मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

Russia Ukraine War : रशिया-युक्रेन युद्धादरम्यान भारतातील आणखी एका विद्यार्थ्याचा मृत्यू, चिंता वाढली!

Russia Ukraine War : रशिया-युक्रेन युद्धादरम्यान भारतातील आणखी एका विद्यार्थ्याचा मृत्यू, चिंता वाढली!

या घटनेमुळे चिंता वाढली आहे.

या घटनेमुळे चिंता वाढली आहे.

या घटनेमुळे चिंता वाढली आहे.

  • Published by:  Meenal Gangurde

नवी दिल्ली, 2 मार्च : Russia Ukraine War : रशिया-युक्रेन युद्धादरम्यान युक्रेनमधील विद्यार्थ्यांना भारतात आणण्यासाठी परोपरीने प्रयत्न केले जात आहे. आतापर्यंत विद्यार्थ्यांचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. ज्यात विद्यार्थी भारत सरकारकडे मदतीची (Indian Students In Ukraine) मागणी करीत आहे. याच दरम्यान मंगळवारी 1 मार्च रोजी एका भारतीय विद्यार्थ्याचा रशियाने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला. त्यानंतर आता आणखी एक बातमी समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, युक्रेनमध्ये आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू (Indian student death in Russia-Ukraine war ) झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तो आजारी होता. त्यातच त्याचा मृत्यू झाला. गेल्या अनेक दिवसांपासून तो आजारी होता, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. या तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू होते.

रशिया-युरोप युद्धादरम्यान नवीन शेखरप्पा या भारतीय विद्यार्थ्याचा खार्किव्ह शहरात मृत्यू झाल्याची दुखद बातमी काल समोर आली. या घटनेमुळे संपूर्ण भारतावर शोककळा पसरली आहे. युक्रेनमध्ये अद्यापही शेकडो भारतीय विद्यार्थी अडकलेले आहेत. दरम्यान, नवीनच्या मृत्यूआधी त्याचं त्याचा जवळचा रुममेट आणि मित्र असलेल्या श्रीकांत चन्नेगौडा याच्याशी फोनवर बोलणं झालं होतं.

हे ही वाचा- Russia-Ukraine War : रशियन सैन्याचा युक्रेनमध्ये टीव्ही टॉवरवर हल्ला, LIVE VIDEO

त्यावेळी नवीनने आपण सुपरमार्केटमध्ये खाण्यासाठी काहीतरी घ्यायला आलो असल्याची माहिती दिली होती, असं श्रीकांतने सांगितलं. त्यानंतर दहा मिनिटांनी श्रीकांतने जेव्हा पुन्हा नवीनला पुन्हा फोन केला तेव्हा एका युक्रेनियन महिलेने फोन उचलला होता. ती जीवाच्या आकांताने रडत होती. त्यानंतर रशियन सैनिकांनी केलेल्या गोळीबारात आपल्या मित्राचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्याचं श्रीकांतने रडतरडत News18 ला सांगितलं.

First published:

Tags: Death, Russia Ukraine, Student