जाहिरात
मराठी बातम्या / देश / देशाच्या राजकारणातील मोठी बातमी, भाजपच्या दोन मिनिटांच्या व्हिडीओत काँग्रेसविरोधात खळबळजनक दावे

देशाच्या राजकारणातील मोठी बातमी, भाजपच्या दोन मिनिटांच्या व्हिडीओत काँग्रेसविरोधात खळबळजनक दावे

देशाच्या राजकारणातील मोठी बातमी, भाजपच्या दोन मिनिटांच्या व्हिडीओत काँग्रेसविरोधात खळबळजनक दावे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा काही आंदोलनकर्त्यांनी रोखल्यामुळे त्यांची पंजाबला होणारी सभा रद्द करण्यात आली. या घटनेनंतर भाजपने ट्विटरवर दोन मिनिटांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

चंदीगड, 5 जानेवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) बुधवारी (5 जानेवारी) पंजाब दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान फिरोजपूर (Firozpur) येथे त्यांची मोठी सभा होणार होती. पण या सभेला जाताना काही आंदोलनकर्त्यांनी त्यांच्या ताफ्याला अडवलं. पंतप्रधान मोदींचा ताफा जवळपास 15 ते 20 मिनिट घटनास्थळी थांबला होता. मोदींच्या सुरक्षेत मोठी ऋटी आढळल्याचं सुरक्षा रक्षकांना जाणवल्यानंतर त्यांचा ताफा परत माघारी गेला. या घटनेवर भाजपकडून (BJP) काँग्रेसवर (Congress) सडकून टीका केली जात आहे. विशेष म्हणजे भाजपच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक दोन मिनिटांचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या दोन मिनिटांच्या व्हिडीओत भाजपकडून काँग्रेसवर गंभीर आरोप (allegations) करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तान (Pakistan), खालिस्तानी समर्थक (Khalistan supporters) आणि काँग्रेस पक्षाचा (Congress party) डाव हाणून पाडला आहे. तसेच देशात दंगली (Riot) घडवून आणण्याची काँग्रेसची योजना यातून उघड झाली आहे, असा खळबळजनक दावा भाजपने त्या व्हिडीओत केला आहे.

जाहिरात

भाजपने दोन मिनिटांच्या व्हिडीओत नेमकं काय-काय म्हटलंय? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील हल्ल्याची क्रोनोलॉजी! मोदींवर हल्ला करण्याचा नेमका कुणाचा कट होता? खालिस्तानींचा? त्यांच्या या पूर्ण कटात त्यांना कुणाची साथ होती? काँग्रेसची? आधी 4 जानेवारीला कार्यक्रम होऊ देणार नाही, अशी धमकी दिली गेली. त्यानंतर 5 जानेवारीला मोदींच्या कार्यक्रमाला जाणाऱ्यांना धमकविण्यात आलं. गाड्यांना जाण्यापासून रोखण्यात आलं. भाजपच्या झेंड्यासोबत छेडछाड केली. मोदींच्या रॅलीत गाड्यांना जाण्यापासून रोखण्यात आलं. भाजपच्या झेंड्यांसोबत छेडछाड केली. त्यानंतर गाड्यांवरील पोस्टर हटवले. 5 जानेवारीला आधी मोदींना रस्ता साफ असल्याचं क्लियरन्स दिलं. त्यानंतर आंदोलनकर्त्यांना रस्त्यामध्ये घुसवलं. पंतप्रधानांचा ताफा 20 मिनिटांपर्यंत रोखण्यात आला. पंजाब सरकारशी संपर्क केला तर मुख्यमंत्री चन्नी यांनी बातचितदेखील केली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे गेले असते तर काय झालं असतं दंगा? हल्ला? रक्तपात? पंतप्रधानांना जीवे मारण्याचा प्रयत्न? परतल्यानंतर पंतप्रधान मोदींनी खरं सांगितलं. पाकिस्तान, खालिस्तानी समर्थक आणि काँग्रेसचा डाव हाणून पाडला. काँग्रेसला देशाला दंगलींच्या आगीत लोटण्याचा कट उघड झाला. हेही वाचा :  महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक, नव्या बाधितांचा आकडा थेट 26 हजार पार पंजाबमधील घटेवरुन केंद्रीय गृहमंत्रालयाचीदेखील नाराजी पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेबाबत जी घटना घडली त्या घटनेवर केंद्रीय गृहमंत्रालयानेदेखील नाराजी व्यक्त केली आहे. या गंभीर सुरक्षेतील त्रुटींची दखल घेत गृह मंत्रालयाने राज्य सरकारकडून सविस्तर अहवाल मागवला आहे. राज्य सरकारलाही या चुकांची जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई करण्यास सांगितले आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाचं वक्तव्य… पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात सुरक्षेचा भंग करण्यात आला. आज सकाळी पंतप्रधान भटिंडा येथे उतरले तेथून ते हेलिकॉप्टरने हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकावर जाणार होते. पाऊस आणि खराब दृश्यमानतेमुळे, पंतप्रधानांनी हवामान स्वच्छ होण्याची सुमारे 20 मिनिटे वाट पाहिली. जेव्हा हवामान सुधारले नाही, तेव्हा असे ठरले की तो रस्त्याने राष्ट्रीय मेरीटर्स मेमोरियलला भेट देईल, ज्यासाठी 2 तासांपेक्षा जास्त वेळ लागेल. डीजीपी पंजाब पोलिसांकडून आवश्यक सुरक्षा व्यवस्थेची पुष्टी केल्यानंतर पंतप्रधान रस्त्याने प्रवास करण्यास निघाले. हेही वाचा :  मुंबईत कोरोनाबाधितांच्या नव्या रुग्णांनी पहिल्या-दुसऱ्या लाटेचा रेकॉर्ड मोडला, आकडा थेट 15 हजार पार हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकापासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर, जेव्हा पंतप्रधानांचा ताफा उड्डाणपुलावर पोहोचला तेव्हा काही आंदोलकांनी रस्ता अडवला असल्याचे दिसून आले. पंतप्रधान 15-20 मिनिटे फ्लायओव्हरवर अडकले होते. पंतप्रधानांच्या सुरक्षेतील ही मोठी चूक होती. पंतप्रधानांचे वेळापत्रक आणि प्रवासाची योजना पंजाब सरकारला आधीच कळवण्यात आली होती. प्रक्रियेनुसार, त्यांना रसद, सुरक्षेसाठी आवश्यक व्यवस्था करावी लागेल तसेच आकस्मिक योजना तयार ठेवावी लागेल. तसेच आकस्मिक योजना लक्षात घेता पंजाब सरकारला रस्त्याने कोणतीही हालचाल सुरक्षित ठेवण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा तैनात करावी लागेल, जी स्पष्टपणे तैनात केलेली नव्हती. या सुरक्षेतील त्रुटींनंतर पुन्हा भटिंडा विमानतळाकडे जाण्याचा निर्णय घेण्यात आला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात