मराठी बातम्या /बातम्या /explainer /

Colors In Parliament | लोकसभेत हिरवा तर राज्यसभेत लाल रंग हा योगायोग नाही, यामागे आहे विशेष कारण

Colors In Parliament | लोकसभेत हिरवा तर राज्यसभेत लाल रंग हा योगायोग नाही, यामागे आहे विशेष कारण

Colours In Parliament : संसदेचे कामकाज टीव्हीवर पाहताना लोकसभेत फर्निचरला हिरवा रंग आणि राज्यसभेत लाल रंग का दिसतो हे कधी लक्षात आले आहे का? यामागे एक खास कारण आहे. या दोन वेगवेगळ्या सभागृहांमध्ये या दोन रंगांचे वेगवेगळे अर्थ आहेत.

Colours In Parliament : संसदेचे कामकाज टीव्हीवर पाहताना लोकसभेत फर्निचरला हिरवा रंग आणि राज्यसभेत लाल रंग का दिसतो हे कधी लक्षात आले आहे का? यामागे एक खास कारण आहे. या दोन वेगवेगळ्या सभागृहांमध्ये या दोन रंगांचे वेगवेगळे अर्थ आहेत.

Colours In Parliament : संसदेचे कामकाज टीव्हीवर पाहताना लोकसभेत फर्निचरला हिरवा रंग आणि राज्यसभेत लाल रंग का दिसतो हे कधी लक्षात आले आहे का? यामागे एक खास कारण आहे. या दोन वेगवेगळ्या सभागृहांमध्ये या दोन रंगांचे वेगवेगळे अर्थ आहेत.

पुढे वाचा ...
  • Published by:  Rahul Punde

नवी दिल्ली : सध्या संसदेत हिवाळी अधिवेशन सुरू असून ते 29 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. तुम्ही टीव्हीवर अधिवेशनाचे कामकाज पाहत असाल तर लोकसभा (Loksabha) आणि राज्यसभेत (Rajyasabha) तुम्हाला दोन वेगळ्या गोष्टी दिसतात. लोकसभेत खुर्च्यांसोबत हिरवा रंग (Green) दिसतो तर राज्यसभेत लाल रंग (Red). याचं कारण म्हणजे दोन्ही सभागृहात वेगवेगळ्या रंगांचे गालिचे. हे असे का आहे? याचा कधी विचार केला आहे का? दिल्लीतील संसदेची इमारत वर्तुळाकार आहे, पण लोकसभा आणि राज्यसभेच्या कक्षांचा आकार किती आहे? संसद भवनातील काही रंजक गोष्टी आज जाणून घेऊया.

ब्रिटीश राजवटीत जेव्हा या वास्तूची कल्पना सुचली तेव्हा तिचं नाव कौन्सिल हाउस असे सुचवण्यात आलं होतं. यात तीन मोठ्या इमारती किंवा चेंबर्सचा विचार करण्यात आला होता.

यापूर्वी संसद भवनात राजकुमाराचे घरही होतं

यात पहिली राज्य परिषद होती, जी नंतर राज्यसभा म्हणून ओळखली गेली, दुसरी विधानसभा होती, जी नंतर लोकसभा म्हणून ओळखली गेली आणि तिसरे राजकुमारांचे सभागृह होते, ज्याचं रुपांतर आता संसद भवनाचे ग्रंथालयात करण्यात आलं आहे. लाखो पुस्तकांनी भरलेली ही लायब्ररी देशातील दुसऱ्या क्रमांकाचे ग्रंथालय आहे.

वर्तुळाकार इमारतीची प्रेरणा कुठून मिळाली?

लोकसभा आणि राज्यसभेच्या अंतर्गत रचनेत काय फरक आहे? आणि या फरकांमागे कोणती कारणे आहेत? या सर्व गोष्टी या छोट्या लेखात पाहू. एडविन लुटियन्स आणि हर्बर्ट बेकर यांच्या डिझाइनवर बांधलेल्या संसद भवनाचे उद्घाटन 1927 मध्ये झालं. 6 एकरांमध्ये पसरलेली ही इमारत गोलाकार बनवण्यात आली होती आणि तिच्या डिझाइनचा मुख्य स्त्रोत किंवा प्रेरणा मध्य प्रदेशातील मुरैना येथे स्थित चौसठ योगिनी मंदिराची वास्तुकला होती.

महिला खासदाराच्या कपड्यांवर सभापतींचा आक्षेप, संसदेतून काढलं बाहेर

वेगवेगळ्या रंगाचे कार्पेट का आहेत?

संसद भवनातील सर्वात महत्त्वाची दोन सभागृहे म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा. लोकसभेत हिरवे गालिचे आणि राज्यसभेत रेड कार्पेट अंथरले जाते. हे अपघाताने झालेलं नसून ठरवून करण्यात आलं आहे.

त्यामुळे लोकसभेत हिरवा गालिचा अंथरला

लोकसभा थेट भारतातील लोकांचे प्रतिनिधित्व करत असल्याने, या प्रतिनिधींच्या जमिनीशी असलेल्या संबंधाचे प्रतीक म्हणून हिरवा रंग वापरला जातो. हिरवे हे गवत किंवा मोठ्या प्रमाणावर शेतीचे प्रतीक मानले जाते.

त्यामुळे राज्यसभेत लाल गालिचा अंथरला

दुसरीकडे, राज्यसभेला संसदेचे वरचे सभागृह म्हटले जाते. यामध्ये लोकप्रतिनिधी थेट निवडणुकांद्वारे पोहोचत नाहीत तर राज्यांच्या लोकप्रतिनिधींच्या आकडेवारीनुसार पोहोचतात. राज्यसभेत रेड कार्पेट अंथरण्यामागे दोन कल्पना होत्या. एक लाल रंग राजेशाही अभिमानाचे प्रतीक आहे आणि दुसरा लाल रंग हा स्वातंत्र्यलढ्यातील हुतात्म्यांच्या बलिदानाचे प्रतीक मानला जातो. या कल्पनेमुळे राज्यसभेत लाल गालिचा अंथरला आहे.

'ही' आहेत जगातील सर्वोत्कृष्ट संसद भवनं; थक्क करतं यांचं सौंदर्य

सेंट्रल हॉल, लायब्ररी, म्युझियम आणि कॅन्टीन

लोकसभेत 545, तर राज्यसभेत 245 सदस्यांनुसार आसनव्यवस्था असते. परंतु, जेव्हा दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन असते, तेव्हा संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये बैठकीची व्यवस्था केली जाते. दोन्ही सभागृहांबद्दल एक मनोरंजक माहिती अशी की, हवाई दृश्य पाहिल्यास लोकसभा आणि राज्यसभेच्या सभागृहांचा आकार अर्धगोलाकार म्हणजेच घोड्याच्या नालसारखा आहे.

आता वाचनालयाबद्दल बोलूया. संसद भवनाचे ग्रंथालय पूर्वी संसद भवन संकुलातच होते. परंतु, पुस्तकांच्या वाढत्या संख्येमुळे या ग्रंथालयासाठी संसद भवनाला लागून स्वतंत्र इमारत बांधण्यात आली. हे ग्रंथालय देशातील दुसऱ्या क्रमांकाचे ग्रंथालय आहे. कोलकाता येथील बलभद्र राज्यात असलेले राष्ट्रीय ग्रंथालय हे देशातील सर्वात मोठे ग्रंथालय आहे, ज्यामध्ये 22 लाखांहून अधिक पुस्तकांचा संग्रह आहे.

771 कोटी खर्चून उभं राहणार नवीन संसद भवन; प्रत्येक सदस्यासाठी..

यासोबतच संसद भवनाच्या ग्रंथालय परिसरात देशाच्या सांस्कृतिक वारशाची झलक दाखवणारे एक संग्रहालय देखील आहे. संसद भवनाचे कॅन्टीनही अनेकदा चर्चेत आले आहे, कारण काही काळापूर्वी येथे अत्यंत कमी किमतीत जेवणाची व्यवस्था होती. आता त्याच्या अन्नावरील अनुदान रद्द करण्यात आले आहे.

First published:

Tags: Parliament, Parliament session, Rajyasabha, Sansad loksabha