Home /News /explainer /

तुमचंही PVC Aadhar कार्ड बाद होणार का? कोट्यवधी लोकांवर होणार परिणाम, जाणून घ्या UIDAI चा नवा निर्णय

तुमचंही PVC Aadhar कार्ड बाद होणार का? कोट्यवधी लोकांवर होणार परिणाम, जाणून घ्या UIDAI चा नवा निर्णय

Aadhaar News: खुल्या बाजारातून तयार केलेल्या आधार PVC कार्ड (PVC Aadhaar card) ला UIDAI ने अमान्य घोषित केलं आहे. परिणामी आता कोट्यवधी लोकांचे आधार पीव्हीसी कार्ड अवैध ठरणार आहे.

    नवी दिल्ली, 19 जानेवारी : आधारकार्डच्या संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. तुम्ही बाजारातून आधार स्मार्ट कार्ड घेतले असेल तर ते वैध ठरणार नाही. आधार कार्ड सेवा पुरवणाऱ्या युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने बाजारातून तयार करण्यात येणारे पीव्हीसी कार्ड वैध नसल्याचे म्हटले आहे. अधिकृतरीत्या UIDAI ने जारी केलेलं आधार कार्ड (Aadhar PVC card latest news) कोणतीही व्यक्ती 50 रुपयांचे शुल्क अदा करून मागवू शकते. पण, हे आधार कार्ड अवैध ठरवण्यामागचं कारण माहिती आहे का? सुरक्षा त्रुटी त्यात सुरक्षेच्या अनेक त्रुटी असल्याने ते स्वीकारता येणार नाही, असे त्यात म्हटले आहे. सोशल मीडियावर दिलेल्या माहितीमध्ये UIDAI ने म्हटले आहे की, आम्ही हे कार्ड अवैध ठरवत आहोत. कारण त्यात कोणतेही सुरक्षा वैशिष्ट्य नाही. जर तुम्हाला आधारचे पीव्हीसी कार्ड बनवायचे असेल तर तुम्ही 50 रुपये भरून ते अधिकृतरित्या मागवू शकता. UIDAI वेबसाइटवरून डाउनलोड करा UIDAI ने सांगितले की, आधार स्मार्ट कार्ड छापले गेले किंवा खुल्या बाजारातून बनवले गेले तर ते वैध ठरणार नाहीत. त्यात म्हटले आहे की तुम्ही UIDAI वरून आधार पत्र किंवा आधार डाउनलोड करू शकता. आधार PVC कार्ड हे मुळात डिजिटल स्वाक्षरी असलेला सुरक्षित QR कोड आणि छायाचित्र आहे. त्यात लोकसंख्याशास्त्रीय तपशील देखील आहेत. हे सर्व सुरक्षा वैशिष्ट्यांसह येते. ते UIDAI द्वारे फक्त पोस्टाद्वारे पाठवले जाते. OBC Reservation चा मार्ग मोकळा, सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला मोठा दिलासा माहितीचे अनेक प्रकार आहेत UIDAI नुसार, या कार्डमध्ये सुरक्षित QR कोड, होलोग्राम, मायक्रो टेक्स्ट, जारी करण्याची तारीख आणि कार्डची प्रिंट आणि इतर माहिती आहे. यासाठी तुम्ही UIDAI वेबसाइटची मदत घेऊ शकता. यासाठी तुम्ही https://myaadhaar.uidai.gov.in/ ला भेट देऊ शकता. त्यानंतर ऑर्डर आधार पीव्हीसी कार्डवर क्लिक करा. 12-अंकी आधार क्रमांक किंवा 28-अंकी नावनोंदणी आयडी प्रविष्ट करणे आवश्यक आहे. सिक्युरिटी कोड टाकल्यानंतर मोबाईलवर आलेला ओटीपी भरावा लागेल. त्यानंतर अटी व शर्ती मान्य कराव्या लागतील. यानंतर तुम्ही सबमिट बटण दाबून ओटीपी व्हेरिफिकेशन करू शकता. या प्रक्रियेनंतर तुम्हाला पेमेंटचा पर्याय मिळेल. यामध्ये तुम्हाला पेमेंट गेटवेवर नेले जाईल आणि तेथे तुम्हाला क्रेडिट, डेबिट किंवा नेट बँकिंगद्वारे पेमेंट करावे लागेल. पेमेंट केल्यानंतर तुम्हाला पावती मिळेल.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Aadhar card, Aadhar card link

    पुढील बातम्या