• Home
 • »
 • News
 • »
 • coronavirus-latest-news
 • »
 • कोव्हॅक्सिनला अजूनही जागतिक मंजुरीची प्रतीक्षा; आता WHO नं मागितली ही माहिती

कोव्हॅक्सिनला अजूनही जागतिक मंजुरीची प्रतीक्षा; आता WHO नं मागितली ही माहिती

ग्लोबल हेल्थ ऑर्गनायझेशनने म्हटलं की, 'आम्हाला माहिती आहे की अनेक लोक कोव्हॅक्सिनचा कोरोना आपात्कालीन वापराच्या सूचीमध्ये समावेश व्हावा यासाठी डब्ल्यूएचओच्या शिफारशीची वाट पाहत आहेत, परंतु आम्ही हे घाईत करू शकत नाही.

 • Share this:
  नवी दिल्ली 19 ऑक्टोबर : जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) भारत बायोटेककडून (Bharat Biotech) त्यांच्या कोव्हॅक्सिन (Covaxin) या कोरोना लसीबद्दल (Corona Vaccine) अधिक माहिती मागितली आहे. डब्ल्यूएचओने सोमवारी सांगितलं की, भारत बायोटेककडून 'कोव्हॅक्सिन' बद्दल अतिरिक्त माहितीची अपेक्षा आहे. लस सुरक्षित आहे याची खात्री करण्यासाठी त्याचे संपूर्ण मूल्यांकन करणे आवश्यक आहे आणि ही लस घाईघाईत तयार झालेली नसेल तरच तिला जागतिक मंजुरी मिळू शकते. ‘ही’ अट पूर्ण नसेल, तर किराणाही मिळणार नाही! जर्मनीत नवा नियम ही लस विकसित करणाऱ्या हैदराबादस्थित भारत बायोटेकने 19 एप्रिल रोजी जागतिक आरोग्य संघटनेकडे या लसीसाठी ईओआय (एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट) सादर केली. ग्लोबल हेल्थ ऑर्गनायझेशनने एका ट्विटमध्ये म्हटलं आहे की, 'आम्हाला माहिती आहे की अनेक लोक कोव्हॅक्सिनचा कोरोना आपात्कालीन वापराच्या सूचीमध्ये समावेश व्हावा यासाठी डब्ल्यूएचओच्या शिफारशीची वाट पाहत आहेत, परंतु आम्ही हे घाईत करू शकत नाही. डब्ल्यूएचओने पुढे म्हटलं, की आपात्कालीन वापरासाठी एखाद्या प्रोडक्टची शिफारस करण्यासाठी आम्हाला याची चांगल्या पद्धतीनं खात्री करून घ्यावी लागते, की हे पूर्णपणे सुरक्षित आणि प्रभावी आहे. लस उत्पादक भारत बायोटेक डब्ल्यूएचओला नियमितपणे डेटा देत आहे आणि डब्ल्यूएचओ तज्ञांनी या डेटाचे पुनरावलोकन केले आहे. WHO आज कंपनीकडून अतिरिक्त माहितीची अपेक्षा करत आहे, असं त्यांनी सांगितलं. 262 दिवसांनंतर हा देश घेणार मोकळा श्वास; 9 महिन्यांपासून होतं Lockdown डब्ल्यूएचओच्या मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी म्हटलं, की एजन्सीचा तांत्रिक सल्लागार गट 26 ऑक्टोबर रोजी बैठक घेऊन आपत्कालीन वापराच्या यादीमध्ये भारताची कोव्हॅक्सिन लस सूचीबद्ध करण्याचा विचार करेल. यानंतर डब्ल्यूएचओचे हे ट्विट आलं आहे. देशव्यापी कोरोना लसीकरण कार्यक्रमात कोव्हॅक्सिनचा वापर केला जात आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published: