे दूध उकळून प्यायला सुरुवात केली तर त्यांची प्रतिकारशक्ती लक्षणीयरीत्या वाढू शकते.

आज आपण शेळीच्या दुधाचे फायदे जाणून घेऊया.

शेळीच्या दुधाचे फायदे

हाडे मजबूत होतात

AA.com या न्यूज वेबसाइटच्या माहितीनुसार, बकरीच्या दुधात कॅल्शियम मुबलक प्रमाणात असते. यामुळे बकरीचे दूध सेवन केल्याने शरीरातील हाडे मजबूत होतात. त्यात काही प्रमाणात मॅग्नेशियम आणि फॉस्फरस देखील असतो. हाडे निरोगी ठेवण्यासाठी फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम एकत्र काम करतात. यामुळे माणूस तंदुरुस्त राहतो.

पचायला सोपे

गाई-म्हशीच्या दुधापेक्षा शेळीच्या दुधात लॅक्टोज कमी असते. गायीच्या दुधात आणि त्यापासून बनवलेल्या पदार्थांपेक्षा त्याच्या दुधात आढळणारे प्रथिने पचायला सोपे असतात. शेळीचे दूध प्यायल्याने पोट निरोगी व स्वच्छ राहते. यासोबतच पोटाशी संबंधित आजारांपासूनही सुटका मिळते.

हृदय निरोगी ठेवते

बकरीचे दूध हृदयासाठी खूप फायदेशीर मानले जाते. एका संशोधनानुसार, या दुधात मॅग्नेशियमचे प्रमाण चांगले आहे. हे मॅग्नेशियम हृदयाचे ठोके योग्य ठेवण्यासाठी उपयुक्त ठरते. शेळीच्या दुधात कोलेस्टेरॉलचे प्रमाण खूप कमी असते. यामुळे हृदय आणि धमन्या योग्यरित्या काम करण्यास देखील ते खूप मदत करते.

मजबूत केस

आजकाल केस गळणे किंवा कोंडा ही एक सामान्य समस्या बनली आहे. मात्र, यावरील उपाय बकरीच्या दुधात दडलेला असतो. संशोधनानुसार, शेळीच्या दुधात व्हिटॅमिन-ए आणि व्हिटॅमिन-बी देखील असते. ही दोन्ही जीवनसत्त्वे केसांच्या मुळांना मजबूत करण्याचे काम करतात. त्यामुळे डोक्याचे केस सहजासहजी गळत नाहीत.

हे वाचा - Sleep Disorders : तुम्हालाही झोपेत बडबडण्याची सवय आहे का? जीवनशैलीत असा बदल ठरेल गुणकारी

शेळीच्या दुधाचे तोटे

शेळीच्या दुधाचे अनेक फायदे आहेत आणि काही तोटेही. त्याचे सेवन बाळांसाठी हानिकारक असू शकते. विशेषत: एक वर्ष किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी. शेळीच्या दुधात फॅट असते, ज्यामुळे लठ्ठपणा वाढू शकतो. दुग्धजन्य पदार्थांची ऍलर्जी असलेल्या लोकांसाठी देखील ही समस्या असू शकते. त्यामुळे शेळीचे दूध घेण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

हे वाचा - मीठामुळे अनेक वास्तू दोष होतात दूर; पण या चुका करणं पडू शकतं महागात, वाचा योग्य पद्धत

शेळीचे दूध कसे वापरावे

शेळीचे दूध अनेक प्रकारे वापरले जाऊ शकते. त्यापासून बनवलेले पनीर आणि दही जेवणात वापरता येते. शेळीच्या दुधाचे आईस्क्रीमही बनवता येते. बकरीच्या दुधापासून चहा बनवता येतो किंवा तो गरम करून पिऊ शकतो. याचा उपयोग मिठाई बनवण्यासाठी करता येतो.

(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Coronavirus, Goat, Health, Lifestyle