मुंबई, 21 मे : राज्यातील सहा जागांसाठी 10 जून रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीवरुन
(Rajyasabha Members Election) राज्यात आता राजकारण तापू लागलं आहे. विधानसभेच्या आकडेवारीनुसार भाजप दोन, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्याकडे प्रत्येकी एका जागेसाठी संख्याबळ आहे. पण, सहाव्या जागेसाठी कोणाकडेही पुरेसे संख्याबळ नाही. अशात राज्यसभेच्या सहाव्या जागेवर संभाजीराजेंनी
(Sambhaji Raje) अपक्ष निवडणूक लढण्याचं जाहीर केलं आहे. तर शिवसेनेने देखील या जागेवर आपला उमेदवार देण्याचं म्हटलं आहे. राज्यसभेचा सदस्य हा लोकसभेच्या सदस्याप्रमाणे संसदेचाही महत्त्वाचा सदस्य असतो. राज्यसभा हे संसदेचे वरचे सभागृह आहे, लोकसभेत विधेयक मंजूर झाल्यानंतर ते राज्यसभेतही मंजूर होणे आवश्यक असते. राज्यसभेत विधेयक मंजूर झाले नाही तर तो कायदा होऊ शकत नाही. पण तुम्हाला माहीत आहे का राज्यसभेचे खासदार कसे निवडून येतात. चला तर मग बघूया राज्यसभा आणि त्याचे सदस्य कसे निवडले जातात.
राज्यसभा म्हणजे काय?
देशातील पहिल्या लोकसभा निवडणुकीनंतर संसदेत आणखी एका सभागृहाची गरज भासू लागली. अशा स्थितीत 23 ऑगस्ट 1954 रोजी राज्यसभेच्या स्थापनेची घोषणा करण्यात आली. राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे. ते कधीही बरखास्त होत नाही. त्याच्या सदस्यांचा कार्यकाळ 6 वर्षांचा आहे. राज्यसभेच्या कमाल जागांची संख्या 250 आहे. हे घटनेत निश्चित करण्यात आले आहे. 12 सदस्य राष्ट्रपती नियुक्त करतात. हे 12 सदस्य क्रीडा, कला, संगीत अशा क्षेत्रांतील आहेत. उर्वरित 238 राज्यसभा खासदार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून आले आहेत.
लोकसंख्येनुसार राज्यसभेच्या जागा
राज्यघटनेच्या चार अनुसूचीनुसार, त्या राज्याच्या किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या लोकसंख्येच्या आधारावर कोणत्या राज्यात राज्यसभेच्या जागांची संख्या निश्चित केली जाईल. उदाहरणार्थ, उत्तर प्रदेशची लोकसंख्या सर्वाधिक आहे. अशा स्थितीत उत्तर प्रदेशसाठी 31 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. यानंतर महाराष्ट्रात 19 जागा आहेत. त्याचप्रमाणे पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये 16-16 जागा आहेत. दुसरीकडे, गोवा, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोराम या राज्यांमध्ये प्रत्येकी एकच राज्यसभेची जागा आहे.
Rajya Sabha: राज्यसभेच्या सहाव्या जागेवर कोणाला उमेदवारी? वर्षा बंगल्यावर खलबतं; मुख्यमंत्र्यासोबतच्या बैठकीत काय ठरलं?
अशा प्रकारे राज्यसभेच्या एकूण सदस्यांची संख्या केवळ 233 असू शकते. अंदमान आणि निकोबार बेटे, लक्षद्वीप, चंदीगड, दमण आणि दीव, दादरा आणि नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशांना राज्यसभेत प्रतिनिधी नाहीत. म्हणजेच सध्या राज्यसभेची एकूण सदस्य संख्या 245 आहे. त्यातील एक तृतीयांश सदस्यांचा कार्यकाळ दर दोन वर्षांनी पूर्ण होतो आणि त्यानंतर त्या जागांवर निवडणुका होतात.
कोण खासदार होऊ शकतो?
खासदार होण्यासाठी व्यक्तीचे वय 30 वर्षे तसेच भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे. घटनेच्या कलम 102 नुसार, उमेदवाराला दिवाळखोर घोषित केले असेल किंवा काही इतर वर्गातील व्यक्ती राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी अपात्र ठरतात.
कोण मत देतो?
राज्यसभा सदस्याच्या निवडणुकीत सामान्य माणूस लोकसभा निवडणुकीप्रमाणे मतदान करत नाही, तर जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी (आमदार) या निवडणुकीत सहभागी होतात आणि मतदान करतात.
संभाजीराजेंना थेट मुख्यमंत्र्यांकडून ऑफर, पण सोमवारपर्यंत राजेंचा होकार न आल्यास...
गणना कशी आहे
यामध्ये प्रत्येक राज्याच्या आमदारांच्या संख्येवर विजय ठरतो. राज्यांच्या विधानसभेच्या एकूण जागांच्या आधारे विजयासाठी किती मतांची आवश्यकता असेल हे ठरविले जाते. उदाहरणार्थ, राजस्थानमध्ये एकूण 200 आमदार आहेत आणि जर 9 जागांसाठी राज्यसभेची निवडणूक असेल, तर एकूण 200 जागांवर निवडून द्यायच्या सदस्यांची संख्या एक जोडून भागली जाते, म्हणजे 9 ला एक जोडून भाग दिला जातो. याचा अर्थ 200 भागीले 10. त्यानंतर त्यात एकाची भर पडते, म्हणजे विजयासाठी 21 मतांची आवश्यकता असते. या निवडणुकीत प्रत्येक आमदार प्राधान्याने मतदान करतो. यामध्ये आमदारांना कागदावर लिहून सांगावे लागते की त्यांची पहिली पसंती कोण आणि दुसरी कोण. ज्याला पहिल्या पसंतीची सर्वाधिक मते मिळतील तो विजेता मानला जाईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.