कीव, 16 फेब्रुवारी: सध्या युक्रेन (Russia-Ukraine Crisis) आणि रशिया या दोन देशांमधले संबंध तणावपूर्ण बनले आहेत. या दोन्ही देशांदरम्यान युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. युद्ध टाळण्यासाठी जागतिक पातळीवर चर्चा सुरू असून, वादाला कारणीभूत ठरत असलेल्या मुद्द्यांवर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यातच रशियाने सैन्य मागे घेत असल्याचे सांगितले आहे. मात्र, एकीकडे अशी स्थिती असताना, दुसरीकडे मंगळवारी युक्रेनमध्ये सायबर हल्ला (Cyber Attack) झाला आहे. देशातील प्रमुख सरकारी साईटस (Government Sites) आणि प्रमुख बॅंकांना या हल्ल्यात लक्ष्य करण्यात आलं होतं. यामुळे युक्रेनचे नागरिक चिंतेत आहेत. मात्र, नागरिकांचा पैसा सुरक्षित असल्याचं युक्रेन सरकारने (Ukraine Government) म्हटलं आहे. युक्रेन आणि रशियादरम्यान सध्या तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. रशिया युक्रेनवर हल्ला करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र रशियाने सैन्य मागे घेत असल्याचे सांगितले आहे. त्यात मंगळवारी युक्रेनमधल्या प्रमुख सरकारी साईट्स आणि प्रमुख बॅंकांवर सायबर हल्ला करण्यात आला. या बॅंकामध्ये युक्रेनमधल्या नागरिकांचे पैसे असल्यानं देशात सर्वत्र चिंतेचं वातावरण आहे. हे वाचा- अमेरिकेचा उघड इशारा मिळताच रशियाचं एक पाऊल मागे, घेतला मोठा निर्णय सायबर हल्ल्यानंतर सर्व व्यवहार रोखण्यात आले आहेत. मात्र, नागरिकांचे पैसे सुरक्षित असल्याचं सरकारने स्पष्ट केलं आहे. युक्रेनच्या माहिती मंत्रालयाच्या दळणवळण आणि माहिती सुरक्षा केंद्राने सांगितलं की, ‘ठेवीदारांना कोणताही धोका नाही, त्यांचे पैसे सुरक्षित आहेत.’ या हल्ल्यामागे रशियाचा हात असल्याचा संशय व्यक्त होत आहे. मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ‘रशियाने माघार घेतली असली तरी त्यांच्याशी संबंधित कोणीतरी हा हल्ला केला असण्याची शक्यता आहे. कारण रशियाच्या आक्रमक योजना पूर्णतः यशस्वी होत नसल्याची स्थिती आहे.’ अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सायबर हल्ल्यामुळे किमान युक्रेनच्या 10 वेबसाइट्सनी काम करणं थांबवलं आहे. यात संरक्षण मंत्रालय, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, संस्कृती मंत्रालय आणि युक्रेनच्या दोन सर्वांत मोठ्या सरकारी बॅंकांचा समावेश आहे. देशातील सर्वांत मोठी सरकारी बॅंक Privtbank आणि Sberbank यांच्यावरही सायबर हल्ला झाला आहे. कारण, या बॅंकांच्या ग्राहकांनी बॅंकेचे अॅप (App) बंद पडल्याची आणि ऑनलाइन पेमेंट होत नसल्याची तक्रार केली आहे. हे वाचा- युक्रेनचं मूळ दुखणं नेमकं काय आहे? रशिया आणि अमेरिकेमध्ये का वाढतोय तणाव? युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ‘हा सायबर हल्ला युक्रेनला लक्ष्य करणाऱ्या अनेक हॅकिंग ऑपरेशनपैकी एक आहे.’ तथापि रशियाने मंगळवारी सांगितले की ,‘आम्ही हल्ला करणार नाही. आम्ही आमचे सैन्य मागे घेत आहोत’. परंतु, पाश्चात्य शक्तींनी याबाबत पुरावा देण्याची मागणी केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.