नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर: गेल्या दीड वर्षापासून सगळं जग ज्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे, त्यातून सुटका होण्याची चिन्हे आता दिसू लागली आहेत. कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या (Coronavirus Pandemic) दहशतीचा विळखा हळूहळू सैलावत आहे. यामागे सर्वात महत्त्वाचे कारण आहे ते म्हणजे लसीकरण (Vaccination Drive). कोरोना विषाणूला प्रतिबंध करणारी लस निर्माण झाल्यानंतर जगभरात सर्वत्र लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. अनेक देशांमध्ये अत्यंत वेगाने लसीकरण पूर्ण झालं असल्यानं तिथली जनता मास्क (Mask), सामाजिक अंतर (social Distancing), लॉकडाउन (Coronavirus Lockdown) आणि अन्य कठोर निर्बंधातून मुक्त झाली आहे.
काही ठिकाणी निर्बंध आहेत; पण त्याचे स्वरूप अत्यंत सौम्य आहे. मात्र अनेक देशांमध्ये ही स्थिती येण्यास आणखी काही कालावधी लागणार आहे. कारण जोपर्यंत लसीकरण मोठ्या प्रमाणावर होत नाही तोपर्यंत कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी निर्बंध पाळणे आवश्यक आहे. आपल्या देशातही जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम राबवण्यात येत असून अतिशय वेगानं लसीकरण पूर्ण करण्यावर भर देण्यात येत आहे. आज 100 कोटी डोस (100 Crore Vaccine Doses) देण्याचा महत्त्वाकांक्षी टप्पा गाठला जाण्याची शक्यता आहे. हा महत्त्वाचा टप्पा पार केल्यानंतर आपलीही मास्कपासून सुटका होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. देशातील सर्वसामान्य जनता मोठ्या आशेने त्या दिवसाची वाट पाहत आहे. येणारी दिवाळी हा आनंदाचा क्षण घेऊन येईल का याची उत्सुकता सगळीकडे दिसू लागली आहे. दैनिक भास्करने याबाबत वृत्त दिले आहे.
कोव्हॅक्सिनला अजूनही जागतिक मंजुरीची प्रतीक्षा; आता WHO नं मागितली ही माहिती
संपूर्ण लसीकरण झालेल्या लोकांना मास्क न घालण्याची परवानगी देणारा इस्रायल (Israel No Mask rule) हा जगातील पहिला देश होता. इस्रायल अत्यंत वेगवान लसीकरण मोहीम राबवून जनतेला मास्कमुक्त केले पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान पसरलेल्या कोरोना विषाणूच्या डेल्टा प्रकारामुळे,रुग्ण संख्या वाढू लागल्यानं तिथं पुन्हा मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले. आज जगात मास्क घालण्यापासून मुक्तता झालेल्या देशांमध्ये ब्रिटन (Britain), अमेरिका (USA), स्वीडन, चीन, न्यूझीलंड, हंगेरी, इटली यांचा समावेश आहे. अलीकडेच सौदी अरेबियानेही (Saudi Arabia) लसीकरण पूर्ण झालेल्या लोकांना मास्क न घालण्याची परवानगी दिली आहे. ज्या देशांमध्ये 50 टक्क्यापेक्षा जास्त लोकसंख्येचे लसीकरण पूर्ण झाले आहे. त्या देशांनी लसीकरण पूर्ण झालेल्या लोकांची मास्कमधून सुटका केली आहे. अमेरिकेनं तर 37 टक्के लोकसंख्येचे लसीकरण पूर्ण केल्यानंतर जनतेला मास्क न घालण्याची परवानगी दिली होती.
YESS! नवा व्हेरियंट नाही, तिसऱ्या लाटेचा धोकाही टळला! वाचा सविस्तर
आता आपल्या देशात तर आपण 100 कोटी लसीचे डोस देण्याचा टप्पा आज पूर्ण करण्याची चिन्हे आहेत. त्यामुळं आपली ही मास्कमधून सुटका होऊ शकते अशी आशा जनतेला वाटत आहे. त्यामुळं दिवाळी मास्क मुक्त होणार अशी जोरदार अपेक्षा व्यक्त होत आहे. याबाबत तज्ज्ञांचे मत जाणून घेतले असता, त्यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे. कारण त्यांच्या मते, अद्याप भारतातील पूर्ण लसीकरणाचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा कमी आहे.
आपल्या देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपल्या देशात 16 जानेवारी 2021 पासून लसीकरण मोहिमेला (Vaccination Drive in India) सुरुवात झाली. लसीचा पुरवठा, शीतकरण व्यवस्था, वाहतूक व्यवस्था, लसीकरण केंद्र व्यवस्थापन आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे जनजागृती अशा अनेक आव्हानांना तोंड देत या मोहिमेत सुरुवातीचे 20 कोटी लसीचे डोस देण्यासाठी तब्बल 131 दिवसाचा कालावधी लागला. त्यापुढील 20 कोटी डोस 52 दिवसात देण्यात आले. 40 ते 60 कोटी डोस देण्यासाठी 39 दिवस लागले, तर 60 कोटी ते 80 कोटी डोस देण्यासाठी फक्त 24 दिवस लागले.
आता 80 कोटी ते 100 कोटीपर्यंतचा टप्पा आपण 31 दिवसात पूर्ण करण्याची चिन्हे आहेत. याच गतीने लसीकरण सुरू राहिले, तर देशात 216 कोटी लसीचे डोस देण्यासाठी आणखी 175 दिवस लागतील. म्हणजेच 5 एप्रिल 2022 च्या आसपास आपण हा आकडा पार करू शकतो. सरकारने डिसेंबरपर्यंत हे उद्दिष्ट साध्य करण्याची घोषणा केली आहे.
‘ही’ अट पूर्ण नसेल, तर किराणाही मिळणार नाही! जर्मनीत नवा नियम
मास्क मुक्तीबाबत एपिडेमियोलॉजिस्ट डॉ चंद्रकांत लहरिया म्हणाले की, भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशात 85टक्के लोकसंख्येचे पूर्णपणे लसीकरण होईपर्यंत मास्क न घालण्याला परवानगी देणे धोकादायक ठरू शकते.ज्या देशांमध्ये अशी सूट देण्यात आली आहे त्यांची लोकसंख्या भारतापेक्षा खूपच कमी आहे. आपण आपल्या गरजेनुसार निर्णय घेणे महत्त्वाचे आहे. आपण 100 कोटी डोस दिले असले तरी देशातील 20टक्के लोकसंख्येचेच पूर्ण लसीकरण झाले आहे. 29 टक्के लोकांना लसीचा एकच डोस देण्यात आला आहे. त्यामुळे मास्क घालण्यातून सुटका होण्यासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करणे गरजेचे आहे.
ब्रोकरेज फर्म यश सिक्युरिटीजनेही याला दुजोरा दिला आहे. त्यांच्या अहवालानुसार, जानेवारीपर्यंत देशातील 60 ते 70 टक्के लोकसंख्येचे पूर्ण लसीकरण होईल. तोपर्यंत हर्ड इम्युनिटी म्हणजे सामुहिक प्रतिकारशक्ती विकसित झालेली असेल. तेव्हा लोकांची मास्क घालण्यापासून सुटका होऊ शकते. त्यामुळे मास्कपासून सुटका होण्यासाठी आपल्याला आणखी किमान 6 ते 8 महिने प्रतीक्षा करावी लागेल.
तसेच आपल्या देशात प्रत्येक राज्यात लसीकरण झालेल्या लोकांचे प्रमाण कमी अधिक आहे. त्यामुळे मास्कमधून सूट दिल्यास संसर्गाचा धोका वाढू शकतो. लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात कमी लसीकरण उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडमध्ये झाले असून, या तीन राज्यांच्या लोकसंख्येच्या केवळ 12 टक्के लोकांचे पूर्ण लसीकरण झाले आहे. झारखंडमध्ये 36 टक्के लोकांना तर बिहारमध्ये 37 टक्के लोकांना लसीचा एकच डोस देण्यात आला आहे. उत्तर प्रदेशमध्ये 40 टक्के लोकसंख्येला लसीचा एक डोस देण्यात आला आहे. खरंतर देशात सर्वाधिक लसीचे डोस उत्तर प्रदेशात देण्यात आले आहेत. मात्र तिथल्या 23 कोटी लोकसंख्येच्या मानाने हे प्रमाण खूप कमी आहे. लोकसंख्येनुसार लसीकरण करण्यात महाराष्ट्राव्यतिरिक्त अनेक मोठी राज्ये मागे पडली आहेत. देशातील 17.4 टक्के लोकसंख्या उत्तर प्रदेशात आहे, तर एकूण लसीकरणाच्या फक्त 11.9 टक्के लसीकरण तिथं झालं आहे. तिथल्या बहुतेक जिल्ह्यांमध्ये, 15 टक्क्यांपेक्षा अधिक लोकसंख्येला दोन्ही डोस मिळू शकलेले नाहीत. कमीत कमी लसीकरण असलेल्या 100 जिल्ह्यांपैकी 47 जिल्हे उत्तर प्रदेश आणि बिहारमधील आहेत.
देशातील Vaccine चा तुटवडा संपला; राज्यांकडे स्टॉकमध्ये इतके डोस शिल्लक
आतापर्यंत फक्त दोन राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्येचे पूर्ण लसीकरण झाले आहे. सिक्कीम या ईशान्येकाडील राज्यात सर्वाधिक म्हणजे 64 टक्के लोकांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. त्यानंतर गोव्यात सुमारे 55 टक्के लोकांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत. लक्षद्वीप आणि दादरा नगर हवेली या दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये बहुसंख्य लोकसंख्येचे पूर्ण लसीकरण झाले आहे. लक्षद्वीपमध्ये 65 टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्येन दोन्ही डोस देण्यात आले आहेत.
जिल्हा स्तरावर जास्तीत जास्त लसीकरण हरियाणामधील गुडगाव इथे 83टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्येचे पूर्ण लसीकरण करण्यात आले आहे. तर हिमाचलमधील किन्नौरमध्ये 74टक्के आणि पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये 60टक्क्यांपेक्षा जास्त लोकांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत. सर्वात कमी लसीकरण झालेल्या जिल्ह्यांमध्ये पंजाबमधील फिरोजपूर, त्यानंतर सोनिया गांधींचा (Sonia Gandhi) मतदारसंघ रायबरेलीसह (raibareli) उत्तर प्रदेशातील सात जिल्ह्यांचा समावेश आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर, आपल्या देशात मास्क मुक्ती (Mask Free) होण्यास आणखी काही काळ प्रतीक्षा करणे योग्य ठरेल असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. मात्र सरकार याबाबतीत काय भूमिका घेते हे महत्त्वाचे आहे. लोकानुनयासाठी सरकार मास्क मुक्तीचा निर्णय घेते का हे बघणे औत्स्युक्याचे ठरेल. दिवाळी आता अगदी तोंडावर आली आहे, त्यामुळे लवकरच याचा सोक्षमोक्ष लागेल. दिवाळी मास्क मुक्त होते का मास्क मुक्तीसाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल हे लवकरच स्पष्ट होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona updates, Corona vaccine, Coronavirus, India