मराठी बातम्या /बातम्या /explainer /Explainer : Covishield कितपत प्रभावी? या लशीबद्दल काय सांगतो जगातला सर्वात मोठा अभ्यास?

Explainer : Covishield कितपत प्रभावी? या लशीबद्दल काय सांगतो जगातला सर्वात मोठा अभ्यास?

तब्बल 15.9 लाखांहून अधिक जणांवर कोविशिल्ड लशीचे (Covishield Vaccine) होणारे परिणाम अभ्यासण्यात आले. कोविशिल्ड लशीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर कोरोनापासून 93 टक्के सुरक्षितता मिळत असल्याचं या अभ्यासातून स्पष्ट झालं.

तब्बल 15.9 लाखांहून अधिक जणांवर कोविशिल्ड लशीचे (Covishield Vaccine) होणारे परिणाम अभ्यासण्यात आले. कोविशिल्ड लशीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर कोरोनापासून 93 टक्के सुरक्षितता मिळत असल्याचं या अभ्यासातून स्पष्ट झालं.

तब्बल 15.9 लाखांहून अधिक जणांवर कोविशिल्ड लशीचे (Covishield Vaccine) होणारे परिणाम अभ्यासण्यात आले. कोविशिल्ड लशीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर कोरोनापासून 93 टक्के सुरक्षितता मिळत असल्याचं या अभ्यासातून स्पष्ट झालं.

    नवी दिल्ली 04 ऑगस्ट : कोरोना (Corona) संसर्गावर, त्याच्या प्रतिबंधावर, नियंत्रणावर, त्यावरच्या लशींवर वेगवेगळ्या प्रकारचं संशोधन जगभर सातत्याने सुरू आहे; मात्र बहुतांश प्रकारच्या संशोधनाचे प्रयोग केल्या जाणाऱ्या व्यक्तींची संख्या खूप व्यापक नसते. आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेजने (AFMC) मात्र कोरोना प्रतिबंधक लशींबद्दलचा आतापर्यंतचा व्यापक अभ्यास नुकताच केला आहे. यात तब्बल 15.9 लाखांहून अधिक जणांवर कोविशिल्ड लशीचे (Covishield Vaccine) होणारे परिणाम अभ्यासण्यात आले. कोविशिल्ड लशीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर कोरोनापासून 93 टक्के सुरक्षितता मिळत असल्याचं या अभ्यासातून स्पष्ट झालं. आतापर्यंत जगभरात कुठेही झालेल्या अभ्यासात सहभागी झालेल्या व्यक्तींची संख्या 10 लाखांहून अधिक नव्हती. त्यामुळे AFMC ने केलेला हा अभ्यास जगातला सर्वांत मोठा ठरला आहे. 'दैनिक भास्कर'ने याबद्दलचं सविस्तर वृत्त दिलं आहे.

    ब्रिटनमधलं ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अॅस्ट्राझेनेका कंपनी यांनी तयार केलेल्या AZD-1222 या फॉर्म्युलेशनपासून भारतातल्या सिरम इन्स्टिट्यूटने (SII) कोविशिल्ड (Covishield) ही लस विकसित केली आहे. भारतातल्या लसीकरण कार्यक्रमात कोविशिल्ड ही एक महत्त्वाची लस आहे. त्यामुळे त्या लशीच्या प्रभावीपणाविषयी लोकांच्या मनात काही शंका असल्यास त्या दूर करण्यासाठी या अभ्यासाचा खूप मोठा उपयोग होणार आहे.

    सौदी अरेबियात प्रवाशांवरील निर्बंध अधिक कठोर, नियम मोडल्यास एक कोटीचा दंड

    नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल (Dr V. K. Paul) यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अभ्यास 15 लाखांहून अधिक डॉक्टर्स (Doctors) आणि फ्रंट लाइन वर्कर्सवर (Front Line Workers) करण्यात आला. भारतात 16 जानेवारी 2020 रोजी कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमाची (Vaccination Drive) सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात सशस्त्र दलाचे आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाइन वर्कर्स यांना लस देण्यात आली होती. 30 मेपर्यंत लस घेतलेले 15.9 लाख फ्रंट लाइन वर्कर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचाच या अभ्यासात समावेश आहे. त्या अभ्यासाच्या निष्कर्षांचं अंतरिम विश्लेषण अलीकडेच जाहीर करण्यात आलं.

    ज्यांनी कोविशिल्डचे दोन्ही डोस घेतले होते, त्यांच्यामध्ये 93 टक्के सुरक्षितता दिसून आली, असं डॉ. व्ही. के. पॉल म्हणाले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान डेल्टा व्हॅरिएंटने (Delta Variant) थैमान घातलं होतं. त्याच दरम्यान हा अभ्यास करण्यात आल्याचंही डॉ. पॉल यांनी सांगितलं.

    या अभ्यासात 15 लाख 95 हजार 630 व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. त्यांचं सरासरी वयोमान 27.6 वर्षं होतं. तसंच त्यात 99 टक्के पुरुषांचा समावेश होता. 135 दिवसांहून अधिक काळ हा अभ्यास सुरू होता. 16 जानेवारी ते 30 मेपर्यंत यापैकी 95.4 टक्के जणांनी लशीचा पहिला डोस घेतला होता, तसंच 82.2 टक्के जणांनी लशीचे दोन्ही डोस घेतले होते.

    हा अभ्यास आव्हानात्मक होता. त्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे लशीचा एकही डोस न घेतलेल्या, एक डोस घेतलेल्या आणि दोन्ही डोस घेतलेल्या अशा तीन प्रकारच्या कॅटेगरीजमध्ये यात सहभागी झालेल्या व्यक्तींचं वर्गीकरण करण्यात आलं होतं. लसीकरण कार्यक्रम सातत्याने सुरू असल्याने या प्रत्येक कॅटेगरीतल्या व्यक्तींची संख्या दररोज बदलत होती. त्यामुळे त्यासाठी विशेष मापन यंत्रणेचा अवलंब करण्यात आला.

    डेल्टानंतर आता RS विषाणूचा हाहाकार; नवजात बालकं विळख्यात, काय आहेत लक्षणं?

    या अभ्यासात सहभागी झालेल्या 15.9 लाख व्यक्तींपैकी एकही डोस न घेतलेल्या 10,061 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं आढळून आलं. एक डोस घेतलेल्या 1159 जणांना, तर दोन्ही डोस घेतलेल्या 2512 व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाल्याची नोंद झाली. तसंच, या अभ्यासात सहभागी झालेल्या आणि एकही डोस न घेतलेल्या 37 जणांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला. एक डोस घेतलेल्यांपैकी 16 जणांना, तर दोन्ही डोस घेतलेल्यांपैकी 7 जणांना कोरोना संसर्गामुळे मृत्यू आला.

    यातून एक गोष्ट स्पष्ट झाली, की लसीकरण हेच कोरोनाविरोधातलं प्रभावी साधन आहे. तसंच, लसीकरणानंतरही कोविड प्रोटोकॉल (Covid Protocol) पाळण्याला पर्याय नाही. आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेजचे संचालक रजत दत्ता यांनी सांगितलं, की कोरोनाप्रतिबंधक लस किती प्रभावी आहे, हे या अभ्यासातून दिसून आलं आहे. कोणाच्या मनात अजूनही शंका असतील, तर त्या यातून दूर होऊ शकतील.

    लसीकरणानंतरही कोविड प्रोटोकॉल पाळण्याकडे डॉ. व्ही. के. पॉल यांनी लक्ष वेधलं आहे. कोणतीही लस घेतल्यानंतर कोरोनाचा संसर्ग होणारच नाही अशी खात्री दिली जात नाही; मात्र संसर्गाच्या गंभीर परिणामांची तीव्रता लशीमुळे नक्कीच कमी होते. त्यामुळे लस हेच कोरोनाविरुद्धच्या लढाईतलं प्रमुख हत्यार आहे. लसीकरण प्रत्येकाने करून घेतलं पाहिजे आणि लस घेतल्यानंतरही कोविड प्रोटोकॉल पाळला पाहिजे, असं आवाहन त्यांनी केलं.

    एक वर्षानंतर पहिल्यांदाच वुहानमध्ये आढळला कोरोना रुग्ण; सर्व लोकांची होणार चाचणी

    महाराष्ट्रात 20 सरकारी कोविड सेंटरमध्ये झालेल्या अभ्यासात असं आढळून आलं आहे, की कोरोना संसर्गामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्यापैकी 87.5 टक्के रुग्णांनी लशीचा एकही डोस घेतलेला नव्हता.

    कोरोना प्रतिबंधक लशीचा एक डोस घेतला, तर तो कोरोना संसर्गाविरोधात 82 टक्के प्रभावी ठरतो. तसंच, दोन्ही डोस घेतलेले असल्यास कोरोनाविरोधात 95 टक्के प्रभावी ठरतात, असं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल रिसर्चने तमिळनाडू पोलिस विभाग आणि अन्य काही संस्थांसोबत केलेल्या एका अभ्यासात आढळून आलं आहे. या महिन्याच्या सुरुवातीलाच हे निष्कर्ष जाहीर करण्यात आले होते.

    दोन्ही डोसनंतर संसर्गाचं प्रमाण किती?

    दरम्यान, कोविशिल्ड लशीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर होणारा कोरोना संसर्ग अर्थात ब्रेक थ्रू इन्फेक्शनचं प्रमाण 93 टक्के कमी होत असल्याचं एका अभ्यासात दिसून आलं आहे. लशीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर दोन आठवडे होऊन गेले, की त्यानंतर संबंधित व्यक्तीचं लसीकरण पूर्ण झाल्याचं मानलं जातं. लसीकरण पूर्ण झाल्यानंतरही कोरोना संसर्ग होण्याचं प्रमाण देशात 1.6 टक्के एवढं आहे. याचाच अर्थ असा, की लसीकरण पूर्ण झालेल्या 1000 व्यक्तींपैकी 16 जणांना त्यानंतरही कोरोनाची लागण होऊ शकते. त्यालाच ब्रेक थ्रू इन्फेक्शन असं म्हणतात. कोविशिल्डचे दोन्ही डोस घेतल्यानंतर ब्रेक थ्रू इन्फेक्शनचं (Break Through Infection) प्रमाण 93 टक्क्यांनी कमी असतं, असं आढळलं आहे. ब्रेक थ्रू इन्फेक्शनसंदर्भातला हा निष्कर्ष चंडीगडमधल्या पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च या संस्थेने केलेल्या अभ्यासानंतर काढला आहे. याबद्दलचा संशोधन अहवाल 'दी न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन'मध्ये प्रकाशित झाला आहे.

    First published:

    Tags: Corona vaccination, Corona vaccine