advertisement
होम / फोटोगॅलरी / विदेश / 'ही' आहेत जगातील सर्वोत्कृष्ट संसद भवनं; थक्क करतं यांचं सौंदर्य

'ही' आहेत जगातील सर्वोत्कृष्ट संसद भवनं; थक्क करतं यांचं सौंदर्य

सौंदर्यपूर्ण रचनांसाठी आशियाई देशांमधील (Asian Countries) संसद भवनं (Parliament Houses) जगभरात नावाजली जातात. श्रीलंका आणि बांगलादेशच्या संसद भवनाचाही जगातील सर्वोत्कृष्ट संसद भवनांमध्ये समावेश होतो. जगातील काही सात सर्वोत्कृष्ट संसद भवनं -

01
 भारताच्या (India) नवीन संसद भवनाची (Parliament House) पायाभरणी येत्या 10 डिसेंबरला होणार आहे. वास्तू म्हणून नव्हे, तर सर्वच दृष्टीने भारतीय संसद भवन सर्वोत्कृष्ट बनावे यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. याकरता वास्तुविशारदांनी (Architects) जगभरातल्या अनेक संसद भवनांचा अभ्यास केला आहे. जगभरातील अनेक संसद भवनं देखणी आहेतच, तसंच अनेक सोयीसुविधांनी सुसज्जही आहेत. जगभरातल्या निवडक सर्वोत्तम संसद भवनांत अग्रक्रमानं नाव येतं ते एकेकाळी जवळपास संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटनच्या संसदेचं.

02
ब्रिटनमधील (Britain) वेस्टमिनिस्टर पॅलेस जगभरातील सर्व संसद भवनांचा जनक मानला जातो. चार्ल्स बेरी आणि ऑगस्टस वेल्बी पुगीन यांनी याचे डिझाइन बनवले होते. थेम्स नदीच्या किनारी असलेल्या संसदेच्या सौंदर्याची तारिफ जगभरात होते. जगभरातील पर्यटक ही वास्तू बघण्यासाठी आवर्जून येतात. यामध्ये तीन मुख्य टॉवर आहेत. एलिझाबेथ टॉवर, न्यू पॅलेस आणि हाउस ऑफ कॉमन्स. युरोपियन इमारतींचे मुख्य वैशिष्ट्य असणाऱ्या गॉथिक शैलीत ही वास्तू साकारली आहे. ऐतिहासिक महत्त्व आणि वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे 1987 मध्ये युनेस्कोने (UNESCO) याचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश केला आहे. या संसद भवनाच्या परिसरात अनेक उद्याने, रेस्टॉरंटस आहेत, त्यामुळे इथं पर्यटकांची नेहमीच गर्दी असते.

03
श्रीलंकेचं (Sri Lanka) संसद भवनही जगभरातील सात सर्वोत्कृष्ट संसद भवनांपैकी एक आहे. अवघ्या चार वर्षांत निर्माण करण्यात आलेल्या या संसद भवनाची रचना श्रीलंकन वास्तुविशारद जेफ्री बावा यांनी केली आहे. 1979 मध्ये याचं काम सुरू झालं आणि 1982 मध्ये ते पूर्ण झालं. बौद्धकालीन आणि आधुनिक वास्तुशैलीचा अनोखा संगम इथं दिसून येतो. या संसद भवनाचे सर्व दरवाजे चांदीचे आहेत. याची अंतर्गत सजावट ब्रिटिश संसद भवनाप्रमाणे आहे. या संसद भवनाचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे, हे एका तलावाच्या काठी असून, इथून रमणीय निसर्गाचे दर्शन होते.

04
 आशियाई देशांमधील संसद भवनं सौंदर्याच्या बाबतीत अग्रेसर मानली जातात. अशा सुंदर संसद भवनांच्या यादीत अग्रक्रमानं समावेश होतो तो बांगलादेशचा (Bangladesh). ढाका इथं एका कृत्रिम तलावाच्या काठी हे संसद भवन आहे. 1961 मध्ये याच्या निर्मितीचं काम सुरू झालं ते दहा वर्षं चाललं. बाहेरून पाहताना ही एकच इमारत दिसत असली तरी, यात आठ इमारती जोडलेल्या आहेत. मूळ अस्टोनियन अमेरिकन असलेले वास्तुविशारद लुईस कहर यांनी स्कॉटलंडमधील किल्ल्यांपासून प्रेरणा घेऊन या संसद भवनाची रचना केली आहे.

05
रोमानियाच्या (Romania) संसद भवनाचाही जगभरातील सर्वोत्कृष्ट संसद भवनात समावेश होतो. 1984 ते 1997 याचे बांधकाम चालले. जगातील सर्वांत मोठे आणि मजबूत संसद भवन म्हणून हे ओळखले जाते. बुखारेस्ट इथं असलेली ही भव्य वास्तू प्रसिद्ध वास्तुविशारद एन्का पेट्रीशिया यांची रचना आहे. हुकुमशहा निकोलाय यांनी त्यांना अशी वास्तू उभारण्याचा आदेश दिला तेव्हा त्या केवळ 32 वर्षांच्या होत्या. जगातील संसद भवनाच्या वास्तुविशारदांमध्ये सर्वांत लहान वयाच्या वास्तुविशारद ठरण्याचा मान पेट्रीशिया यांना जातो. ही वास्तू निर्माण करण्यासाठी 20 हजार सैनिक आणि कैदी यांनी दिवसरात्र काम केले. या संसद भवनातील अंतर्गत सजावट संगमरवराची आहे. संकटकाळी इथून सुरक्षितरीत्या बाहेर पडता यावं यासाठी इथं आठ भूयारंही निर्माण करण्यात आली आहेत.

06
स्कॉटलंडचे (Scotland) संसद भवनही अतिशय सुंदर आहे. 1999 ते 2004 या कालावधीत बनलेली ही वास्तू वादग्रस्तही ठरली, कारण याच्यावर अतिप्रचंड खर्च करण्यात आल्यानं जनतेत नाराजी होती. अनेक इमारतींचा समूह असलेल्या या वास्तूचे वैशिष्ट्य म्हणजे इथली प्रत्येक इमारत वेगळी आहे. या इमारती एका परिसरातून हटवल्या तर त्या एका देशाच्या वाटणार नाहीत. वास्तूविशारद एनरिक मिरालस यांनी याचा आराखडा तयार केला होता, पण प्रत्यक्ष काम सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. मात्र त्यांनी केलेल्या आराखड्यानुसारच काम करण्यात आलं.

07
सुंदर संसद भवनांमध्ये जर्मनीतील (Germany) संसद भवनाचाही समावेश आहे. जर्मनीची राजधानी बर्लिनमध्ये हे भव्य आणि देखणं संसद भवन आहे. 1884 ते 1894 या काळात याची उभारणी झाली. हिटलरच्या काळानंतर या वास्तूत अनेक बदल झाले. नव्वदच्या दशकात इंग्लिश वास्तुविशारद नॉर्मन फॉस्टर यांनी यात अनेक बदल केले.

08
फिनलंडचे (Finland)संसद भवनही जगातील एक सर्वोत्तम संसद भवन मानले जाते. हे संसद भवन या देशाच्या मजबुतीचे प्रतीक आहे. 1917 मध्ये हा देश रशियामधून स्वतंत्र झाला आणि आपली अर्थव्यवस्था बळकट करण्याचे काम त्याने तेव्हापासूनच सुरू केलं. हेलसिंकी इथं असलेलं हे संसद भवन या देशाच्या या बळकटीकरणाच्या धोरणांचं प्रतिनिधित्व करते. गुलाबी आणि पांढऱ्या रंगाच्या ग्रॅनाईट दगडांपासून ही वास्तू उभारण्यात आली आहे. इमारतीच्या अंतर्गत भागात रंगांचा अतिशय सुंदर वापर करण्यात आला आहे. 1907 मध्ये जगातल्या पहिल्या महिला खासदाराने मतदान केलं ती जागाही इथं आहे. इथं एक नग्न मूर्ती आहे, जी फिनिश बलदंडतेची साक्ष देते.

  • FIRST PUBLISHED :
  •  भारताच्या (India) नवीन संसद भवनाची (Parliament House) पायाभरणी येत्या 10 डिसेंबरला होणार आहे. वास्तू म्हणून नव्हे, तर सर्वच दृष्टीने भारतीय संसद भवन सर्वोत्कृष्ट बनावे यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. याकरता वास्तुविशारदांनी (Architects) जगभरातल्या अनेक संसद भवनांचा अभ्यास केला आहे. जगभरातील अनेक संसद भवनं देखणी आहेतच, तसंच अनेक सोयीसुविधांनी सुसज्जही आहेत. जगभरातल्या निवडक सर्वोत्तम संसद भवनांत अग्रक्रमानं नाव येतं ते एकेकाळी जवळपास संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटनच्या संसदेचं.

    MORE
    GALLERIES