खार्कीव्ह (युक्रेन), 2 मार्च : रशिया (Russia) आणि युक्रेन (Ukrain) यांच्यातील युद्धादरम्यान युक्रेनमध्ये असलेल्या भारतीयांची प्रचंड फरफट होताना दिसत आहे. रशियाकडून करण्यात आलेल्या गोळीबार (Firing) आणि बॉम्ब हल्ल्यात आतापर्यंत दोन भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. रशियाकडून युक्रेनच्या मोठमोठ्या शहरांमध्ये हल्ला सुरु आहे. या शहरांमध्ये भारतीयदेखील अडकले आहेत. यापैकी अनेक भारतीय हे युक्रेनच्या सीमाभागतून शेजारच्या राष्ट्रांमध्ये जाण्यात यशस्वी ठरले आहेत. पण अद्यापही बरेच भारतीय विद्यार्थी आणि नागरीक या शहरांमध्ये अडकले आहेत. यापैकी एक म्हणजे खार्कीव्ह शहर. खार्कीव्ह शहरावर रशियन सैन्य कधीही ताबा घेऊ शकतं. तिथे कदाचित मोठा विध्वंस होऊ शकतो. पण त्याआधी भारतीय नागरिकांना तिथून दुसरीकडे वळवणं रशियाच्या दृष्टीकोनाने महत्त्वाचं ठरणार आहे. भारताच्या विनंतीनंतर अखेर रशियाने खार्कीव्हसाठी एक गोष्ट मान्य केली आहे. भारतीय नागरिकांनी तातडीने खार्कीव्ह सोडण्यासाठी रशियाकडून सहा (आतापासून तीन तास) तासांचा कालावधी देण्यात आला आहे. भारतीय विद्यार्थी आणि नागरिकांनी तातडीने खार्कीव्ह सोडावं असं आव्हान करण्यात आलं आहे. रशियाला खार्कीव्ह शहरावर ताबा मिळवण्यास विलंब लावायचा नाहीय. त्यामुळे त्यांनी अखेर भारतीय नागरिकांसाठी सहा तासांचा वेळ दिला आहे. या सहा तासात भारतीयांनी तातडीने शहर सोडावं असं सांगण्यात आलं आहे. पण इतक्या कमी वेळात भारतीयांना बाहेर काढणं कठीण आहे. विशेष म्हणजे युक्रेनमधील भारतीय दुतावासाने सर्व भारतीयांना गाडी मिळत नसेल तर पायी चालत जाऊन शहर सोडण्याचं आवाहन केलं आहे. रशियन सैन्याने भारतीयांसाठी हल्ला करणं थांबवलं आहे. पण या तीन तासांच्या शांततेनंतर खार्कीव्हमध्ये काय घडेल याचा काहीच अंदाज बांधता येणार नाही, असं बोललं जात आहे.
The Russians apparently agreed to a six hour window for allowing safe passage to all Indians in Kharkiv before an all-out assault begins tonight . The deadline is 2130 IST, about 3 hours from now. #UkraineWar
— Nitin A. Gokhale (@nitingokhale) March 2, 2022
आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, रशियन पॅराट्रूपर्स खार्कीव्हमध्ये तीन किंवा चार वेगवेगळ्या ठिकाणी उतरले आहेत आणि या एन्क्लेव्हवर त्यांचे नियंत्रण आहे. दरम्यान, भारतीयांना युक्रेनच्या वेळेनुसार आज रात्री साडेनऊपर्यंत कोणत्याही परिस्थितीत खार्कीव्ह सोडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. ( ST कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला मोठा धक्का, विलीनीकरणाची मागणी समितीने सुद्धा नाकारली! ) खार्कीव्हमध्ये असलेल्या भारतीय दुतावासाने (Indian Embassy) एक महत्त्वाची सूचना आज जारी केली. या सूचनेत त्यांनी सर्व भारतीयांना तातडीने खार्कीव्ह सोडण्याचा सल्ला देण्यात आला. “खार्कीव्हमधील सर्व भारतीय नागरिकांना तातडीचा सल्ला. त्यांनी स्वत:च्या सुरक्षेसाठी तातडीने खार्कीव्ह सोडावे. शक्य तितक्या लवकर पेसोचिन, बाबे, बेझल्युडोव्काच्याकडे जा. युक्रेनियन वेळेनुसार सर्वांनी संध्याकाळच्या सहा वाजेपर्यंत खार्कीव्ह सोडावं”, असा सल्ला भारतीय दूतावासाकडून देण्यात आला आहे. विशेष म्हणजे खार्कीव्हमधील परिस्थिती जास्त चिघळत असल्याने भारतीय दुतावासाने आणखी एक नवी गाईडलाईन जारी केली. त्यामध्ये भारतीयांना तातडीने शक्य होईल तसं खार्कीव्ह सोडण्याची सूचना दिली. भारतीयांनी गाडी मिळाली नाही तर पायी शगरापासून लांब जावं. खार्कीव्हपासून 12 किमी लांब बाबाये, बेजल्यपदोवक 16 आणि पेसोचिन 11 किमीवर आहे. त्या भागांमध्ये भारतीयांनी जावे, अशी सूचना देण्यात आली होती.