मराठी बातम्या /बातम्या /explainer /

Explainer: दिवाळीचा फटाक्यांशी संबंध कधी आणि कसा आला? फटाक्यांचा रंजक इतिहास

Explainer: दिवाळीचा फटाक्यांशी संबंध कधी आणि कसा आला? फटाक्यांचा रंजक इतिहास

फटाक्याच्या निर्मितीबाबत आणि वापराबाबत अनेक कथा प्रचलित आहेत. संत एकनाथ  यांनी 1570 मध्ये लिहिलेल्या भारुडात श्रीकृष्णाच्या लग्नसोहळ्यात फटाक्यांची आतषबाजी झाल्याचा उल्लेख केला आहे. तर काही जण फटाक्यांचं मूळ चीनमध्ये असल्याचं सांगतात.

फटाक्याच्या निर्मितीबाबत आणि वापराबाबत अनेक कथा प्रचलित आहेत. संत एकनाथ यांनी 1570 मध्ये लिहिलेल्या भारुडात श्रीकृष्णाच्या लग्नसोहळ्यात फटाक्यांची आतषबाजी झाल्याचा उल्लेख केला आहे. तर काही जण फटाक्यांचं मूळ चीनमध्ये असल्याचं सांगतात.

फटाक्याच्या निर्मितीबाबत आणि वापराबाबत अनेक कथा प्रचलित आहेत. संत एकनाथ यांनी 1570 मध्ये लिहिलेल्या भारुडात श्रीकृष्णाच्या लग्नसोहळ्यात फटाक्यांची आतषबाजी झाल्याचा उल्लेख केला आहे. तर काही जण फटाक्यांचं मूळ चीनमध्ये असल्याचं सांगतात.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 2 नोव्हेंबर: हिंदूंचा वर्षातील सर्वांत मोठा आणि प्रमुख सण दिवाळी (Diwali 2021) मानला जातो. दिवाळी ही अनेक कारणांसाठी महत्त्वाची ठरते. एखाद्या नव्या गोष्टीची सुरवात, कपडे, दागिने, वाहन खरेदी आदी गोष्टी दिवाळीनिमित्तानं करण्याची प्रथा आजही जपली गेली आहे. दिवाळी म्हटलं की अजून एक गोष्ट विशेषतः लहान मुलांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू असते, ती म्हणजे फटाके (Firecrackers). तसं पाहिलं तर विवाह समारंभ किंवा अन्य विशेष समारंभादरम्यानही फटाके वाजवले जातात. परंतु, दिवाळीत मात्र फटाक्यांची आतषबाजी प्रत्येकजण आपपल्या परीनं करत असतो. फटाके फोडावेत किंवा नाही, याविषयी गेल्या काही वर्षांपासून विशेष चर्चा होताना दिसते. अर्थात त्याला कारणही तितकीच महत्त्वाची आहेत.

व्यक्तीच्या मृत्यूनंतर Adhar Card , Pan Card या अत्यावश्यक ओळखपत्रांचं काय करावं

प्रदूषणाचं (Pollution) कारण देत दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पश्चिम बंगालसह विविध राज्यांनी फटक्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. तर काही राज्यांनी काही तासांसाठी फटाके फोडण्यास मान्यता दिली आहे. मात्र सर्वोच्च न्यायलयानं आम्ही कोणत्याही व्यक्तीच्या आनंद व्यक्त करण्याच्या विरोधात नसलो तरी हा आनंद दुसऱ्या व्यक्तींसाठी घातक ठरू नये, असं म्हटलं आहे.

देशातील काही लोकांचं संपूर्ण अर्थकारण हे या फटाक्यांच्या निर्मितीवर अवलंबून असतं. दिवाळीचा कालावधी हा या लोकांसाठी व्यवसायाचा असतो. फटाक्यांतून 5000 कोटी रुपयांची उलाढाल होते. आज भारत हा चीननंतर सर्वाधिक फटाके निर्मिती करणारा देश आहे. चेन्नईपासून 500 किलोमीटर अंतरावरील शिवकाशी (Sivakasi) येथे सर्वाधिक प्रमाणात फटाके निर्मिती होते. येथे 800 पेक्षा अधिक कारखान्यांमध्ये देशाच्या अन्य भागांच्या तुलनेत 80 टक्के फटाक्यांची निर्मिती होते. शिवकाशीतील नडार बंधूंनी (षण्मुगम नडार आणि अय्या नडार) यांनी 1922 मध्ये कोलकाता येथे काडीपेडी तयार करण्याची कला अवगत केली. या दोघांनी येथे माचिस अर्थात काडीपेटी निर्मितीचा कारखाना सुरू केला. त्यानंतर ते 1926 मध्ये वेगळे झाले. आज या दोघांच्या स्टॅण्डर्ड फायर वर्क्स आणि श्री कालीश्वरी फायर वर्क्स या फटाके निर्मिती करणाऱ्या देशातील मोठ्या कंपन्या समजल्या जातात. या पार्श्वभूमीवर फटाक्यांच्या अनुषंगानं सध्या असलेली चर्चा महत्त्वाची ठरते. मात्र ही फटाक्यांची परंपरा केव्हापासून सुरू झाली हा प्रश्न तुमच्या मनात कधी ना कधी आलाच असेल. या विषयीची माहिती `टीव्ही नाइन हिंदी`ने दिली आहे.

खरं तर फटाक्याच्या निर्मितीबाबत आणि वापराबाबत अनेक कथा प्रचलित आहेत. मराठी संत कवी एकनाथ (Sant Eknath) यांनी 1570 मध्ये लिहिलेल्या पुस्तकातील एका कवितेत महाभारत कालखंडात रुक्मिणी आणि भगवान श्रीकृष्णाच्या विवाहावेळी फटाक्यांची आतषबाजी झाल्याचा उल्लेख केला आहे.

परंतु, फटाक्यांचा शोध हा चीनमध्ये (China) लागल्याचं इतिहासकार सांगतात. सहाव्या शतकाच्या सुरुवातीला एका दुर्घटनेपासून फटाक्याचा शोध लागल्याचं मानलं जातं. एका स्वयंपाक्यानं जेवण बनवताना चुकून पोटॅशिअम नायट्रेट आगीत टाकलं. त्यामुळे त्यातून रंगीबिरंगी ज्वाळा निघाल्या. त्यानंतर त्यानं कोळसा, सल्फर आणि पोटॅशिअम नायट्रेटची पूड तयार करून ती आगीत टाकली, त्यामुळे जोरदार स्फोटासारखा आवाज झाला पण रंगीबिरंगी ज्वाळा निघाल्या नाहीत. फटाके आणि त्याच्या दारूचा शोध यावेळी लागला. काही ठिकाणी फटाक्यांचा शोध हा चिनी सैनिकांनी लावल्याचं सांगितलं जातं. या सैनिकांनी कोळश्यावर सल्फर टाकलं त्यामुळे पोटॅशिअम नायट्रेट आणि कोळश्याच्या माध्यमातून गनपावडर म्हणजेच दारू बनली आणि सूर्याच्या उष्णतेमुळं तिचा स्फोट झाला. त्यानंतर बांबूच्या (Bamboo) नळीत ही पावडर भरून स्फोट करण्यासाठी वापरली जाऊ लागली. याचाच अर्थ बांबूचा वापर फटाके निर्मितीसाठी केला गेला. याशिवाय 2200 वर्षांपूर्वी चिनी लोक बांबू आगीत टाकत. तापल्यानंतर तो फुटत असे. या आवाजामुळे नकारात्मक विचार, वाईट आत्मा दूर जाऊन सुख -शांती मिळते असं चिनी लोक मानत होते. त्यामुळे त्याचा वापर सणासुदीच्या काळात, नववर्ष स्वागतावेळी, जन्मप्रसंगी, विवाहवेळी होऊ लागला.

भारतातील फटाक्यांचा इतिहास 15 व्या शतकापेक्षाही जुना आहे. काही चित्रांमध्ये (Painting) याची झलक पाहायला मिळते. याचाच अर्थ त्याकाळी देखील भारतीयांना फटाक्यांचं तंत्र अवगत होतं. परंतु, लिखित स्वरुपातील हे स्पष्ट करणारा दस्तावेज किंवा साहित्य उपलब्ध नाही.

पार्टीसाठी जाताना Eyes Lashesलावणं पडलं महागात,तरुणीला अनेक दिवस दिसणंच झालं बंद

पंजाब विद्यापीठातील इतिहासाचे माजी प्राध्यापक राजीव लोचन यांनी एका न्यूज वेबसाइटला दिलेल्या माहितीनुसार, ``ख्रिस्त पूर्व काळात लिहिल्या गेलेल्या कौटिल्यच्या अर्थशास्त्रात एका अशा चूर्णाचा उल्लेख मिळतो की ते चूर्ण आगीच्या संपर्कात आल्यानंतर त्यापासून तीव्र ज्वाळा तयार होतात. हे चूर्ण बांबू सारख्या कशाच्यातरी नळीत टाकून फटाके बनवले जायचे.``

15 व्या शतकात फटक्यांचा वापर झाल्याचा पुरावा मिळतो. बादशहा बाबराने जेव्हा भारतावर हल्ला केला तेव्हा शस्त्र म्हणून दारुगोळ्याचा वापर केला गेला होता. शहाजहाँचा दुसरा मुलगा शिकोहच्या विवाहाशी संबंधित 1633 मधील एका पेटिंगमध्ये फटाक्यांची आतषबाजी केल्याचं पाहायला मिळतं. इतिहासकार पी.के. गोडे यांनी त्यांच्या `द हिस्ट्री ऑफ फायरवर्क्स इन इंडिया बिटवीन 1400 अॅण्ड 1900 एडी` या पुस्तकात 1518मध्ये गुजरातमधील एका ब्राम्हण व्यक्तीच्या विवाहावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आल्याचा उल्लेख केला आहे. 17 व्या शतकात भारतात आलेल्या फ्रॅन्कोसीस बर्नियर या फ्रेंच प्रवाश्यानं (French Traveller) भारतात हत्तींसारख्या मोठ्या जनावरांना प्रशिक्षण देण्यासाठी फटाक्यांचा वापर करण्यात आल्याचा उल्लेख केला आहे.

डिप्रेशन आलेल्या कर्मचाऱ्याला नोकरीवरून काढणं पडलं महाग, द्यावे लागले 51 लाख

13 व्या शतकानंतर फटाक्यांचा चीनबाहेर प्रसार होऊ लागला. युरोप आणि अरब देशांमध्ये दारुगोळ्याचा वापर हा शक्तिशाली शस्त्र म्हणून केला जाऊ लागला. याच दरम्यान युरोपमध्ये आतिषबाजी विद्या म्हणजेच पायरोटेक्निकचा वापर करण्यासाठी प्रशिक्षण केंद्रे सुरु करण्यात आली होती. येथे दारुगोळ्यापासून फटाके तसेच अन्य शस्त्रांची निर्मिती आणि त्याच्या वापराबाबत प्रशिक्षण दिले जाऊ लागले. चीनच्या मिंग राजवंशने 13 ते 15 व्या शतकादरम्यान दक्षिण पूर्व अशिया, पूर्व भारत आणि अरब देशांमध्ये दारुगोळ्याची माहिती पोहोचवली.

First published:

Tags: Culture and tradition, Diwali 2021, Diwali-celebrations, Eco friendly Diwali