मराठी बातम्या /बातम्या /explainer /

Russia-Ukraine Crisis: रशिया-युक्रेन वादामुळे तिसऱ्या महायुद्धाची भीती, भारतावर काय होणार परिणाम?

Russia-Ukraine Crisis: रशिया-युक्रेन वादामुळे तिसऱ्या महायुद्धाची भीती, भारतावर काय होणार परिणाम?

पूर्वी सोव्हिएत रशियाचा भाग असलेल्या युक्रेन (Ukraine) आणि रशिया (Russia) यांच्यातला तणाव काही नवीन नाही. आताही रशिया आणि युक्रेनमध्ये तणावाचीच परिस्थिती (Russia-Ukraine Tensions) आहे

पूर्वी सोव्हिएत रशियाचा भाग असलेल्या युक्रेन (Ukraine) आणि रशिया (Russia) यांच्यातला तणाव काही नवीन नाही. आताही रशिया आणि युक्रेनमध्ये तणावाचीच परिस्थिती (Russia-Ukraine Tensions) आहे

पूर्वी सोव्हिएत रशियाचा भाग असलेल्या युक्रेन (Ukraine) आणि रशिया (Russia) यांच्यातला तणाव काही नवीन नाही. आताही रशिया आणि युक्रेनमध्ये तणावाचीच परिस्थिती (Russia-Ukraine Tensions) आहे

मुंबई, 17 फेब्रुवारी: पूर्वी सोव्हिएत रशियाचा भाग असलेल्या युक्रेन (Ukraine) आणि रशिया (Russia) यांच्यातला तणाव काही नवीन नाही. आताही रशिया आणि युक्रेनमध्ये तणावाचीच परिस्थिती (Russia-Ukraine Tensions) आहे. हा तणाव इतका वाढला आहे की त्यामुळे युध्दजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. युक्रेनला अमेरिकेचा (America) भक्कम पाठिंबा आहे तर रशियाच्या बाजूनेही काही महत्त्वाचे देश उभे आहेत. परिस्थिती आणखी चिघळली तर तिसऱ्या महायुध्दाची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. अशा परिस्थितीत युक्रेनमध्ये असलेल्या भारतीय नागरिकांना (Indian Citizens in Ukraine) सुरक्षितरित्या परत मायदेशी आणणं हे एक आव्हान आहे. यासाठी भारत सरकारच्या वतीनं एक ॲडव्हायजरी जारी केली आहे. अगदी अत्यावश्यक नसेल तर युक्रेनमधून परत या असं आवाहन भारत सरकारच्या वतीनं करण्यात आलं आहे. आता जर रशिया किंवा युक्रेनवर हल्ला झाला तर भारताला काय नुकसान होऊ शकतं हा सगळ्यांत महत्त्वाचा प्रश्न आहे.

हे वाचा-रशियाचा सामना करण्यासाठी 79 वर्षांच्या युक्रेनियन आजींनी हातात घेतलं शस्त्र

युक्रेनमध्ये सध्या 20 हजारांपेक्षा जास्त भारतीय नागरिक राहत असल्याची माहिती मीडिया रिपोर्ट्समधून देण्यात आली आहे. यामध्ये बहुतांश मेडिकलचे म्हणजेच वैद्यकीय शाखेचे विद्यार्थी आहेत. तर आयटी, फार्मा आणि इंजिनीअरिंग क्षेत्रांत नोकरी करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. या नागरिकांच्या सुरक्षिततेची सगळ्यांत जास्त चिंता भारताला आहे. जर रशियानं युक्रेनवर हल्ला केला तर त्या युद्धाच्या परिस्थितीत तिथे असलेले भारतीय नागरिकही अडकतील. त्यामुळेच युक्रेनमधून शक्य तितक्या लवकर परतण्याची ॲडव्हायजरी भारत सरकारच्या वतीनं प्रसिध्द करण्यात आली आहे.

रशिया-युक्रेनमधील तणावामुळे भारताची द्विधा परिस्थिती झाली आहे. एकीकडे युक्रेनच्या सोबत अमेरिका आहे, तर दुसरीकडे रशिया आहे. अमेरिकेबरोबरच युरोपमधील काही देश, NATO मधील सदस्य राष्ट्रंही रशियाच्या विरोधात आहेत. भारताचे या दोन्ही देशांबरोबरचे संबंध चांगले आहेत. युक्रेनच्या बाजूने असलेल्या देशांशीही भारताचे चांगले संबंध आहेत आणि ते भारताचे चांगले सहकारी आहेत. भारताच्या पररराष्ट्र धोरणामधील पंचशील तत्त्वांनुसार दोन देशांमधील वादामध्ये, तणावामध्ये भारत स्वत:हून कधीच पडत नाही. मात्र सध्या भारताची परिस्थिती थोडी अवघड झाली आहे. कारण भारत जर रशियाच्या बाजूने उभा राहिला तर अमेरिका नाराज होऊ शकते आणि युक्रेनला भारतानं पाठिंबा देऊन अमेरिकेला साथ दिली तर रशिया नाराज होणार. अमेरिका आणि रशिया या दोघांनाही नाराज करण्याची भारताची इच्छा नाही. भारताचा सगळ्यांत मोठा संरक्षण क्षेत्रातील सहकारी (Defense Partner Of India) आजही रशियाच आहे, अशी प्रतिक्रिया आंतरराष्ट्रीय संबंधांवर पीएचडी करणारे मीड़िया शिक्षक डॉ. निरंजन कुमार यांनी दिली आहे. TV9 ने याबाबत वृत्त दिले आहे.

हे वाचा-युक्रेनवर Cyber Attack! अनेक सरकारी आणि बॅंकिंग वेबसाइट्स निशाण्यावर

व्यापारी संबंधांवर परिणाम

भारत-रशिया मधील संरक्षण क्षेत्रातील पार्टनरशिप मिशननुसार भारत रशियाकडून S-400 एअर डिफेन्स मिसाईल सिस्टीम खरेदी करतो. यामुळे अमेरिकेला काही आक्षेप नसेल अशी अपेक्षा भारतानं व्यक्त केली आहे. 2016 च्या अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रशियानं हस्तक्षेप केल्याचा आरोप रशियावर केला जातो. याला प्रत्युत्तर म्हणून 2017 मध्ये अमेरिकेनं काऊंटरिंग अमेरिकाज ॲडवर्सरिज थ्रू सँक्शन ॲक्ट संमत केला होता. या कायद्यानुसार रशियाकडून संरक्षण उपकरणं घेणाऱ्या देशांवर अमेरिकेकडून निर्बंध घातले जातात. मात्र 2018 मधील करारानुसार कोणत्याही परिस्थितीत भारत रशियाकडून S-400 खरेदी करणारच आहे. आता रशिया-युक्रेनमधील वाढत्या तणावामुळे अमेरिका भारतावर कडक निर्बंध लावू शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दुसरीकडे रशियानं युक्रेनवर हल्ला केला तर रशिया तेल आणि गॅसचा पुरवठा बंद करेल आणि किंमती वाढतील अशी भीती युरोपीयन देशांना वाटत आहे. रशिया आणि युक्रेनमधील या तणावामुळे गेल्या एका महिन्यात तेलाच्या किंमतीत 14 टक्के वाढ झाली आहे. जर परिस्थिती वेळीच नियंत्रणात आली नाही तर तेलाच्या एका बॅरेलची किंमत 125 डॉलरपर्यंत पोहोचू शकते अशीही शक्यता वर्तवली जात आहे. अर्थातच याचा परिणाम भारतावरही मोठ्या प्रमाणात होऊ शकतो.

हे वाचा-अमेरिका रशियाला का धमकावत आहे? युक्रेन प्रेमामागची ही आहे खरी गोष्ट!

आंतराराष्ट्रीय सुरक्षेचा विचार केला तर भारतही प्रत्यक्षात धोकेबाज शत्रुंनी वेढलेला आहे. भारताच्या एकीकडे सतत कुरापती करणारा पाकिस्तान आहे तर दुसरीकडे फसवणूक करणारा चीन आहे. नेपाळबरोबरही भारताचा काही मुद्यांवर वाद सुरु आहे. लडाख आणि काश्मीर हे भारताचे सर्वात संवेदनशील भाग आहेत. याच ठिकाणी पाकिस्तान (Pakistan) आणि चीनसोबत (China) भारताचा सतत संघर्ष सुरु आहे. अशा परिस्थितीत रशिया किंवा अमेरिकेचा पाठिंबा असलेल्या युक्रेनला भारतानं नाराज केलं तर रणनीतीच्या स्तरावर त्याचा फायदा चीनला मिळू शकतो. भारतानं आपल्या आंतरराष्ट्रीय धोरणातील पंचशील तत्वांवर ठाम राहणं महत्त्वाचं आहे. सध्या मात्र युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना लवकरात लवकर मायदेशी आणणं हीच भारताची सगळ्यात मोठी चिंता आहे. जर रशिया-युक्रेनमध्ये युध्द झालं तर तिथून नागरिकांची सुटका करणं अवघड होईल.

अर्थात काही रिपोर्ट्सनुसार, रशियाने युक्रेनच्या सीमेपासून आपल्या सैन्य थोडंसं मागे घेतलं आहे. त्यामुळे परिस्थितीत किंचित सुधारणार झाल्याचं सांगितलं जात आहे. मात्र सीमेवर अजूनही मोठ्या संख्येनं सैनिक तैनात आहेत. युक्रेनवर याआधी सायबर ॲटॅकही झाला आहे. तर दुसरीकडे अजूनही युध्दाची शक्यता असल्याचं अमेरिकेचं म्हणणं आहे. युक्रेनवर अजूनही रशिया हल्ला करण्याची शक्यता आहे आणि या हल्ल्याचं उत्तर देण्यासाठी अमेरिका सज्ज आहे, असं अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन (US President Joe Bioden) यांनी म्हटलं आहे.

युक्रेन आणि रशियामध्ये युध्द होणारच अशी भीती जगातील अनेक देशांना वाटते आहे. मात्र हे युध्द होऊ नये असंच अनेक राष्ट्रांचं मत आहे आणि या दोन देशांमधील तणाव कमी व्हावा असंच भारताचंही मत आहे.

First published:

Tags: Economy, Russia, United States of America, US President