मराठी बातम्या /बातम्या /explainer /CDS Bipin Rawat accident: व्हीआयपींसाठी विमान आणि हेलिकॉप्टरचे सुरक्षा नियम काय आहेत?

CDS Bipin Rawat accident: व्हीआयपींसाठी विमान आणि हेलिकॉप्टरचे सुरक्षा नियम काय आहेत?

सीडीएस जनरल बिपिन रावत (CDS Genral Bipin Rawat) यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाल्याने व्हीआयपींसाठी विमान आणि हेलिकॉप्टरच्या नियमांचे पुनरावलोकन करण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालक (DGCA) अशा प्रवासासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करतात. या सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाते. या नियमांचे वेळोवेळी तसेच आवश्यकतेनुसार पुनरावलोकन देखील केले जाते.

पुढे वाचा ...

NDA विद्यार्थी ते देशाचे पहिले CDS! कसा होता जनरल बिपिन रावत यांचा प्रवास

मुंबई, 9 डिसेंबर : देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल विपिन रावत (Genral Vipin Rawat) यांच्या निधनाने देशाला धक्का बसला आहे. बुधवारी तामिळनाडूमधील कुन्नूरजवळ झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात त्यांचा मृत्यू झाला, ज्यात त्यांच्या पत्नीसह अन्य 11 जणांचा मृत्यू झाला. हवाई दलाने Mi-17 VH हेलिकॉप्टरच्या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या अपघाताच्या कारणाबाबत अद्याप काहीही सांगण्यात आलेले नाही. या अपघातामुळे आता अतिमहत्वाच्या (VIP) व्यक्तींसाठी देशातील विमान आणि हेलिकॉप्टर आदींच्या नियमांचे पुनरावलोकन करण्याची गरज पुन्हा एकदा निर्माण झाली आहे.

कोणतं हेलिकॉप्टर होतं?

हे हेलिकॉप्टर MI 17 मालिकेतील रशियन हेलिकॉप्टर आहे, जे ट्रान्सपोर्ट हेलिकॉप्टर म्हणून वापरले जाते. या हेलिकॉप्टरचा वापर जगभरातील लष्करी कारवायांमधील वाहतुकीसाठी केला जातो. हे खूप वजन घेऊन उड्डाण करण्यास सक्षम आहे आणि त्यात 36 लोक एकत्र बसून प्रवास करू शकतात.

हे नियम कोण करतं?

नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) भारतातील VIP च्या प्रवासासाठी वापरल्या जाणार्‍या विमान आणि हेलिकॉप्टरच्या सुरक्षेचे नियम ठरवते. DGCA च्या मार्गदर्शक तत्त्वांवर आधारित राज्य, केंद्र सरकार आणि इतर संस्थांद्वारे VIP लोकांसाठी वापरल्या जाणार्‍या विमान आणि हेलिकॉप्टरसाठी उच्च सुरक्षा नियमांचे पालन केले जाते.

सर्व प्रकारच्या नियमांमध्ये कार्यक्षमता

या गाईडलाईन्सनुसार, विमान किंवा हेलिकॉप्टर नेहमीच चांगली ऑपरेटिबिलिटी, विश्वासार्हता आणि सुलभ देखभाल वैशिष्ट्यांचे असावे, जे विमान नियम आणि वेळोवेळी जारी केलेल्या सूचनांचे पालन करत असले पाहिजे.

अनुभवी इंजीनियर आणि क्रू सदस्य

व्हीआयपी उड्डाणे प्रशिक्षित आणि अनुभवी क्रूद्वारे चालवणे आवश्यक आहे. व्हीआयपी विमाने आणि हेलिकॉप्टरसाठी, क्रू आणि इंजिनीअर्ससाठी स्वतंत्र प्रशिक्षण कार्यक्रम आहे. विमान किंवा हेलिकॉप्टरचं प्रत्येक उड्डाण करण्यापूर्वी विहित तपासणी करणे आवश्यक आहे. विमान किंवा हेलिकॉप्टर उड्डाण आणि ऑपरेशनसाठी पूर्णपणे तंदुरुस्त आहे का? याची खात्री करणे आवश्यक आहे.

ब्लॅक बॉक्स म्हणजे काय? विमान किंवा हेलिकॉप्टर अपघाताचं रहस्य तो कसं सांगतो?

हवामान खूप महत्वाचं

सुरक्षेच्या नियमांनुसार, जेव्हा हवामान परिस्थिती विमान किंवा हेलिकॉप्टर चालवण्यासाठी सुरक्षित नसते, तेव्हा कोणत्याही परिस्थितीत उड्डाणाला परवानगी देऊ नये. प्रत्येक व्हीआयपी फ्लाइट 'मल्टिपल क्रू'द्वारे चालवली जावी. जनरल बिपिन रावत यांच्या बाबतीत या नियमाकडे दुर्लक्ष करण्यात आले नसल्याचे सध्या मानले जात आहे.

वैमानिकांसाठी महत्त्वाच्या सूचना

नियमांनुसार, प्रत्येक उड्डाण सुरू करण्यापूर्वी वैमानिकाने स्वतः हवामानाशी संबंधित माहितीची जाणीव करून घेणं आवश्यक असते. जर उड्डाण पूरग्रस्त भागातून जाणार असेल, तर विमानात किंवा हेलिकॉप्टरमधील प्रत्येकासाठी पुरेसं बचाव किट आहे का? याची खात्री करण्यासाठी वैमानिकाला सूचना दिली जाते. याशिवाय, प्रत्येक उड्डाण करण्यापूर्वी, प्रत्येक प्रवाशाला आपत्कालीन परिस्थितीत बचाव किट कसं वापरायचं हे माहित असले पाहिजे.

NDA विद्यार्थी ते देशाचे पहिले CDS! कसा होता जनरल बिपिन रावत यांचा प्रवास

उड्डाणपूर्व चाचणीत काही कमतरता किंवा त्रुटी आढळल्यास अशा परिस्थितीत काय करावे आणि उड्डाण कधी करता येईल, यासाठी स्वतंत्र सूचना आहेत. अशा परिस्थितीत समस्येची पूर्ण माहिती पायलट-इन-कमांडला कळवावी लागते. अडचण दूर केल्यास त्याची खात्री करणे आवश्यक आहे. त्यानंतरच उड्डाण करण्यास परवानगी दिली जाते.

First published:

Tags: Helicopter, Indian army, Vip