न्यूयॉर्क, 24 नोव्हेंबर: DART Mission Collision of Spacecraft Asteroid: पृथ्वीकडे येणाऱ्या संकटाला रोखण्यासाठी सुपरहिरो अवकाशात जाऊन युद्ध करत असल्याचे अनेक फिक्शन चित्रपट तुम्ही पाहिली असतील. आता प्रत्यक्षात अशीच एक घटना घडणार आहे. मात्र, यात कोणी सुपरहिरो नसून नासाचं एक यान असणार आहे. अमेरीका स्पेस एजन्सी NASA ने आज एक खास मोहीम सुरू केली आहे, यात अंतराळात असलेल्या उल्कापिंडाला त्यांच्या अंतराळ यानाने जोरदार धडक दिली जाईल. याला ‘सुसाईड’ स्पेसक्राफ्टही म्हणता येईल. एजन्सी त्याचे DART (Double Asteroid Redirection Test) अंतराळयान उल्कापिंडाला (Spacecraft Asteroid Collision) टक्कर देईल. अशा प्रकारची ही पहिलीच मोहीम आहे. जर ते यशस्वी झाले तर भविष्यात अशा प्रचंड उल्का पृथ्वीवर येण्यापासून रोखल्या जातील, जे येथील जीवसृष्टीला धोका निर्माण करू शकतात. डिमॉर्फोस 525 फूट रुंद नासाचे प्रमुख शास्त्रज्ञ थॉमस झुबेर्कन या 330 मिलियन डॉलरच्या प्रकल्पावर बोलताना म्हणाले, की “कोणत्याही संकटाला कसं दूर रोखायचं हे शिकण्याचा आम्ही प्रयत्न करत आहे” डिमॉर्फोस सुमारे 525 फूट रुंद असून डिडिमोस नावाच्या एका मोठ्या उल्कापिंडाभोवती फिरत आहे. ही जोडी सूर्याभोवती एकत्र प्रदक्षिणा घालते. या दोन्ही उल्कापिंडांपासून आपल्या ग्रहाला कोणताही धोका नसल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. टक्कर किती अंतरावर होणार? NASA च्या प्लॅनेटरी डिफेन्स कोऑर्डिनेशन ऑफिसने सांगितले की त्याचा प्रभाव पुढील वर्षी 26 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर 2022 दरम्यान दिसून येईल. उल्का प्रणाली त्यावेळी पृथ्वीपासून 6.8 दशलक्ष मैल (11 दशलक्ष किलोमीटर) दूर असेल (Nasa Spacecraft Asteroid Collision). या टक्करीमुळे किती ऊर्जा हस्तांतरित होईल हे स्पष्ट नाही. कारण डिमॉर्फोस उल्कापिंडाच्या अंतर्गत संरचनेबद्दल फारशी माहिती नाही.
Asteroid Dimorphos: we're coming for you!
— NASA (@NASA) November 24, 2021
Riding a @SpaceX Falcon 9 rocket, our #DARTMission blasted off at 1:21am EST (06:21 UTC), launching the world's first mission to test asteroid-deflecting technology. pic.twitter.com/FRj1hMyzgH
मुंबईसह पाण्यात बुडणार 12 शहरं; NASA चा धक्कादायक रिपोर्ट डार्ट स्पेसक्राफ्टचा आकार किती मोठा आहे? डार्ट स्पेसक्राफ्टच्या आकाराबद्दल सांगायचे तर, त्याचा आकार एका मोठ्या फ्रीजएवढा आहे. याच्या दोन्ही बाजूला लिमोझिन आकाराचे सोलर पॅनल्स आहेत. ते 15,000 mph (किंवा 24,140 kmph) वेगाने डिमॉर्फॉसला धडकेल. शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेत असे छोटे प्रयोग केले आहेत. पण आता प्रत्यक्ष परिस्थितीत त्याची चाचणी घ्यायची आहे. नासाच्या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की डायमोस-डिमॉर्फॉस प्रणाली (Didymos-Dimorphos System) अधिक चांगली आहे. कारण, ती पृथ्वीवरील दुर्बिणीद्वारे शोधली जाऊ शकते. जसे की त्यांची चमक कशी आहे किंवा त्यांना फिरण्यासाठी किती वेळ लागतो. DART तपास पथकाचे प्रनजर रखने के लिए अलग यान रहेगा मौजूद DART अंतराळयानावर लक्ष ठेवण्यासाठी, इटालियन स्पेस एजन्सीचे लाइट इटालियन क्यूबसॅट फॉर इमेजिंग अॅस्टरॉइड्स (LICIACube) एकाच वेळी पाठवले जात आहे. टक्करीच्या वेळी तो डिडिमॉस लघुग्रहाजवळून जाईल जेणेकरून तो टक्करीचे फोटो घेऊ शकेल आणि त्याची छायाचित्रे पृथ्वीवर पाठवू शकेल. पृथ्वीभोवती फिरणाऱ्या पृथ्वीच्या जवळच्या वस्तूंवर नासा सतत लक्ष ठेवते. जर एखादा दगड पृथ्वीच्या 1.3 खगोलीय एककांच्या अंतरावर आला, म्हणजे पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील अंतराच्या 1.3 पट, तर तो नासाच्या रडारवर दिसतो. आतापर्यंत, नासाने पृथ्वीभोवती 8000 पेक्षा जास्त वस्तूंची नोंद केली आहे. ‘विक्रम’च्या शोधात असलेल्या NASA च्या ऑर्बिटरनं टिपलेत पावलांचे ठसे … पुढील 100 वर्षतरी धोका नाही नासाने नोंदवलेल्या पृथ्वीच्या जवळच्या वस्तूंमध्ये, काही लघुग्रह आहेत ज्यांचा व्यास 460 फूटांपेक्षा जास्त आहे. जर या आकाराचा दगड अमेरिकेवर पडला तर तो कोणत्याही एका राज्याला पूर्णपणे नष्ट करू शकतो. तो समुद्रात पडला तर मोठी त्सुनामी येऊ शकते. मात्र, पृथ्वीभोवती फिरणाऱ्या 8000 दगडांपैकी एकही दगड पुढील 100 वर्षांपर्यंत पृथ्वीवर आदळणार नाही, अशी ग्वाही नासाने दिली आहे.