• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • 9/11 चा हल्ला ओसामा बिन लादेनने केलाच नव्हता, सत्ता मिळताच तालिबानच्या तोंडी अल-कायदाची भाषा

9/11 चा हल्ला ओसामा बिन लादेनने केलाच नव्हता, सत्ता मिळताच तालिबानच्या तोंडी अल-कायदाची भाषा

अमेरिकेवर (USA) झालेला 9/11 चा हल्ला (9/11 attack) ओसामा बिन लादेनने (Osama Bin Laden) केलाच नव्हता, असा दावा तालिबानने (Taliban) केला आहे.

 • Share this:
  काबुल, 26 ऑगस्ट : अमेरिकेवर (USA) झालेला 9/11 चा हल्ला (9/11 attack) ओसामा बिन लादेनने (Osama Bin Laden) केलाच नव्हता, असा दावा तालिबानने (Taliban) केला आहे. अमेरिकेवर झालेल्या हल्ल्यात ओसामा बिन लादेनचा हात असल्याचे कुठलेही पुरावे (proof) नसल्याचं तालिबाननं म्हटलं आहे. अमेरिकेला अफगाणिस्तानवर हल्ला करण्यासाठी काहीतरी निमित्त हवं होतं. त्यामुळेच अमेरिकेनं लादेनचा संबंध हल्ल्यांशी लावून अफगाणिस्तानवर हल्ला केल्याचा दावा तालिबानचे प्रवक्ते जबीबुल्लाह मुजाहिद यांनी केला आहे. काय आहे तालिबानचा दावा अमेरिकेवर हल्ला झाला, त्यावेळी ओसामा बिन लादेन अफगाणिस्तानात होता, हे खरं आहे. मात्र लादेनने हल्ला केला, याचे कुठलेही पुरावे उपलब्ध नाहीत. 20 वर्षांनंतरही लादेनचा हल्ल्याशी संबंध असणारे कुठलेही ठोस पुरावे अमेरिका सादर करू शकली नसल्याचा दावा तालिबानचे प्रवक्ते जबीबुल्लाह मुजाहिद यांनी केला आहे. अमेरिका सुडाच्या भावनेने पेटलेली होती आणि काहीही करून अमेरिकेला एक व्हिलन उभा करायचा होता. त्यासाठीच ओसामा बिन लादेनच्या नावाचा वापर अमेरिकेने केल्याचा दावाही तालिबाननं एनबीसी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. दहशतवादाला थारा नाही तालिबानच्या सत्ताकाळात अल कायदाने अफगाणिस्तानच्या भूमीवरून दहशतवादी कारवाया केल्या होत्या. भविष्यात पुन्हा असा प्रकार घडू शकतो का, असा सवाल पत्रकारांनी विचारला असता, तालिबान आता दहशतवादाला थारा देणार नसल्याचं तालिबाननं सांगितलं आहे. यापुढे अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर कुठल्याही दहशतवादी कारवायांसाठी होऊ दिला जाणार नाही, असा दावा तालिबानच्या प्रवक्त्यांनी केला आहे. हे वाचा -काबूलसाठी केंद्र सरकारनं घेतला मोठा निर्णय, लवकरच आखणार धोरण वास्तविक, 9/11 च्या हल्ल्याच्या वेदना अमेरिका अजूनही विसरू शकलेली नाही. आपला परिवार गमावल्यामुळे सुडाच्या भावनेने पेटलेला ओसामा बिन लादेन हाच हल्ल्याला मास्टरमाइंड असल्याचा उल्लेख अनेक रिपोर्ट्समधून करण्यात आला आहे.
  Published by:desk news
  First published: