Exjनवी दिल्ली, 1 डिसेंबर: ओमिक्रॉन व्हायरसच्या वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर आंतराष्ट्रीय विमानसेवा सुरू (India postpones decision to resume international flights on 15 December) करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. जगभर सध्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा धोका असल्यामुळे कुठलाही धोका न पत्करण्याच्या (Decision due to Omicron virus) दृष्टीने सरकारनं हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. नव्या व्हेरिएंटचा देशात शिरकाव होण्यास कारणीभूत ठरू शकेल, असा कुठलाही फैसला न घेण्याच्या भूमिकेत सध्या केंद्र सरकार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
जगभरात ओमिक्रॉनची दहशत
कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर जगभरातील व्यवहार पुन्हा पूर्वपदावर येत असल्याचं चित्र दिसू लागलं होतं. आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणं टप्प्याटप्प्यानं सुरु करण्याचं धोरण जगातील सर्वच देशांनी अवलंबलं होतं. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी देशात प्रवेश देण्याचं धोरण काय असावं, याचा गाईडलाईन्सदेखील जारी करण्यात आल्या होत्या. त्यानुसार आंतरराष्ट्रीय विमानसेवा पूर्ण क्षमतेनं सुरु करण्याचा निर्णय भारत सरकारनं घेतला होता. मात्र ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या इशाऱ्यानंतर आता या निर्णयाचा पुनर्विचार कऱण्याचा फैसला केंद्र सरकारनं केला असून 15 डिसेंबरपासून विमानसेवा सरसकट सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर टाकला आहे.
हे वाचा- WhatsApp Payment: तुमचा UPI PIN विसरलात? काही मिनिटांत असा बदला
काय आहे निर्णय?
सरसकट आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणं सुरू कऱण्याची घोषणा केंद्रीय विमान वाहतूक मंत्रालयानं केली होती. मात्र तेव्हा ओमिक्रॉन व्हेरिएंटची वस्तूस्थिती समोर आली नव्हती. गेल्या आठवड्यात ओमिक्रॉनचं अस्तित्व आणि त्याची भयानकता समोर आल्यानंतर मात्र या निर्णयाचा पुनर्विचार कऱण्याचा फैसला करण्यात आला आहे. ओमिक्रॉन व्हायरसचा शिरकाव किती प्रमाणात होतो आणि त्याची भयानकता किती आहे, याचा अंदाज आल्यानंतरच आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याबाबतचा अंतिम फैसला करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय उड्डाण मंत्रालयानं जाहीर केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Airplane, Corona, International