Explainer: अफगाणिस्तानातून सुटकेच्या भारतीय मोहिमेचा दुर्गा मातेशी असा आहे संबंध

Explainer: अफगाणिस्तानातून सुटकेच्या भारतीय मोहिमेचा दुर्गा मातेशी असा आहे संबंध

अफगाणिस्तानातून सुटकेच्या भारतीय मोहिमेला ऑपरेशन देवी शक्ती (Operation Devi Shakti) असं नाव देण्यात आलं आहे. काय आहे त्यामागचं कारण?

  • Share this:

नवी दिल्ली, 27 ऑगस्ट : देशाची राजवट अचानक तालिबान (Taliban) या दहशतवादी संघटनेच्या हाती गेल्यामुळे अत्यंत अस्थिर आणि हिंसक परिस्थिती निर्माण झालेल्या अफगाणिस्तानात (Afghanistan crisis) अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी भारताकडून विशेष मोहीम राबवली जात आहे. त्या मोहिमेला ऑपरेशन देवी शक्ती (Operation Devi Shakti) असं नाव देण्यात आलं आहे. या मोहिमेला हे नाव कसं देण्यात आलं, याबद्दलची माहिती संबंधित काही सूत्रांकडून मिळाली.

मां दुर्गा (Maa Durga) अर्थात दुर्गामाता ही आदिशक्ती आहे. ती ज्याप्रमाणे सैतानांच्या तावडीतून निष्पाप भक्तांना वाचवते, त्याचप्रमाणे ही मोहीमदेखील निरागस, निष्पाप नागरिकांना वाचवण्यासाठीच आहे. त्यामुळे या मोहिमेला ऑपरेशन देवी शक्ती असं नाव देण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) स्वतः दुर्गादेवीचे भक्त आहेत. नवरात्रौत्सवात ते स्वतः नऊ दिवस काहीही न खाता केवळ गरम पाणी पिऊन उपवास करतात. मोदींच्या देवीभक्तीचा संदर्भही या मोहिमेच्या नामकरणाशी असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

अमेरिकेची मदत करणारा हा डेटाच होऊ शकतो विनाशाचं कारण; तालिबानच्या हाती लागला तर.

संरक्षणविषयक मंत्रिमंडळ समितीच्या (CCS) ताज्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सहकाऱ्यांना सूचना दिल्या, की अफगाणिस्तानात अडकलेल्या नागरिकांची सुटका करताना केवळ मानवता (Only Humanitarian Angle) हा एकच निकष ठेवण्यात आला पाहिजे. अफगाणिस्तानात भारत सरकारने जी विमानं पाठवली होती, त्यातून हिंदू (Hindu) आणि शीख (Shikh) या तिथल्या अल्पसंख्याक समाजांच्या नागरिकांना तर भारतात आणण्यात आलंच; पण सध्याच्या बिकट परिस्थितीत अनेक अफगाणी नागरिकांनीही भारतात येण्याचा निर्णय घेतला, असं त्यांनी सांगितलं.

9/11 चा हल्ला ओसामा बिन लादेनने केलाच नव्हता, तालिबानचा दावा

मंगळवारी (24 ऑगस्ट) अफगाणिस्तानातून 78 जणांना भारतात आणण्यात आलं. त्यात 25 भारतीय नागरिक आणि अनेक अफगाणी शीख व हिंदू होते. गुरुग्रंथसाहिब (Guru Granth Sahib) या शीखांच्या पवित्र धर्मग्रंथाच्या तीन प्रतींसह या व्यक्तींच्या गटाला सोमवारी काबूलमधून भारतीय हवाई दलाच्या विमानाने ताजिकिस्तानमधल्या दुशांबे (Dushanbe) येथे आणण्यात आलं. तिथून मंगळवारी एअर इंडियाच्या विमानाने त्यांना भारतात आणण्यात आलं. 15 ऑगस्टला तालिबानने अफगाणिस्तानची राजधानी काबूलचा ताबा घेतल्यानंतर 16 ऑगस्ट रोजी भारताने पहिल्यांदा अफगाणिस्तानातून बचाव मोहिमेला सुरुवात केली होती. आतापर्यंत तिथून दिल्लीत आणण्यात आलेल्या नागरिकांची संख्या 800 हून अधिक आहे. केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी आणि व्ही. मुरलीधरन यांनी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्या सर्व नागरिकांचं स्वागत केलं. गुरुग्रंथसाहिबसह या सर्वांचं स्वागत करताना आनंद झाल्याची ट्विट्स या दोन्ही मंत्र्यांनी केली आहेत. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनीही त्याबद्दलची माहिती दिली होती.

तालिबानच्या भीतीने लोकप्रिय अफगाणी गायकाने सोडले गाणे, पाहा PHOTOs

दरम्यान, भारताने सोमवारी कतारची राजधानी दोहा इथून चार वेगवेगळ्या विमानांतून 146 भारतीयांना दिल्लीत आणलं. काही दिवसांपूर्वी नाटो आणि अमेरिकेच्या विमानाने त्यांना काबूलवरून दोहा इथे नेऊन सोडलं होतं.

तालिबानने काबूलचा ताबा घेतल्यानंतर दोनच दिवसांत भारताने भारताच्या दूतांसह तिथल्या दूतावासातले कर्मचारी आणि अन्य नागरिक अशा 200 जणांची तिथून सुटका केली होती. तिथून 16 ऑगस्ट रोजी भारतात आलेल्या पहिल्या विमानात 40 हून अधिक नागरिक होते. त्यातले बहुतांश नागरिक म्हणजे दूतावासातले कर्मचारी होते.

First published: August 27, 2021, 7:15 AM IST

ताज्या बातम्या