'विक्रम'च्या शोधात असलेल्या NASA च्या ऑर्बिटरनं टिपलेत पावलांचे ठसे!

'विक्रम'च्या शोधात असलेल्या NASA च्या ऑर्बिटरनं टिपलेत पावलांचे ठसे!

भारताच्या विक्रम लँडरशी संपर्क करण्यासाठी आता नासाची मदत घेतली जात आहे. 17 सप्टेंबरला नासाचा ऑर्बिटर विक्रम जिथं आहे झाला तिथून जाईल.

  • Share this:

बेंगळुरू, 13 सप्टेंबर : भारताचा चांद्रयान मोहिमेतील लँडर विक्रमशी संपर्क साधण्याचा इस्त्रोकडून प्रयत्न सुरू आहे. त्यानंतर आता अमेरिकनं अंतराळ संस्था नासाची मदत यासाठी घेण्यात येणार आहे. नासाच्या ऑर्बिटरने याआधी अत्यंत सूक्ष्म अशा बाबी टिपल्या आहेत. त्याच्या आधारे विक्रम लँडरबद्दलची माहिती घेऊन त्याच्यावर पुढं काय करायचं हे इस्त्रो ठरवणार आहे.

नासाचा ऑर्बिटर चंद्राच्या कक्षेत भारताच्या ऑर्बिटरपेक्षा जास्त जवळून फेरी मारतो. त्याने टिपलेल्या फोटोंमधून भारताच्या विक्रम लँडरचा तपशील मिळेल. नासाने 2009 मध्ये चांद्र मोहिम केली होती. त्यात अॅटलस व्ही रॉकेटचं प्रक्षेपण करण्यात आलं होतं. या ऑर्बिटरनं चंद्रावरील खनिज, साधनसंपत्ती यांची ठिकाणं भविष्यात रोबोटिक आणि मानवी मोहिमा आखण्यासाठी कोणती जागा योग्य याची माहिती घेतली. जवळपास एक वर्ष त्याची मोहिम सुरू होती.

विक्रम लँडरचा संपर्क तुटल्यानंतर दोन दिवसांनी एक फोटोही व्हायरल झाला होता. त्यात विक्रम चंद्रावर उतरल्याचं म्हटलं जात होतं. पण तो फोटो नासाच्या ऑर्बिटरने काढलेला होता. यात 40 वर्षांपूर्वी अपोलो मिशन ज्या जागी झाली तिथला फोटो होता. त्यात चंद्रावरच्या मानवाच्या पावलांचे ठसेही दिसत होते. नासानेच हा फोटो शेअऱ केला होता. पावलांचे ठसे टिपणाऱ्या या ऑर्बिटरची मदत आता विक्रम लँडरची माहिती व्हावी यासाठी घेण्यात येणार आहे.

17 सप्टेंबरला नासाचा ऑर्बिटर जिथं विक्रम लँडर आहे तिथून जाणार आहे. त्याचे फोटो ऑर्बिटर घेऊन इस्त्रोला पाठवणार आहे. तेव्हा विक्रमची नेमकी स्थिती काय याची माहिती होणार आहे. नासा त्यांचे सर्व फोटो आणि माहिती संकेत स्थळावर अपडेट करते. विक्रमचे फोटो काढल्यानंतर तेसुद्धा इस्त्रोला पाठवले जातील.

नासा पाठवत आहे मेसेज

नासाच्या जेट प्रोपल्शन प्रयोगशाळेने (NASA/JPL) रेडिओ फ्रिक्वेन्सी लाँडर विक्रमशी संपर्क साधण्यासाठी पाठवली आहे. डेप स्पेस नेटवर्क (DSN) च्या माध्यमातून नासा हा प्रयत्न करत आहे. स्कॉट टिले या अमेरिकन अंतराळवीरांनीही याची माहिती दिली आहे की, नासाने कॅलिफोर्नियास्थित डीएसएन स्टेशनवरून लँडर विक्रमला रेडिओ फ्रिक्वेन्सी पाठवली आहे. त्याने सिग्नल रेकॉर्डकरून ट्विटरवरही हे शेअर केलं आहे.

नासाने केलं इस्त्रोचं कौतुक

नासाने नुकतंच भारतीय अवकाश संशोधन केंद्राच्या (इस्रो) चांद्रयान -2 अभियानाचे कौतुक केलं होतं. नासाने आपल्या ट्विटमध्ये लिहिलं होतं की, 'अंतराळात संशोधन करणं एक कठीण काम आहे. चांद्रयान -2 मिशनला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याच्या प्रयत्नांचं आम्हाला अतिशय कौतुक आहे.

आता एकच पर्याय एक्स बँड

लँडर विक्रमशी पुन्हा संपर्क करण्याचा एकच मार्ग आता शिल्लक आहे आणि तो म्हणजे एक्स बँड (X-Band) होय. चांद्रयान 2 मोहीमेशी संबंधित एका शास्त्रज्ञाने दिलेल्या माहितीनुसार, असे काही मार्ग शिल्लक आहेत ज्यामुळे विक्रमशी पुन्हा संपर्क करता येऊ शकतो. त्यापैकी एक म्हणजे X-Band होय. X-Band आणि ग्राऊंड स्टेशनचा संपर्क होऊ शकतो. सर्वसाधारणपणे याचा वापर रडार, सॅटेलाइट कम्युनिकेशन आणि कम्यूटर नेटवर्कसाठी केला जातो.

VIDEO : शिवबंधनात अडकताच जाधवांनी दिलं मिलिंद नार्वेकरांवर टीकेचं स्पष्टीकरण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 13, 2019 07:12 PM IST

ताज्या बातम्या