मुंबई, 10 डिसेंबर : जनरल बिपिन रावत यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाल्यानंतर सरकार आता चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) या पदासाठी योग्य उमेदवाराच्या शोधात आहे. जनरल रावत यांनी आपल्या एक वर्ष 341 दिवसांच्या कार्यकाळात या पदावर भरीव कामगिरी केली, ज्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. मुख्य म्हणजे लष्कराच्या तिन्ही शाखांसोबत मिळून ऑपरेशन्स राबवणे आणि लष्कराचे आधुनिकीकरण करण्याच्या दिशेने त्यांनी बरेच काम केलं आहे. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफचं मुख्य काम काय असतं? किती वर्षांचा कालावधी असतो आणि त्यांना कोणत्या सुविधा आणि पगार मिळतो, याविषयी जाणून घेऊया. कार्यकाळ किती आहे? CDS चा कार्यकाळ 3 वर्षे किंवा 65 वयाच्या वर्षांपर्यंत असतो, यापैकी जे आधी असेल ते लागू होईल. जनरल रावत यांनी ही जबाबदारी स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच हे पद निर्माण करण्यात आले होते. वयाच्या 62 व्या वर्षी ते लष्करप्रमुख म्हणून निवृत्त झाले आणि त्यानंतर ते सीडीएस झाले. ते 64 वर्षांचे होणार होते. या पदाचा व्यक्ती सैन्यातील सर्वात मोठा अधिकारी आहे का? होय, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हा लष्कराचा सर्वोच्च अधिकारी असतो. ते 4 स्टार अधिकारी आहेत. तो ज्या सैन्याचा भाग आहे, तोच गणवेश परिधान करतो. त्याच्या चिन्हात, सैन्याच्या तीन भागांची चिन्हे अशोक चक्रासह सोन्याच्या धाग्याने बनविली जातात. त्यांचा स्टाफ किती मोठा आहे? सीडीएस कार्यालयात एक अतिरिक्त सचिव, पाच सहसचिव आणि सहाय्यक कर्मचारी असतात. या सर्वांसोबत ते सैन्याच्या तीनही भागांशी संबंधित कामं आणि इतर भूमिका निभावतात.
ब्लॅक बॉक्स म्हणजे काय? विमान किंवा हेलिकॉप्टर अपघाताचं रहस्य तो कसं सांगतो?
त्यांची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या काय आहेत? लष्कराच्या तिन्ही शाखांचा एकत्रितपणे सर्व कारवायांमध्ये प्रभावीपणे वापर करणे आणि लष्कराचे आधुनिकीकरण करणे ही त्याची मुख्य जबाबदारी आहे. मुख्यत्वे ते संरक्षणमंत्र्यांच्या मुख्य संरक्षण सल्लागाराच्या भूमिकेत असतात. त्यांची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या या आहेत. शस्त्रास्त्र खरेदी प्रक्रिया पार पाडणे सैन्याच्या तिन्ही विभागांना एकत्रित करुन उत्तम काम करणे लष्करी सल्लागारासह लष्करी व्यवहार विभागाशी डील करणे जेव्हा आवश्यक असेल तेव्हा थिएटर कमांड तयार बनवणे लष्कराच्या तिन्ही विंगच्या एजन्सी, संस्था आणि संबंधित सायबर आणि स्पेसचे कमांडिंग करणे संरक्षण अधिग्रहण परिषद आणि संरक्षण नियोजन समितीचे सदस्य न्यूक्लियर कमांड अथॉरिटीचे लष्करी सल्लागार म्हणून काम करणे तिन्ही सैन्यदलाच्या सुधारणेचे कार्यक्रम पुढे नेऊन अनावश्यक खर्चात कपात करून सशस्त्र दलांची ताकद वाढवणे.
व्हीआयपींसाठी विमान आणि हेलिकॉप्टरचे सुरक्षा नियम काय आहेत?
पगार आणि भत्ता किती असतो? चीफ ऑफ डिफेन्स स्टाफचा पगार लष्कराच्या तिन्ही शाखांच्या प्रमुखांच्या बरोबरीने म्हणजेच अडीच लाख रुपये असेल आणि त्यांना बंगल्यासह समान सुविधाही मिळतात. संरक्षण प्रमुख म्हणजेच CDS हे पद निर्माण करण्याचा निर्णय कधी घेण्यात आला? अशा पोस्ट निर्मितीची कल्पना अलीकडची नाही. मात्र, हे पद अधिकृतपणे करण्याचा विषय सर्व काही ठरल्यानंतरही पुढे ढकलला गेला. अखेर 2019 मध्ये मोदी सरकारने त्याला मंजुरी दिली. ही कल्पना सर्वप्रथम लॉर्ड माउंटबॅटन यांनी मांडली होती.