नवी दिल्ली, 18 ऑक्टोबर : देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आता मावळली असल्याचं निरीक्षण (No possibility of third wave says experts )अनेक शास्त्रज्ञांनी नोंदवलं आहे. कोरोनाचा कुठलाही नवा व्हेरियंट (No new corona variant found this month) देशात आलेला नसून ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात तिसऱ्या लाटेचा वर्तवण्यात आलेला धोका टळल्याचं शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे. लाटेचा धोका टळला असला तरी (No third wave but existence of virus for longer time) कोरोनाचा धोका मात्र कायम असल्याचा इशाराही तज्ज्ञांनी दिला आहे.
नवा व्हेरियंट नाही
भारतात डेल्टा प्लस व्हेरियंटमुळेच कोरोनाची दुसरी लाट आली होती. त्यामुळे याच व्हेरियंटमुळे तिसरी लाट येण्याची शक्यता नसल्याचं मत वर्तवण्यात येत होतं. तर काही तज्ज्ञ मात्र तिसऱ्या लाटेची शक्यताही वर्तवत होते. आयसीएमआरकडूनही ऑक्टोबर महिन्यात तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र नवा व्हेरियंट आला तरच तिसरी लाट येऊ शकेल, असं अनेक तज्ज्ञ सांगत होते. ‘टाईम्स ऑफ इंडिया’तील रिपोर्टनुसार ऑक्टोबर महिन्यात जिनोम सिक्वेन्सिंगची कुठलाही घटना आढळून आलेली नाही. याचाच अर्थ नवा व्हेरियंट समोर आला नसल्याचं बंगळुरूचे हेल्थ कमिशनर रणदीप डी. यांनी म्हटलं आहे.
तिसऱ्या लाटेची शक्यता धूसर
भारतात सध्या तिसऱ्या लाटेची शक्यता धूसर असल्याचं मत कोविड-19 वर्किंग ग्रुपचे चेअरमन डॉ. एन. के. अरोडा यांनी व्यक्त केलं आहे. कोरोनाची भीती अद्याप पूर्ण संपलेली नाही. मात्र तिसऱ्या लाटेची शक्यता सध्या तरी दिसत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
कोरोना बनतेय एंडेमिक
भारतात आता कोरोना ही ‘एंडेमिक’ बनत असल्याचं मत जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी व्यक्त केलं आहे. अर्थात, कोरोनाचं अस्तित्व कायम राहणार असून या रोगाचा दीर्घकाल मुक्काम जगात राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
हे वाचा-262 दिवसांनंतर हा देश घेणार मोकळा श्वास; 9 महिन्यांपासून होतं Lockdown
लसीकऱणाचा परिणाम
भारतात वेगाने होणाऱ्या लसीकऱणामुळेच तिसरी लाट टळल्याचं निरीक्षण काही तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. एकीकडे लसीकऱणाचा वाढलेला वेग आणि दुसरीकडे नवा व्हेरियंट न येणं या कारणांमुळे भारतात कोरोनाची तिसरी लाट टळली असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. भारतीय नागरिकांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी मानली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Corona virus in india