मराठी बातम्या /बातम्या /देश /

771 कोटी खर्चून उभं राहणार नवीन संसद भवन; प्रत्येक सदस्यासाठी स्वतंत्र कार्यालय ही असतील 11 वैशिष्ट्यं

771 कोटी खर्चून उभं राहणार नवीन संसद भवन; प्रत्येक सदस्यासाठी स्वतंत्र कार्यालय ही असतील 11 वैशिष्ट्यं

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच नव्या संसद भवनाची इमारती उभारली जात आहे. त्याचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते गुरुवारी झालं.

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच नव्या संसद भवनाची इमारती उभारली जात आहे. त्याचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते गुरुवारी झालं.

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच नव्या संसद भवनाची इमारती उभारली जात आहे. त्याचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते गुरुवारी झालं.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 10 डिसेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज देशाच्या नवीन संसद भवनाच्या (New Parliament Building) इमारतीचे भूमीपूजन केले. या कार्यक्रमाला देशातील विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी, केंद्रीय मंत्र्यांनी आणि विविध देशांच्या राजदूतांनी हजेरी लावली होती. संसदेची ही नवीन चार मजली इमारत 64,500 चौरस मीटर क्षेत्रफळात बांधण्यात येणार असून याचा अंदाजित खर्च  971 कोटी रुपये एवढा येणार आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षपूर्ती पर्यंत ही इमारत पूर्ण करण्याचा मानस केंद्र सरकारचा आहे.

या प्रस्तावित नवीन संसदेच्या इमारतीत प्रत्येक संसद सदस्याला 40 चौरस मीटर क्षेत्रफळाची जागा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. हे काम 2024 पर्यंत पूर्ण केलं जाणार आहे. नवीन संसद भवन उभारण्याचा प्रस्ताव देशाचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू  आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी अनुक्रमे राज्यसभा आणि लोकसभा मध्ये 5 ऑगस्ट 2019 रोजी मांडला होता.

नवीन संसद भवनाविषयी महत्त्वपूर्ण 11 वैशिष्ट्ये

1. संसदेच्या नवीन इमारतचे क्षेत्रफळ 64,500 चौरस मीटर एवढे असेल आणि त्याचा अंदाजित एकूण खर्च 971 कोटी रुपये असेल.

2. संसदेची नवीन इमारत भूकंप रोधक असेल. या इमारतीच्या निर्मितीचे काम प्रत्यक्षात 2000 लोक करतील, तर  9000 लोकं अप्रत्यक्षपणे या कामात भागीदार असतील.

3. नवीन संसदेच्या इमारतीत एकावेळी 1224 सदस्य बसू शकतील. तर सध्याच्या श्रम शक्ती भवनाच्या (संसद भवन जवळ) ठिकाणी दोन्ही सभागृहाच्या सदस्यांची कार्यालये उभारली जातील.

4. संसदेची सध्याची इमारत देशाच्या पुरातत्व खात्याकडे सुपूर्द केली जाईल आणि ऐतिहासिक वारसा म्हणून त्याचे जतन करण्यात येईल. या नवीन इमारती भूमीपूजनाच्या कार्यक्रमाला सर्व राजकीय पक्षांना आमंत्रित केले गेलं आहे.

5.  नवीन संसद भवनाच्या निर्मितीच्या वेळी वायू आणि ध्वनी प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी आवश्यक ते उपाय केले आहेत.

6. नवीन संसद भवनात संसदेच्या सर्व सदस्यांसाठी स्वतंत्र कार्यालये असतील. ज्यामध्ये अत्याधुनिक डिजिटल सोयी सुविधा असतील. हे एक ती डिजीटल इंडीयाच्या दृष्टीने उचललेले हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. त्याचबरोबर येथे एक विशाल संविधान कक्ष असेल. शिवाय संसद सदस्यांसाठी पुस्तकालय, विविध समित्यांचे कक्ष, भोजन कक्ष आणि पार्किंगची सुविधा असेल.

7. नवीन संसद भवनात लोकसभा कक्षात 888 सदस्यांच्या बैठकीची व्यवस्था केली जाईल. तर राज्यसभा कक्षात 384 सदस्य बसू शकतील. भविष्यात संसद सदस्यांची संख्या वाढू शकते, हे लक्षात घेऊन बैठक व्यवस्था जास्तीची बनवली जात आहे.

8. सध्या लोकसभेत 543 आणि राज्यसभेत 245 सदस्य आहेत. या इमारत उभारणीची ठेकेदारी टाटा प्रोजेक्ट लिमिटेडकडे असून त्यासाठी 861.90 एवढा खर्च येणार आहे. हे नवीन संसद भवन सेंट्रल विस्टा प्रकल्पांच्या अंतर्गत आहे. सध्याच्या संसदेच्या इमारतीजवळच याचे बांधकाम केले जाणार आहे.

9.लोकसभा सदनाचा आकार सध्याच्या तुलनेत तीन पट असेत आणि राज्यसभा सदनही सध्याच्या तुलनेत मोठे असेल. या नवीन संसद भवन आतून भारतीय संस्कृतीने प्रामुख्याने कला, शिल्प व वास्तूकला आदीने सजवलेली असेल.

10. ही नवीन इमारत अत्याधुनिक सोयी सुविधांनी आणि संरक्षणाच्या दृष्टीनेही परिपूर्ण आहे. ही इमारत त्रिकोणात्मक आकाराची असेल.

11. सरकारने सांगितले की, संसदेची नवीन इमारत २०२२ मध्ये म्हणजेच स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षपूर्ती पर्यंत पूर्ण होईल.

First published:

Tags: Delhi, Parliament