मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

सगळीकडे आक्रोश अन् कानठाळ्या बसवणारा आवाज! 'आम्ही खूप घाबरलोय... भारतीय विद्यार्थ्याने सांगितली व्यथा

सगळीकडे आक्रोश अन् कानठाळ्या बसवणारा आवाज! 'आम्ही खूप घाबरलोय... भारतीय विद्यार्थ्याने सांगितली व्यथा

News18 spoke exclusively to Indian students of ukraine : 'तिथली परिस्थिती खूपच वाईट झाली आहे. युक्रेन ते पोलंडच्या सीमेवर जाण्यासाठी आम्हाला प्रति व्यक्ती 60 हजार रुपये भाडे आकारले जात आहे, अशी व्यथा एका विद्यार्थ्याने न्यूज 18 शी फोनवर बोलताना सांगितली.

News18 spoke exclusively to Indian students of ukraine : 'तिथली परिस्थिती खूपच वाईट झाली आहे. युक्रेन ते पोलंडच्या सीमेवर जाण्यासाठी आम्हाला प्रति व्यक्ती 60 हजार रुपये भाडे आकारले जात आहे, अशी व्यथा एका विद्यार्थ्याने न्यूज 18 शी फोनवर बोलताना सांगितली.

News18 spoke exclusively to Indian students of ukraine : 'तिथली परिस्थिती खूपच वाईट झाली आहे. युक्रेन ते पोलंडच्या सीमेवर जाण्यासाठी आम्हाला प्रति व्यक्ती 60 हजार रुपये भाडे आकारले जात आहे, अशी व्यथा एका विद्यार्थ्याने न्यूज 18 शी फोनवर बोलताना सांगितली.

पुढे वाचा ...
  • Published by:  Rahul Punde
नवी दिल्ली, 2 मार्च : 'आम्ही यापुढे इथे थांबू शकत नाही, ही जागा आमच्यासाठी सुरक्षित नाही. आम्ही खूप घाबरलो आहोत. अद्याप आमच्यापर्यंत कोणतीही मदत पोहोचलेली नाही. म्हणूनच आम्ही स्वतः धोका पत्करून भारताचा झेंडा हातात घेऊन युक्रेनच्या रेल्वे स्थानकांवर पोहोचत आहोत. कोणत्याही साधनाने, नाही तर पायी. कारण सुरक्षित स्थळी पोहोचण्याचा हा एकमेव मार्ग उरला आहे.'' ही व्यथा युक्रेनमधील (Ukriane) फैसल कासिमने न्यूज 18 शी फोनवर बोलताना सांगितली. तो मूळचा केरळचा आहे. खार्किव्ह मेडिकल युनिव्हर्सिटी युक्रेन येथे तो शिक्षण घेतोय. फैसलसोबत जवळपास 200 भारतीय विद्यार्थी आहेत. हे सर्व जण आतापर्यंत मेडिकल युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये बांधलेल्या बंकरमध्ये राहत होते. मात्र, युक्रेनवर रशियन सैन्याचा हल्ला (Russian Army Attack on Ukraine) तीव्र झाल्यानंतर हे सर्वजण तेथून निघून जवळच्या रेल्वे स्थानकाकडे निघाले आहेत. मात्र, हे लोक कोणत्या रेल्वे स्थानकाच्या दिशेने जात आहेत हे त्यांना सांगता आले नाही. अगदी थोडक्यात झालेल्या संभाषणात तो म्हणाला, 'जिथे योग्य वाटेल, सुरक्षित वाटेल, तिथे जाईन. पण इथे राहू शकत नाही. जर तुम्ही (मीडिया) आमच्यासाठी काही करू शकत असाल तर फक्त एवढीच आमची स्थिती भारतातील जनतेला आणि सरकारपर्यंत पोचवावी, यानंतर त्यांनी फोन ठेऊन दिला. कारण त्यांना घरातील सदस्यांशी बोलण्यासाठी मोबाईलची बॅटरी वाचवायची होती. खार्किव्ह (Kahrkiv) हे तेच ठिकाण आहे, जिथे नवीन शेखरगौडा ग्यानगौदार या भारतीय विद्यार्थ्याचा रशियन सैन्याने (Russian Army) केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. तो कर्नाटकचा (Karnataka) रहिवासी होता. त्यांच्या मृत्यूने भारतीय विद्यार्थ्यांमध्ये आणखी घबराट पसरली आहे. अमित वैश्यर हा नवीनसोबत त्याच्या खोलीत राहत होता. तोही कर्नाटकातील हावेरी शहरातील रहिवासी आहे. नवीनच्या मृत्यूनंतर अमित त्याच्या साथीदारांसह घरापासून 3 किमी अंतरावर असलेल्या खार्किव्ह रेल्वे स्थानकाकडे (Kharkiv Railway Station) पायी निघाला. मोठी बातमी! भारतीयांनो आज संध्याकाळी सहापर्यंत खार्कीव्ह सोडा, महत्त्वाची सूचना त्यांनी News18 ला सांगितले की, 'आम्ही संपूर्ण अंतर पायीच कापले. भारताचा ध्वज हातात घेऊन, आपल्याला कुणीही लक्ष्य करु नये या आशेने चाललो आहे. युक्रेनच्या बाहेर जाण्यासाठी खार्किव्हहून फक्त दोनच गाड्या आहेत. एक स्थानिक वेळेनुसार सकाळी 10 वाजता दुसरी दुपारी 3 वाजता. त्यामुळे आमच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. 'नवीनही आमच्यासोबत असता, पण..’ नवीन ग्यानगौदरचा आणखी एक सहकारी श्रीकांतनेही असाच किस्सा सांगितला. 60,000 रुपयांपर्यंत व्हॅनचे भाडे येथे परमब्रत अभिनव हे युक्रेनमधून भारतात सुखरूप परत आलेल्या मोजक्या विद्यार्थ्यांपैकी एक आहेत. अभिनव मंगळवारीच नवी दिल्लीत आला आहे. न्यूज 18 शी संवाद साधताना तो म्हणाला, 'तिथली परिस्थिती खूपच वाईट झाली आहे. युक्रेन ते पोलंडच्या सीमेवर जाण्यासाठी आम्हाला प्रति व्यक्ती 1,500 रिनिया (Ukrainian Currency Hryvnia) पर्यंत पैसे द्यावे लागले. 25-30 जण एका व्हॅनमध्ये कोंबून आणले होते. प्रथम आम्हाला रवा-रुस्का सीमेवर (Rava-Ruska Border) नेण्यात आले. पण तिथून युक्रेनच्या लष्कराने (Ukraine Army) आम्हाला परत पाठवले. त्यानंतर शेहनी सीमेवर(Shehyni Border)  आणून सोडण्यात आले. अशा परिस्थितीत भारतीय चलनानुसार, प्रति व्हॅन 60,000 रुपयांपर्यंत भाडे आकारले जात आहे. रशिया-युक्रेनच्या युद्धात पाकिस्तानी विद्यार्थ्यांनीही घेतला तिरंग्याचा आसरा! ज्या विद्यार्थ्यांना मारहाण झाली ते अनियंत्रित झाले होते व्हायरल व्हिडिओमध्ये युक्रेनियन सैनिक काही विद्यार्थ्यांना मारहाण करताना दिसल्याच्या घटनेवरही अभिनवने प्रकाश टाकला. तो म्हणाला, 'युक्रेन आणि पोलंडच्या सीमेवर विविध देशांतील हजारो लोक अडकले आहेत. युक्रेनचे सैनिक एका तासात फक्त 4-5 लोकांना सीमा ओलांडू देत आहेत. दरम्यान, त्यादिवशी एक अफवा पसरली की प्रथम सर्व महिला आणि मुलांना सीमा ओलांडण्यास परवानगी दिली जाईल. मग पुरुषांना जाऊ दिले जाईल. यामुळे काही भारतीय विद्यार्थी अनियंत्रित झाले. त्यांनी गेटवर गोंधळ घातला. तेथे तैनात असलेल्या जवानांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यानंतर युक्रेनच्या सैनिकांनी त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. कुणीतरी त्याचा व्हिडिओ बनवला. आई-वडील म्हणाले.. आता वाट पाहण्याची सहनशक्ती संपली अमितचे वडील व्यंकटेश आणि आई सविता वैश्यार इथे भारतात अस्वस्थ आहेत. व्यंकटेश सांगतात, “आधी आम्ही आमच्या मुलांना (मुलगा आणि त्याचे मित्र) सुरक्षित ठिकाणी लपायला सांगितले होते. पण नवीनच्या मृत्यूनंतर हे लोक पुढचे टार्गेट नसावेत, असे आम्हाला वाटले. त्यामुळे त्याला तातडीने खार्किव्ह सोडण्यास सांगितले. आम्ही दर तासाला त्याच्याशी बोलत असतो. त्याची तब्येत विचारत आहे.' तर सविता म्हणाल्या, 'आम्ही आता जास्त काळ वाट पाहू शकत नाही. आम्ही त्यांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगितले आहे. पण आमची मुलं केव्हा सुरक्षित होतील माहीत नाही.
First published:

Tags: Russia Ukraine, Student

पुढील बातम्या