Home /News /explainer /

Explainer: एका दिवसात विकलं तब्बल 8.1 टन सोनं; नक्की काय आहे कारण? सामान्यांवर काय होणार परिणाम?

Explainer: एका दिवसात विकलं तब्बल 8.1 टन सोनं; नक्की काय आहे कारण? सामान्यांवर काय होणार परिणाम?

जगातल्या सर्वांत मोठ्या एक्स्चेंज ट्रेडेड फंडने (exchange traded fund - ईटीएफ) खुल्या बाजारात 8 टनांपेक्षा जास्त सोनं विकलं... तेही काही तासांत. याचा सोन्याच्या किमतींवर, सामान्यांच्या घरातल्या ठेवींवर काय परिणाम होईल? जाणून घ्या

नवी दिल्ली, 24 सप्टेंबर: भारतासहित जगभरातल्या शेअर बाजारांत (Stock market) सध्या मोठी तेजी आहे. सेन्सेक्स (Sensex leap to 60000), निफ्टी (Nifty) तर रोज विक्रमी वाढ नोंदवत आहेत. शेअर बाजारात आणखी तेजी राहण्याचा अंदाज आहे. यामुळे गुंतवणूकदारांनी (gold Investors) आपल्या गुंतवणुकीचा रोख आता शेअर बाजाराकडं वळवला आहे. एकीकडे शेअर्सचे भाव वाढत आहेत, तर सोन्याचे भाव घटत आहेत. शेअर बाजारातल्या तेजीचा लाभ घेण्यासाठी जगभरातले गुंतवणूकदार सोन्यातली गुंतवणूक काढून शेअर्समध्ये पैसे गुंतवत आहेत. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून सोन्याचे (gold rate today) दर मोठ्या प्रमाणावर घसरत आहेत. शुक्रवारी (24 सप्टेंबर) जगातल्या सर्वांत मोठ्या एक्स्चेंज ट्रेडेड फंडने (exchange traded fund - ETF )खुल्या बाजारात 8 टनांपेक्षा जास्त सोनं विकलं. एका वर्षातली सोन्याची ही सर्वाधिक विक्री आहे. याबाबतचं वृत्त ‘टीव्ही 9 हिंदी’नं दिलं आहे. जगभरातले गुंतवणूकदार सध्या सोन्यात गुंतवणूक करणं टाळत असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. शेअर बाजारात सध्या विक्रमी तेजी आहे. सोन्यातली गुंतवणूक घटत असल्याने पुढील काही महिने सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता फारच कमी आहे. मोठ्या ब्रोकरेज हाउसनीही सोन्याच्या लक्ष्याबाबत त्यांचे अंदाज बदलले आहेत. Gold Rate Today: खूशखबर! एका महिन्यात 1200 रुपयांनी उतरले सोन्याचे दर जगातली सर्वांत मोठी ईटीएफ असलेल्या एसपीडीआर होल्डिंग्जने (SPDR Holdings) शुक्रवारी 8.1 टन सोनं विकलं असल्याचं रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या वृत्तात म्हटलं आहे. या वर्षातली एका दिवसातली सोन्याची ही सर्वाधिक विक्री आहे. या विक्रीनंतर एसपीडीआरकडील सोन्याचा साठा 1000.79 टनांवरून 992.65 टनांवर आला आहे. याबाबत तज्ज्ञांनी म्हटलं आहे, की एसपीडीआर सध्याच्या स्तरावर नफा बुक करत आहे. शेअर बाजारातल्या परताव्यामुळे सोन्याची मोठ्या प्रमाणावर विक्री होत आहे. त्यामुळे सोन्याच्या किमतींत आणखी वाढ होण्याची शक्यता कमी आहे. Taj Hotel च्या कर्मचाऱ्याने केलं असं काही की रतन टाटांनीही केलं कौतुक, म्हणाले.. या पार्श्वभूमीवर रत्नं आणि दागिने उद्योगात U-Gov Bomnibus द्वारे नुकतंच एक सर्वेक्षण करण्यात आलं. पुढील तीन महिन्यांत सोन्याच्या दागिन्यांच्या मागणीत वाढ होण्याची अपेक्षा या उद्योगाला असल्याचं सर्वेक्षण सांगण्यात आलं आहे. तीन महिन्यांत शहरांमधल्या नागरिकांकडून सोन्याची मागणी 28 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज सर्वेक्षणात वर्तवण्यात आला. देशात 17 ते 20 ऑगस्टदरम्यान करण्यात आलेल्या या ऑनलाइन सर्वेक्षणात 2021 जणांची मतं घेण्यात आली. सर्वेक्षणातल्या पाचपैकी तीन जणांनी आपल्या कुटुंबासाठी सोनं खरेदी करणार असल्याचं सांगितलं. दिवाळी आणि सणासुदीला सोने खरेदीसाठी सर्वोत्तम काळ असल्याचं 69 टक्के जणांनी म्हटलं आहे. कोरोना काळात नोकरी गेली? चिंता नको, कमी गुंतवणुकीत सुरू करा हा व्यवसाय कोविड निर्बंधांमुळे घटलेली सोन्याची मागणी जानेवारी-मार्चमध्ये पुन्हा वाढण्याचा अंदाज रत्ने आणि दागिने उद्योगाकडून वर्तवण्यात आला होता; मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे मागणीत फारशी वाढ झाली नाही.
First published:

Tags: Gold, Gold and silver prices today, Gold bond

पुढील बातम्या