Home /News /explainer /

10 कोटींहून अधिक मृत्यू, 2 अब्ज लोकांची उपासमार आणि जग 18 हजार वर्ष पिछाडीवर... Nuclear War झाल्यास दिसतील भयंकर परिणाम!

10 कोटींहून अधिक मृत्यू, 2 अब्ज लोकांची उपासमार आणि जग 18 हजार वर्ष पिछाडीवर... Nuclear War झाल्यास दिसतील भयंकर परिणाम!

रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमिवर 'न्युक्लिअर वॉर' (Nuclear War) ही संकल्पना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. जर भविष्यात न्युक्लिअर वॉर झालं तर काय परिणाम होतील, याच्या शक्यता पडताळून पाहिल्या जात आहेत.

मुंबई, 02 मार्च: रशिया आणि युक्रेनमधील तणाव शांत होण्याची चिन्ह दिसत नाहीत. सोमवारी (28 फेब्रुवारी 22) बेलारूसमध्ये आयोजित करण्यात आलेली दोन्ही देशांदरम्यानची चर्चा निष्फळ ठरली आहे. रशिया-युक्रेन युद्धाच्या (Russia-Ukraine War) पार्श्वभूमीवर युरोप-अमेरिकेतील हालचालींना वेग आला आहे. रशियाच्या बाजूने युक्रेनची राजधानी कीव्हवरील हल्ले अधिक तीव्र केले गेले आहेत. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांनी तर युद्धात अणुबॉम्ब (Nuclear Bomb) वापरण्याचीही धमकी दिली होती. रशियानं आमच्यावर 'व्हॅक्युम बॉम्ब' (Vacuum Bomb) या 'थर्मोबॅरिक वेपन'चा वापर केल्याचा आरोप युक्रेनच्या अमेरिकेतील दूतावासानं केला केला आहे. या पार्श्वभूमीवर 'न्युक्लिअर वॉर' (Nuclear War) ही संकल्पना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. जर भविष्यात न्युक्लिअर वॉर झालं तर काय परिणाम होतील, याच्या शक्यता पडताळून पाहिल्या जात आहेत. हिरोशिमा-नागासाकीचा भयावह इतिहास मानवी इतिहासामध्ये आतापर्यंत फक्त दोनदा अणुबॉम्बचा वापर झाला आहे. दुसऱ्या महायुद्धातील (Second World War) शेवटच्या टप्प्यात अमेरिकेनं अणुबॉम्बचा वापर केला होता. अमेरिकेनं ऑगस्ट 1945 मध्ये जपानमधील हिरोशिमा (Hiroshima) आणि नागासाकी (Nagasaki) या दोन शहरांवर अणुबॉम्ब टाकले होते. हे हल्ले इतके जोरदार होते की काही मिनिटांतच लाखो लोक मरण पावले. गेल्या कित्येक वर्षांपासून तेथील लोक अणुबॉम्ब हल्ल्यांचे परिणाम सहन करत आहेत. दुसऱ्या महायुद्धात जपान माघार घेण्यास तयार नव्हता. तेव्हा अमेरिकेनं हिरोशिमावर 6 ऑगस्ट आणि नागासाकीवर 9 ऑगस्ट 1945 रोजी अणुबॉम्ब टाकले होते. हिरोशिमावर पडलेल्या अणुबॉम्बमुळे 1945 च्या अखेरपर्यंत एक ला 40 हजार जणांचा मृत्यू झाला होता. नागासाकीवर पडलेल्या अणुबॉम्बचे रेडिएशन्स 6.7 किमीपर्यंत पसरले होते व 1945 च्या अखेरपर्यंत तिथे 74 हजार लोकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यांनंतर जमिनीच्या पृष्ठभागाचे तापमान 4 हजार अंश सेल्सिअसवर पोहोचलं होतं. नंतरच्या पिढींनी देखील या हल्ल्याचे दुष्परिणाम भोगले आहेत. हे वाचा-भारतीयांसाठी रशियाकडून सहा तासांचा वेळ, खार्कीव्ह सोडण्यासाठी काऊंटडाऊन सुरु जेव्हा एखादा अणुबॉम्ब पडतो तेव्हा फक्त 10 सेकंदात विध्वंस (Destruction) होतो; पण त्याचा प्रभाव अनेक दशकं टिकतो. जपानमधील बॉम्बस्फोटांनंतर अनेक वर्षे लोटली आहेत. आजदेखील तेथील लोक ल्युकेमिया, कॅन्सर आणि फुफ्फुसाच्या धोकादायक आजारांशी लढा देत आहेत. एवढंच नाही तर लाखो लोकांची दृष्टीही गेली होती. विविध देशांची किती आहे अण्वस्त्र शक्ती? जगभरातील अण्वस्त्रांच्या (Nuclear Weapons) उपलब्धेतेचा आढावा घेतल्यास त्यांची एकूण संख्या किती आहे, याची आपल्याला कल्पना येऊ शकते. फेडरेशन ऑफ अमेरिकन साइंटिस्ट या संस्थेच्या आकडेवारीनुसार सध्या रशियाजवळ 5 हजार 977, अमेरिकेजवळ 5 हजार 428, चीनजवळ 350, फ्रान्स 290, यूके 225, पाकिस्तान 165, भारत 160, इस्रायल 90 आणि उत्तर कोरियाजवळ 20 न्युक्लिअर वेपन्स आहेत. चीन, भारत, उत्तर कोरिया, पाकिस्तान, यूके आणि रशियातील न्युक्लिअर वेपनच्या संख्येमध्ये वाढ होत असून अमेरिकेतील वेपनच्या संख्येमध्ये घट होत आहे. न्युक्लिअर वेपन्सची ही संख्या पाहता जर भविष्यात न्युक्लिअर वॉर झालं तर मनुष्यजातीच्या हाती विनाशाशिवाय दुसरं काहीही लागणार नाही. हे वाचा-'ही चिन्ह आणतील विनाश!' युक्रेनमधल्या इमारतींवरील Mystery Marks मुळे वाढली भीती ...तर 10 कोटींचा होईल मृत्यू द इंटरनॅशनल कॅम्पेन टू अबॉलिश न्यूक्लियर वेपन (ICAN) ही स्वित्झर्लंडमधील संस्था आहे. या संस्थेला 2017 मध्ये शांततेचा नोबेल पुरस्कारही मिळाला आहे. आयसीएएनच्या मते, एक अणुबॉम्ब एका झटक्यात लाखो लोकांचा बळी घेतो. जर एकाचवेळी 10 किंवा शेकडो बॉम्ब पडले तर कोट्यवधी मृत्यू तर होतीलच शिवाय पृथ्वीची संपूर्ण क्लायमेट सिस्टीमदेखील (Climate System) बिघडेल. आज तकनं याबाबत वृत्त दिलं आहे. आयसीएएनच्या मते, एका अणुबॉम्बमध्ये संपूर्ण शहर नष्ट करण्याची क्षमता असते. अमेरिका आणि रशियामध्ये मोठं न्युक्लिअर वॉर झालं तर मृतांचा आकडा 100 दशलक्षांचा वर जाईल. मुंबई (Mumbai) सारख्या शहरात एक किलोमीटरच्या परिघात एक लाखांहून अधिक लोक राहतात. तिथे हिरोशिमासारखा अणुबॉम्ब पडला तर आठवडाभरात 8.70 लाखांहून अधिक मृत्यू होतील. अमेरिका आणि रशिया यांच्यातील अणुयुद्धात 500 अणुबॉम्ब जरी वापरले गेले तरी अर्ध्या तासात 10 कोटींहून अधिक लोकांचा मृत्यू होईल. एवढेच नाही तर जगात सध्या असलेल्या न्युक्लिअर वेपन्सपैकी केवळ एक टक्का जरी वेपन्स युद्धात वापरली गेली तर 2 अब्ज लोक उपासमारीच्या उंबरठ्यावर येतील. यासोबतच संपूर्ण आरोग्य यंत्रणाही (Health System) उद्ध्वस्त होईल. त्यामुळे जखमींना उपचारसुद्धा मिळू शकणार नाहीत. हे वाचा-सगळीकडे आक्रोश अन् कानठाळ्या बसवणारा आवाज! 'आम्ही खूप घाबरलोय... हवामानावर होतील भीषण परिणाम हिरोशिमावर जो अणुबॉम्ब टाकला होता, त्याच आकाराचे 100 अणुबॉम्ब पडले तर पृथ्वीची संपूर्ण व्यवस्था बिघडेल. अशा हल्ल्यांचा क्लायमेट सिस्टीम आणि शेतीवर (Farming) वाईट परिणाम होईल. सध्या संपूर्ण जग ग्लोबल वॉर्मिंगशी झुंजत आहे. पण, जर न्युक्लिअर वॉर झालं तर पृथ्वीचं तापमान  झपाट्याने कमी होईल. कारण या हल्ल्यांमुळे इतका धूर निघेल की पृथ्वीचा पृष्ठभाग गोठून जाईल. असा अंदाज आहे की, जर न्युक्लिअर वॉर झालं तर पृथ्वीवरील किमान 10 टक्के भागावर सूर्यप्रकाश मिळणार नाही. जर जगभरातील सर्व अण्वस्रं एकाचवेळी वापरली गेली, तर पृथ्वीच्या स्ट्रॅटोस्फियरमध्ये 150 दशलक्ष टन धूर जमा होईल. स्ट्रॅटोस्फियर हा ओझोन थराच्या वर असणारा पृथ्वीचा वातावरणाचा बाह्यभाग आहे. अगदी तिथपर्यंत अणुस्फोटांचा धूर जाईल. हे वाचा-रशिया-युक्रेन युद्धादरम्यान भारतातील आणखी एका विद्यार्थ्याचा मृत्यू, चिंता वाढली 18 हजार वर्ष मागे जाईल जग एवढेच नाही तर जगातील बहुतांश भागात पाऊस पडणार नाही. जागतिक पर्जन्यमान 45 टक्क्यांनी कमी होईल. पृथ्वीच्या पृष्ठभागाचं सरासरी तापमान -7 ते -8 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचेल. साधारण 18 हजार वर्षांपूर्वी जेव्हा हिमयुग (Ice Age) होतं. तेव्हा तापमान -5 डिग्री सेल्सियस होतं. म्हणजेच जर भविष्यात न्युक्लिअर वॉर झालं आणि सर्व न्युक्लिअर वेपन्सचा वापर झाला तर जग 18 हजार वर्षे मागे जाईल. एकूण शक्यतांची पडताळणी केली असता कुठल्याही प्रकारचं न्युक्लिअर वॉर पृथ्वी सहन करू शकणार नाही. येत्या काळात एखादी जरी अणुबॉम्ब वापरण्यात आला तरी त्याचे परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागतील.
First published:

Tags: Nuclear weapons, Russia, Russia Ukraine, Russia's Putin, United States of America

पुढील बातम्या