तालिबानमध्ये अफगाणिस्तानची सत्ता आल्यानंतर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. तिथल्या राष्ट्राध्यक्षांपासून सर्वसामान्यांपर्यंत अनेकजण देश सोडून निघून जाणं पसंत करत आहेत. अनेक कलाकारांनीदेखील देश सोडण्याचा निर्णय घेतला आहे. अफगाणिस्तानमधील प्रसिद्ध आणि लोकप्रिय गायक हबीबुल्लाह शाबाब यांनीदेखील आपलं गाणं बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.