नवी दिल्ली 06 जून : कोणी कसे कपडे घालावे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. मात्र, महिलांच्या बाबतीत हे होताना दिसत नाही. महिला कितीही उच्च पदावर असल्या तरीही त्यांच्या कपड्यांबाबत आक्षेप घेतला जातो. अशीच एक घटना पाहायला मिळाली टांझानियाच्या (Tanzanian) संसदेत. याठिकाणी एका महिला खासदाराला केवळ यामुळे बाहेर काढण्यात आलं कारण तिनं टाइट फिटिंगची पॅन्ट घातली होती. टांझानियाच्या महिला खासदार कॉनडेस्टर शिजवेल (Condester Sichwale) यांना सभापतींनी (Speaker of Parliament Job Ndugai) बाहेर काढलं. जॉब डुगाई यांनी खासदाराच्या कपड्यांवर आक्षेप घेतला. ते म्हणाले, आधी व्यवस्थित कपडे घालून या आणि मगच संसदेत प्रवेश करा. या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात तेव्हा झाली तेव्हा हुसैन अमरनं कॉनडेस्टर यांच्याकडे पाहात म्हटलं, की आपल्या काही बहिणींनी विचित्र कपडे घातले आहेत. त्या समाजाला नेमकं काय दाखवत आहेत?
📌 KICKED OUT
— Louis Jadwong (@Jadwong) June 1, 2021
🔴 Tanzanian MP Condester Michael Sichlwe caused a stir in parliament in Dodoma today 'by wearing black tight-fitting trousers, and yellow top'.
Speaker of Parliament Job Ndugai threw her out for wearing 'non-parliamentary attire'.
📷 @Hakingowi pic.twitter.com/n8vxabWLQV
पिंपरीत स्कोडा गाडीत आढळलेल्या मृतदेहाचं गूढ उलगडलं; दारू पाजून आवळला गळा हुसैन अमर यांचं असं म्हणणं होतं, महिलांनी संसदेत टाइट फिटिंगची जिन्स घालून येणं चुकीचं आहे. मात्र, कॉनडेस्टर यांच्या कपड्यांवर टीका करत त्यांना संसदेतून बाहेर काढल्यामुळे इतर महिला खासदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. यासाठी कॉनडेस्टर यांची माफी मागण्याची मागणी इतर महिला खासदारांनी केली आहे. पुणेकरांची उकाड्यातून सुटका, पुण्यात मान्सून दाखल याबाबत बोलताना सभापती म्हणले, की ही पहिली वेळ नाही की महिलांच्या कपड्यांबाबत तक्रार आली आहे. त्यांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांनाही असे निर्देश दिले, की एखाद्याचे कपडे योग्य नसल्यास त्यांना प्रवेश दिला जावू नये.