Home /News /explainer /

इंटरनेटच्या मायाजालातून स्वत:ला 'Delete' करायचं आहे? तुमच्याकडे आहेत हे मार्ग

इंटरनेटच्या मायाजालातून स्वत:ला 'Delete' करायचं आहे? तुमच्याकडे आहेत हे मार्ग

अनेक कंपन्या Facebook, Instagram, WhatsApp यांवरची युझर्सची माहिती चोरून ती व्यावसायिक कंपन्यांना विकत असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे अनेकांनी सोशल मीडियाचा वापर न करण्याचा निर्णय घेतला आहे. पण इंटरनेटवरुन स्वत:ला पूर्णपणे डिलीट करणं तसं कठीणच आहे

पुढे वाचा ...
मुंबई, 21 जानेवारी: आजकाल इंटरनेटविना (Internet) जगून दाखवा म्हटलं तर बहुतांश दुनिया, विशेषतः तरुणाई हे अशक्य असल्याचं उत्तर देईल, इतकं इंटरनेटचं विश्व आपल्या आयुष्यातला महत्त्वाचा घटक बनलं आहे. इंटरनेटच्या माध्यमातून सोशल मीडियाद्वारे सगळं जग आपल्या मोबाइलमध्ये, लॅपटॉपमध्ये सामावलं आहे. एका क्लिकवर अनेक गोष्टी करणं शक्य झालं आहे. या सगळ्यात आपलं खासगीपण हिरावत चालल्याचंही समोर येत आहे. अलीकडच्या काळात प्रायव्हसीवर अतिक्रमण करण्याच्या कंपन्यांच्या या धोरणाबद्दल नाराजी व्यक्त होत असून, खासगी माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी नागरिक आग्रही झालेले दिसून येत आहेत. अॅमेझॉन (Amazon), फेसबुक (Facebook) आणि गुगल (Google) यांसारख्या अनेक कंपन्या आपली आवडनिवड, आरोग्याबद्दलची माहिती, जनसंपर्क यांचा वापर व्यावसायिक उपायोगासाठी करत असल्याचं उघडकीस आलं आहे. अनेक कंपन्या फेसबुक, इन्स्टाग्राम (Instagram), व्हॉट्सअॅप (Whatsapp) यांवरची युझर्सची माहिती चोरून ती व्यावसायिक कंपन्यांना विकत असल्याचंही स्पष्ट झालं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर अनेकांनी सोशल मीडियाचा (Social Media) वापर न करण्याचा निर्णय घेतला आहे; पण अनेकांना इंटरनेटशिवाय किंवा सोशल मीडियाशिवाय राहणं अशक्य असल्याचं लक्षात आलं आहे. तसंच आपली सोशल मीडियावरची अकाउंट्स कायमची नष्ट करणं किंवा आपली सगळी माहिती नष्ट करणं ही किचकट प्रक्रिया असल्यानं अनेकांची इच्छा असूनही इंटरनेटच्या मायाजालातून सुटका करून घेणं कठीण जात आहे. या समस्येवर काही उपाय सुचवण्यात आले आहेत. याआधारे तुम्ही इंटरनेटवरचं तुमचं अस्तित्व कमी करू शकता. वायर्ड डॉट कॉमनं याबाबतचं वृत्त दिलं आहे. हे वाचा-इंडोनेशियाच्या नव्या राजधानीचं हिंदू संस्कृतीशी नातं, वाचा Nusantara चा इतिहास डेटा ब्रोकर्स कंपन्यांना तुमची माहिती नष्ट करण्यास सांगा युझर्सची माहिती गोळा करणं आणि ती विकणं हा एक मोठा व्यवसाय आहे. 2019 मध्ये अमेरिकेतल्या व्हरमाँट राज्यानं एक कायदा करून तृतीय-पक्षाची वैयक्तिक माहिती खरेदी आणि विक्री करणाऱ्या सर्व कंपन्यांना नोंदणी अनिवार्य केली. तेव्हा तब्बल 120 हून अधिक कंपन्यांनी नोंदणी केली. त्यामध्ये एखाद्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी सर्च टूल्स बनवणाऱ्या कंपन्या, लोकेशन डेटा हाताळणाऱ्या कंपन्या, आरोग्यविषयक माहितीचा वापर करणाऱ्या कंपन्या यांचा समावेश होता. या कंपन्या युझर्सचं नाव, पत्ता, जन्मतारीख ते सोशल सिक्युरिटी नंबर, खरेदीच्या सवयी, युझर कुठे शाळेत गेलात आणि किती दिवस गेलात अशी सर्व प्रकारची माहिती जमा करतात. अशा बड्या डेटा ब्रोकर्समध्ये Acxiom, Equifax, Experian, Oracle आणि Epsilon या कंपन्यांचा समावेश आहे. यापैकी काही डेटा ब्रोकर्स कंपन्याच युझर्सना आपल्या वैयक्तिक माहितीचा वापर करण्यास मनाई करण्याची परवानगी देतात. अर्थात हे तुम्ही कुठे राहता यावर अवलंबून असतं. ही प्रक्रियाही साधी सोपी नाही. यासाठी युझर्सना अनेकदा त्या कंपनीशी ई-मेलद्वारे संपर्क साधावा लागतो, ऑनलाइन फॉर्म भरावे लागतात आणि माहिती द्यावी लागते. हे वाचा-5G नेटवर्कमुळे विमानातील यंत्रणेवर होणार परिणाम? एअरलाइन्सनी दिला धोक्याचा इशारा अमेरिकेतल्या प्रायव्हसी राइट्स क्लिअरिंग हाउसने अशा डेटा ब्रोकर्सचा (Data Brokers) एक डेटाबेस तयार केला आहे. त्यामध्ये त्यांचे ई-मेल आयडी, त्यांच्या गोपनीयता धोरणाची माहिती देणाऱ्या लिंक्स आणि ते तुम्हाला तुमची माहिती वापराची परवानगी रद्द करू देतात की नाही याबद्दलची माहिती आहे. या यादीत 231 अमेरिकी कंपन्या आहेत, यावरून डेटा ब्रोकरेज उद्योग किती मोठा आहे याची कल्पना येईल. युरोपच्‍या (Europe) GDPR किंवा कॅलिफोर्नियाच्‍या कन्झ्युमर प्रायव्हसी अॅक्टअंतर्गत येणारे वैयक्तिक माहिती हटवण्यासाठी कंपन्यांना सांगू शकतात. युवर डिजिटल राइट्स (YourDigitalRights) या समूहाने 10 सर्वांत मोठ्या डेटा ब्रोकर्ससाठी युझर्सची माहिती हटवण्याच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी फॉर्म तयार केले आहेत. यापैकी एका कंपनीची निवड करून तिच्यासाठी असलेला अर्ज भरून त्या कंपनीला आपली खासगी माहिती हटवण्यास सांगणं, तसंच त्या माहितीचा वापर करण्यास मनाई करण्यापासून युझर्स खासगी माहिती सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीनं इंटरनेटवरचं अस्तित्व कमी करण्याच्या दिशेनं सुरुवात करू शकतात. गुगल सर्च रिझल्ट्स अपडेट करा आजकाल आपल्याला काहीही माहिती हवी असेल, तर आपण अगदी सहजपणे गुगल सर्चचा (Google Search) वापर करतो. अशा वेळी गुगल ज्या स्वरूपात माहिती दर्शवतं ते तुम्ही बदलू शकत नाही; मात्र जी माहिती दाखवली जात आहे ती अद्ययावत आहे, याची खात्री करण्यासाठी डॉक्सिंगसारख्या पद्धतीचा वापर करू शकता. एखादा सर्च दिल्यानंतर येणारी माहिती चुकीची असेल किंवा हानिकारक असेल तर ती काढून टाकण्याची विनंती तुम्ही केल्यास त्याचा विचार केला जाऊ शकतो. यामध्ये चुकीचं फोटो, बनावट माहिती, पोर्नोग्राफी; आर्थिक, वैद्यकीय किंवा राष्ट्रीय ओळख क्रमांक अशी महत्त्वाची माहिती किंवा एखाद्या वेबसाइटवरचे लहान मुलांचे चुकीचे फोटो असा डेटा काढून टाकण्यास सांगू शकता. यासाठी तुम्हाला एक फॉर्म सबमिट करावा लागेल आणि चुकीच्या माहितीचा पुरावा द्यावा लागेल. हे वाचा-तुमचंही PVC Aadhar कार्ड बाद होणार का? जाणून घ्या UIDAI चा नवा निर्णय 2014 मध्ये युरोपियन न्यायालयांमध्ये आणि 2018 मध्ये GDPR मध्ये विसरण्याचा अधिकार हे तत्त्व समाविष्ट करण्यात आलं आहे. यामध्ये गुगल सर्चमधून येणारी तुमच्याबद्दलची काही विशिष्ट माहिती काढून टाकण्याची मागणी करण्याचा हक्क प्रत्येकाला आहे; मात्र तुमच्याबद्दलची माहिती सार्वजनिक हिताची असेल तर ती गुगल सर्चमधून काढून टाकणं कठीण असतं. जुनी ऑनलाइन अकाउंट्स हटवा तुम्ही वापरत नसलेली अकाउंट्स शोधण्यासाठी आणि हटवण्यासाठी कोणताही शॉर्टकट उपलब्ध नाही; मात्र तुम्हाला तुमची ऑनलाइन उपस्थिती कमी करायची असेल तर तुम्हाला जुन्या मायस्पेस (Myspace), टम्बलर (Tumblr) यावरची अकाउंट्स शोधावी लागतील आणि त्यातली सर्व माहिती काढून टाकावी लागेल. त्यासाठी तुम्हाला लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर वेब ब्राउझर वापरावा लागेल आणि त्याला भरपूर वेळ लागेल. तुम्हाला आठवत असलेल्या सर्व जुन्या अकाउंट्सची यादी तयार करा. तुम्ही वापरलेले ई-मेल आयडी, युझरनेम, पासवर्ड आठवून साइन इन करा आणि त्यानंतर अकाउंट हटविण्याच्या प्रक्रियेनुसार काम करा. काही कंपन्या यासाठीही सेवा देतात. त्या तुमचे जुने ई-मेल स्कॅन करून तुमची जुनी खाती शोधण्याचा आणि हटवण्याचा प्रयत्न करतील. परंतु ते तुमचा डेटा कसा वापरत आहेत हे स्पष्ट नसते. त्यामुळे शक्यतो अशी सेवा न घेणं चांगलं. डिजिटल हिस्ट्री हटवा तुम्ही तुमची ऑनलाइन खाती हटवली नाहीत तरीही तुम्ही ऑनलाइन सेव्ह केलेली माहिती नष्ट करू शकता. कदाचित तुमच्या ई-मेल खात्यामध्ये (Email Account) अनेक वर्षांपूर्वीचे हजारो जुने मेसेज असतील. तुमच्‍या फेसबुक ( Facebook) आणि ट्विटर (Twitter) खात्‍यांमध्‍ये तुम्ही पब्लिक न केलेल्या पोस्‍ट्स असण्याची शक्‍यता आहे. अशी माहिती तुम्ही हटवू शकता. तुम्ही जीमेल (Gmail) वापरत असाल, तर तुम्ही “older_than:” ही सर्च कमांड वापरून एक वर्ष किंवा 6 महिन्यांपूर्वीचे जुने मेसेज हटवू शकता. हे वाचा-हिंदूंची गरुड देवता मुस्लिम देश इंडोनेशियाचे राष्ट्रीय प्रतीक का आहे? सार्वजनिकरित्या पोस्ट केलेला डेटा म्हणजे फोटो किंवा मजकूर इतरांना मिळण्याची शक्यता जास्त असते. अशा वेळी तुम्ही तुमचं प्रोफाइल किंवा ताजी पोस्ट हटवण्याचा विचार करत असल्यास, प्रथम तुमच्या पोस्ट डाउनलोड करण्याचा आणि बॅकअप घेण्याची दक्षता घ्या. सर्व प्रमुख सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांच्या सेटिंग्जमध्ये बॅकअप पर्याय असतात. तुमची सर्व जुनी ट्वीट्स मोठ्या प्रमाणात हटवण्यासाठी ट्विटरकडे (Twitter) कोणतीही साधनं नाहीत. परंतु ट्वीट डिलीटर आणि ट्विट डिलीट अशा थर्ड-पार्टीज ही सेवा देतात. तुम्ही खूप जुना आणि मोठ्या प्रमाणात डेटा हटवत असाल, तर (ट्विट डिलीटर) TweetDeleter आणि ट्विट डिलीटच्या सेवांमध्ये अडचण येऊ शकते. ट्विट डिलीटर मासिक 5.99 डॉलर्स शुल्क आकारतं; मात्र कोणत्याही थर्ड पार्टी सेवेला तुमच्या ऑनलाइन खात्यांमध्ये प्रवेशाची परवानगी दिल्यानं त्यांच्या हातात तुमचा सगळा डेटा जातो; मात्र या कंपन्या तुमच्या डेटाचं काय करतात याचा तपशील देतात. तुम्हाला तुमचं ट्विटर अकाउंट पूर्णपणे हटवायचं असेल तर तुम्हाला ही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. गुगल (Google) तुमच्या वैयक्तिक फेसबुक पोस्ट्सचा इंडेक्स करत नाही. त्यामुळे त्या पोस्ट्स गुगल सर्चमध्ये दिसणार नाहीत. तुम्ही तुमची जास्तीत जास्त जुनी माहिती इंटरनेटवरून काढून टाकण्याचा प्रयत्न करत असाल, तर तुम्ही तुमच्या जुन्या पोस्टदेखील हटवाव्यात किंवा कमीत कमी लोकांना त्या दिसण्याचं थांबवावं. यासाठी फेसबुक ( Facebook) सेटिंग्जमध्ये प्रायव्हसी ऑप्शनवर जा आणि अॅक्टिव्हिटी लॉग करा. पोस्ट्सपासून, तुम्ही टॅग केलेल्या फोटोजपर्यंत जे तुम्हाला हटवायचं आहे ते निवडा आणि ही माहिती नष्ट करा. अनेक वर्षांची माहिती हटवायची असल्यास थोडा जास्त वेळ द्यावा लागेल किंवा तुम्ही तुमचे फेसबुक अकाउंट पूर्णपणे हटवू शकता. थर्ड पार्टी डेटा-रिमूव्हल सेवा घेताना सावधान इंटरनेटवरून स्वतःची माहिती नष्ट करण्याचे अनेक मार्ग आहेत; पण ते सगळे वेळखाऊ आहेत. तसंच त्यासाठी काही कागदपत्रांची पूर्तताही करावी लागते. बदनामीकारक विधानं, फोटो आणि इतर काही हानिकारक बाबींचा समावेश असेल तर कायदेशीर सल्ला घेऊन डेटा काढून टाकणं योग्य ठरतं. कोणतीही थर्ड पार्टी डेटा-रिमूव्हल सेवा घेताना सावधगिरी बाळगली पाहिजे. वेबवरून काढून टाकण्यात मदत करण्यासाठी काही सशुल्क पर्याय आहेत. भविष्यातलं संरक्षण तुमचा डेटा इंटरनेटपासून पूर्णपणे दूर ठेवणं अशक्य आहे; मात्र तुम्ही काही उपाय करू शकता. यासाठी सर्वांत प्रथम, तुम्हाला किती माहिती ऑनलाइन ठेवायची आहे याचा विचार करा. तुम्ही नवीन ऑनलाइन अकाउंटसाठी साइन अप करत असताना, तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती देण्याची आवश्यकता आहे का किंवा तुमची ओळख लपवण्यासाठी बर्नर अकाउंट वापरणं चांगलं आहे का हे लक्षात घ्या. शक्य तिथे तुमच्या सर्व ऑनलाइन कामांसाठी बिग टेक वापरणं टाळा. तुमचा डेटा संकलित न करणारे वेब ब्राउझर आणि सर्च इंजिन निवडा. एंड-टू-एंड-एनक्रिप्टेड अॅप्स वापरा आणि मेसेज डीसअॅपियर करा आणि व्हॉट्सअॅप (WhatsApp), इन्स्टाग्राम (Instagram), गुगल (Google), अॅमेझॉन (Amazon), स्पॉटिफाय (Spotify) यांसह अन्य कोणती अॅप्स तुमचा कोणता डेटा गोळा करतात ते समजून घ्या. या उपायांद्वारे तुम्ही इंटरनेट विश्वातलं तुमचं अस्तित्व, माहिती कमी करू शकता; मात्र तुमच्या या निर्णयाविषयी तुम्ही तुमचे मित्र आणि कुटुंबीयांशीही चर्चा केली पाहिजे. सोशल मीडियावर तुमचा फोटो किंवा काही माहिती पोस्ट न करण्याच्या विनंतीला बहुतेक जण मान्यता देतील.
First published:

Tags: Internet, Internet use

पुढील बातम्या