नवी दिल्ली, 5 जानेवारी: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी दौऱ्यातील कार्यक्रमात (Program) आयत्यावेळी बदल (Last Minute Changes) केल्यामुळेच त्यांच्या सुरक्षेचा (Security concern) प्रश्न निर्माण झाला, असा दावा पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी (Charanjit Channi) यांनी केला आहे. पंतप्रधान जात असलेल्या रस्त्यावर गर्दी झाल्यामुळे त्यांच्या ताफ्याला पंधरा ते वीस मिनिटं एकाच ठिकाणी थांबून राहावं लागलं होतं. त्यामुळे पंतप्रधानांच्या सुरक्षाव्यवस्थेत हयगय झाल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्रालयाने केला होता. या विषयावर आपली बाजू मांडताना पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांच्या दौऱ्यात आयत्या वेळी झालेले बदल हेच यामागचं कारण असल्याचे सांगितले आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री?
नियोजित दौऱ्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भटिंडा ते फिरोजपुर हा प्रवास हवाईमार्गाने करणार होते. मात्र त्यावेळी त्यांनी या दौऱ्यात बदल केला आणि हवाई मार्गाने जाण्याऐवजी रस्त्याने तिकडे जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या प्लॅनची कल्पना प्रशासनाला आयत्यावेळी देण्यात आली होती. त्यामुळे कदाचित प्रशासनाला पुरेसा वेळ मिळाला नसावा, असा अंदाज मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. याचा अर्थ सुरक्षाव्यवस्थेत कसूर झाली, असा काढणे चुकीचे असल्याचं मुख्यमंत्री चरणजीत सिंग यांनी म्हटलं आहे.
हे वाचा- चीनमध्ये कोरोनाचं वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना केलं जातंय लक्ष्य!
केंद्र विरुद्ध राज्य सरकार
पंतप्रधानांच्या पंजाब दौऱ्यात झालेल्या या प्रकारामुळे केंद्र विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष निर्माण झाल्याचे चित्र दिसू लागले आहे. मुख्यमंत्री या प्रकारावेळी फोनवर देखील आले नाहीत, असा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे, तर पंतप्रधानांनी आपल्या दौर्यात आयत्या वेळी केलेल्या बदलामुळे हा प्रकार घडला, असा दावा पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी केला आहे. पंजाब विधानसभेच्या निवडणुका आणि त्याला असलेली शेतकरी आंदोलनाची पार्श्वभूमी या दोन्हीमुळे हा मुद्दा आगामी काळात जोरदार गाजण्याची चिन्हे आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cm, Delhi, PM Naredra Modi, Punjab, Security