जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / डिप्रेशन आलेल्या कर्मचाऱ्याला नोकरीवरून काढणं पडलं महाग, कंपनीला द्यावे लागले 51 लाख

डिप्रेशन आलेल्या कर्मचाऱ्याला नोकरीवरून काढणं पडलं महाग, कंपनीला द्यावे लागले 51 लाख

डिप्रेशन आलेल्या कर्मचाऱ्याला नोकरीवरून काढणं पडलं महाग, कंपनीला द्यावे लागले 51 लाख

डिप्रेशनचा त्रास असलेल्या कर्मचाऱ्याला नोकरीवरून तडकाफडकी (Court fines company for firing employee passing through depression) काढून टाकण्याचा निर्णय कंपनीला चांगलाच महाग पडला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

ब्रिटन, 30 ऑक्टोबर: डिप्रेशनचा त्रास असलेल्या कर्मचाऱ्याला नोकरीवरून तडकाफडकी (Court fines company for firing employee passing through depression) काढून टाकण्याचा निर्णय कंपनीला चांगलाच महाग पडला आहे. मानसिक दृष्ट्या आजारी असलेल्या या कर्मचाऱ्याला (unable to join office) अनेकदा कार्यालयात हजर राहणं शक्य होत नव्हतं. गेल्या काही महिन्यांपासून त्याचं ऑफिसला दांड्या मारण्याचं प्रमाण वाढलं होतं. याला वैतागून त्याला नोकरीवरून (Boss fired from job) काढण्याचा निर्णय़ त्याच्या बॉसनं घेतला. मानसिक आजारामुळे दांड्या ब्रिटनमध्ये राहणारे 41 वर्षांचे डेन रो एका कंपनीत काम करत होते. देशातील प्रमुख कंपन्यांना किराणा माल पुरवण्याचं काम त्यांची कंपनी करते. डेन हे गेल्या 20 वर्षांपासून मानसिक तणावाखाली होते आणि डिप्रेशनवर उपचार घेत होते. याच काळात त्यांना काही शारीरिक व्याधीही जडल्या होत्या. त्यामुळे वरचेवर ऑफिसमध्ये सिक नोट पाठवून ते सुट्टी घेत होते. या प्रकाराने बॉस वैतागला होता. इव्हेंटला मारली दांडी डेन यांनी हजर राहणं अत्यावश्यक असणाऱ्या एका इव्हेंटला ते हजर राहू शकले नाहीत. त्यांनी काहीही करून या इव्हेंटला हजर राहावं, असा आदेश त्यांना कंपनीकडून देण्यात आला होता. मात्र तब्येत ठिक नसल्याने ते कार्यक्रमाला पोहोचू शकले नाहीत. यामुळे डोक्यात सणक गेलेल्या बॉसने त्यांना कामावरून काढून टाकलं. हे वाचा - G-20 समिटमध्ये बायडेन आणि मॅक्रॉनसह दिग्गज नेत्यांना भेटले पंतप्रधान मोदी कोर्टानं घेतली दखल कंपनीच्या या निर्णयाविरोधात त्यांनी कोर्टात धाव घेतली. कोर्टाने सुरुवातीला त्यांची याचिका फेटाळून लावली. त्यामुळे अधिकच निराश झालेल्या डेन यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र त्यातून ते वाचले. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी कोर्टात न्याय मागितला. त्यावेळी त्यांच्या अर्जाची दखल घेत न्यायालयानं कंपनीची चूक असल्याचा निर्णय दिला. मानसिक आजार असतानाही कंपनीनं कामावरून काढून टाकल्याप्रकरणी कंपनीनं डेन यांना 51 लाख रुपये देण्याचा आदेश दिला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात