मुंबई, 9 डिसेंबर : चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांना कुन्नूरहून वेलिंग्टनला नेत असताना काल क्रॅश झालेल्या Mi17 V5 हेलिकॉप्टरचा ब्लॅक बॉक्स (Black Box) सापडला आहे. या अपघातात जनरल रावत आणि त्यांच्या पत्नीसह अनेक लष्करी अधिकारी आणि क्रू मेंबर्सचा मृत्यू झाला. ब्लॅक बॉक्स मिळाला असला तरी त्याची अवस्था ठीक नसल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, तो मिळाल्यानंतर त्याच्या आत कोणकोणत्या डाटाची नोंद होईल, त्यातून हा अपघात कोणत्या परिस्थितीत झाला हे कळेल, अशी अपेक्षा आहे. हा केशरी रंगाचा ब्लॅक बॉक्स काय आहे आणि तो कसा काम करतो. ब्लॅक बॉक्स काय प्रकार आहे? फ्लाइटसोबत झालेला अपघात जाणून घेण्यासाठी नेहमी ब्लॅक बॉक्सचा वापर केला जातो. हे प्रत्यक्षात विमानाच्या उड्डाण दरम्यान सर्व उड्डाण हालचाली रेकॉर्ड करते. या कारणास्तव याला फ्लाइट डेटा रेकॉर्डर (FDR) असेही म्हणतात. हे सुरक्षित रहावे यासाठी याला सर्वात मजबूत धातू टायटॅनियमपासून तयार केलं आहे. तसेच आतील बाजूस संरक्षित भिंती अशा पद्धतीने बनवल्या आहेत की, अपघात झाला तरी ब्लॅक बॉक्स सुरक्षित राहतो आणि प्रत्यक्षात काय घडले हे समजू शकते. शोध का लागला? 1950 च्या दशकाच्या सुरुवातीला ब्लॅक बॉक्स बनवण्याचे प्रयत्न सुरू झाले. तेव्हा विमानांची वारंवारता (Frequency) वाढल्याने अपघातही वाढू लागले. मात्र, त्यानंतर अपघात झालाच, तर चूक कोणाची होती, का घडली हे तपासायचे कसे, जेणेकरून भविष्यात या चुकीची पुनरावृत्ती होऊ नये, हे समजायला मार्ग नव्हता.
EXCLUSIVE Video:काय झालं होतं शेवटच्या क्षणी CDS बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरमध्ये, या बॉक्समधून उलघडणार रहस्य
नामकरणाची कथा शेवटी 1954 मध्ये वैमानिक संशोधक डेव्हिड वॉरन यांनी याचा शोध लावला. मग या बॉक्सला लाल रंगामुळे लाल एग असं म्हटलं गेलं. पण नंतर आतील भिंत काळ्या रंगाची असल्यामुळे या बॉक्सला ब्लॅक बॉक्स असे संबोधले जाऊ लागले. तसंतर या बॉक्सला काळे का म्हटले जाते हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही कारण त्याचा वरचा भाग लाल किंवा गुलाबी रंगात ठेवला आहे. त्यामुळे झाडाझुडपांमध्ये किंवा कुठेही धूळ-मातीत पडला तरी त्याच्या रंगामुळे दुरून दिसू शकतो. कसं काम करतो? हा बॉक्स टायटॅनियम धातू आणि आतमध्ये अनेक स्तरांमुळे सुरक्षित आहे. विमानात आग लागली तरी त्याला हानी पोहचण्याची शक्यता जवळपास नगण्य आहे. कारण तो 1 तास 10 हजार डिग्री सेंटीग्रेड तापमान सहन करू शकतो. यानंतरही पुढील 2 तास हा बॉक्स सुमारे 260 अंश तापमान सहन करू शकतो. त्याची एक खासियत म्हणजे तो जवळपास महिनाभर विजेशिवाय काम करतो, म्हणजेच अपघातग्रस्त जहाज शोधण्यात वेळ लागला तरी डेटा बॉक्समध्ये सेव्ह होतो. NDA विद्यार्थी ते देशाचे पहिले CDS! कसा होता जनरल बिपिन रावत यांचा प्रवास सातत्याने सिग्नल्स सोडत राहतो अपघात झाल्यास ब्लॅक बॉक्समधून सतत आवाज येत असतो, जो शोधपथकातील लोकांना दूरुनच ऐकू येऊ शकतो. समुद्रात 20,000 फूट खाली पडल्यानंतरही या बॉक्समधून आवाज आणि लहरी बाहेर पडत राहतात आणि त्या सतत 30 दिवस सुरू राहतात.
शोध लागल्यानंतर लगेचच प्रत्येक विमानात ब्लॅक बॉक्स ठेवण्यास सुरुवात झाली. तो प्रत्येक विमानाच्या मागच्या बाजूला ठेवला जातो जेणेकरून अपघात झाला तरी ब्लॅक बॉक्स सुरक्षित राहतो. विमान अपघातात विमानाचा मागील भाग कमीत कमी प्रभावित होतो. व्हॉईस रेकॉर्डर देखील मदत करतो फक्त ब्लॅक बॉक्सच नाही तर विमानातील आणखी एक गोष्ट डेटा जमा करण्यात मदत करते, ती म्हणजे कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर (CVR). हा प्रत्यक्षात ब्लॅक बॉक्सचाच एक भाग आहे. त्यात विमानातील शेवटच्या दोन तासांचे आवाज रेकॉर्ड केले जातात. यामध्ये इंजिनचा आवाज, इमर्जन्सी अलार्मचा आवाज आणि कॉकपिटमधील आवाज म्हणजेच पायलट आणि को-पायलटमधील संभाषण रेकॉर्ड केले जाते. हे देखील येथील अपघातस्थळावरून जमा करण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.