मराठी बातम्या /बातम्या /Viral /पार्टीसाठी जाताना Eyes Lashes लावणं पडलं महागात, तरुणीची अशी झाली अवस्था; अनेक दिवसांपर्यंत दिसणंच झालं बंद

पार्टीसाठी जाताना Eyes Lashes लावणं पडलं महागात, तरुणीची अशी झाली अवस्था; अनेक दिवसांपर्यंत दिसणंच झालं बंद

पार्टीला जाण्यापूर्वी तिने रशियन आयलॅश एक्स्टेन्शन ही ब्युटी ट्रिटमेंट करून घेतली होती. पण त्या ट्रिटमेंटचा तिला नंतर प्रचंड त्रास झाला. तिच्या पापण्या चिकटल्या आणि तिला दिसतच नव्हतं.

पार्टीला जाण्यापूर्वी तिने रशियन आयलॅश एक्स्टेन्शन ही ब्युटी ट्रिटमेंट करून घेतली होती. पण त्या ट्रिटमेंटचा तिला नंतर प्रचंड त्रास झाला. तिच्या पापण्या चिकटल्या आणि तिला दिसतच नव्हतं.

पार्टीला जाण्यापूर्वी तिने रशियन आयलॅश एक्स्टेन्शन ही ब्युटी ट्रिटमेंट करून घेतली होती. पण त्या ट्रिटमेंटचा तिला नंतर प्रचंड त्रास झाला. तिच्या पापण्या चिकटल्या आणि तिला दिसतच नव्हतं.

    लंडन, 28 ऑक्टोबर : अनेक महिला आहे अधिक सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी मेकअप करतात. या मेकअपमध्ये पापण्यांना नकली पापण्या म्हणजे आय लॅशेसही लावल्या जातात. त्यामुळे डोळे अधिक आकर्षक दिसतात. पण कधीकधी हे महागातही पडू शकतं. असंच इंग्लंडमधील एका 25 वर्षांच्या तरुणीसोबत झालं आहे.

    इंग्लंडमधल्या 25 वर्षांच्या जेसिका शॅनन या मुलीने आपल्या मित्रांसोबत बर्थ डे पार्टी केली. पार्टीला जाण्यापूर्वी तिने रशियन आयलॅश एक्स्टेन्शन ही ब्युटी ट्रिटमेंट करून घेतली होती. पण त्या ट्रिटमेंटचा तिला नंतर प्रचंड त्रास झाला. तिच्या पापण्या चिकटल्या आणि तिला दिसतच नव्हतं. या विषयी जेसिका म्हणाली,‘सुरुवातीला डाव्या डोळ्यात रक्त दिसत होतं पण दुखत नव्हतं की खाजही येत नव्हती. पण झोपून उठल्यावर डोळा दुखायला लागला आणि प्रचंड खाज सुटली. डोळ्यांतून पाणी यायला लागलं. माझ्या पापण्या चिकटल्या होत्या. डोळ्यांत पाणी होतं त्यामुळे मी काहीच पाहू शकत नव्हते. नंतर डोळे आणि चेहरा इतका सुजला की जणू कुणी माझ्या चेहऱ्यावर मारलं आहे की काय असं वाटत होतं.’नकली पापण्या लावताना वापरलेल्या ग्लू अर्थात गमची जेसिकाला रिअक्शन झाली होती.

    काही दिवस जेसिकाचे डोळे चिकट झाले होते आणि तिला दिसत नव्हतं. दोन्ही पापण्या चिकटायच्या. डोळ्यांवर पाणी मारलं की थोडा वेळ पापण्या उघडायच्या पण नंतर परत बंद व्हायच्या. तिने फार्मसिस्टकडून आय ड्रॉप आणले आणि ते टाकून बघितलं पण काहीही उपयोग झाला नाही. त्यामुळे शेवटी जेसिकाने हॉस्पिटल गाठलं. तिची परिस्थिती गंभीर झाली होती. तिथल्या डॉक्टरांनी सांगितलं की जेसिकाला corneal abrasion झालं आहे. त्यांनी त्या आयलॅशेस काढल्या. पापण्या कडक झाल्या होत्या त्यामुळे नकली पापण्या काढायला डॉक्टरांना दीड तास लागले.

    स्वप्नातील राजकुमार भेटला पण...; Private part मुळे तिने केलं Breakup

    जेसिका म्हणाली, ‘मी हॉस्पिटलमधून आल्यानंतरही माझ्या डोळ्यांना अतिशय त्रास होत होता. मी सिंथेटिक पापण्या बसवून घेण्यासाठी 5 हजार रुपये खर्च केले होते. एक आठवडा औषधं घेतल्यानंतर मला थोडा आराम पडला. डॉक्टरांनी सांगितलं होतं की मला हॉस्पिटलमध्ये पोहोचायला आणखी थोडा उशीर झाला असता तर माझी दृष्टीच गेली असती.’

    सौंदर्याच्या मोहात भयंकर अवस्था! 4 वर्षे अंथरूणाला खिळलाय जिवंत तरुणीचा 'मृतदेह'

    जेसिकाचं उदाहरण सगळ्यांनीच लक्षात ठेवण्यासारखं आहे. सुंदर दिसण्याच्या इच्छेपोटी विकतचं दुखणं घेणं शारीरिक आणि आर्थिक दोन्ही दृष्टींनी परवडणारं नाही.

    First published:

    Tags: Eyes damage