Taj Hotel च्या कर्मचाऱ्याने केलं असं काही की स्वत: रतन टाटांनी केलं कौतुक, Photo शेअर करत म्हणाले...
Taj Hotel च्या कर्मचाऱ्याने केलं असं काही की स्वत: रतन टाटांनी केलं कौतुक, Photo शेअर करत म्हणाले...
Ratan Tata Shared Post On Instagram
Ratan Tata Shared Post On Instagram: सोशल मीडियावर हा फोटो वेगाने व्हायरल होत आहे. यामध्ये एक कर्मचारी पावसादरम्यान एका भटक्या कुत्र्यासह त्याची छत्री शेअर करत आहे.
मुंबई, 24 संप्टेंबर: बऱ्याचदा हवामान किंवा मुसळधार पावसामुळे (Rain in Mumbai) सामान्यांसमोर अडचणी निर्माण होतात. कधीकधी पावसामुळे अशी परिस्थिती निर्माण होते की भटक्या प्राण्यांना (Stray Animals situation during Monsoon) आसराच मिळत नाही. अशा परिस्थितीत, आपल्याकडून एक छोटासा प्रयत्न किंवा दयाळूपणा या प्राण्यांना मोठा दिलासा देऊ शकतो. याचेच जीवंत उदाहरण मुंबईत पाहायला मिळाले. ताजमहाल पॅलेसच्या एका कर्मचाऱ्याचे त्याचा दयाळूपणा दाखवून दिला आणि सोशल मीडियावर त्याचा फोटो (Photo Viral on Social Media) देखील व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर हा फोटो वेगाने व्हायरल होत आहे. यामध्ये एक कर्मचारी पावसादरम्यान एका भटक्या कुत्र्यासह त्याची छत्री शेअर करत आहे. त्याने त्याच्या छत्रीत एका कुत्र्याला आसरा दिला आहे. कर्मचाऱ्याच्या या दयाळूपणा पाहून टाटा समुहाचे चेअरमन रतन टाटा (Ratan Tata Instagram) देखील प्रभावित झाले आहेत. त्यांनी लगेच सोशल मीडियाचा आधार घेत हा फोटो शेअर केला आहे.
हे वाचा-महिलेची कमाल! गच्चीवर गार्डनिंग करून बदललं स्वतःचं नशीब; आता कमावते लाखो रुपये
हा फोटो रतन टाटा यांनी इन्स्टाग्रामवर (Ratan Tata Shared Post on Instagram) शेअर केला आहे. त्यांनी हा फोटो पोस्ट करताना असं कॅप्शन दिलं आहे की, 'रस्त्यावरील कुत्र्यासह आराम शेअर करताना... हा ताजचा कर्मचारी दयाळू आहे, त्याने आपली छत्री रस्त्यावरील श्वानासह शेअर केली जेव्हा जोरदार पाऊस कोसळत होता. मुंबईच्या व्यस्त गर्दीत टिपलेला एक हृदयस्पर्शी क्षण. यासारखे भाव भटक्या प्राण्यांसाठी मोठा मार्ग निश्चित करतात.'
रतन टाटा यांनी शेअर केलेल्या या फोटोवर 1 मिलियनहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. दरम्यान या फोटोवर कमेंट्सचाही पाऊस पडला आहे. काही व्हेरिफाइड अकाउंटवरुन देखील या फोटोवर कमेंट्स आल्या आहेत. एकाने लिहिलं आहे की, 'या माणसाचं हृदय सोन्यासारखं आहे.' तर अशी रंजक गोष्ट शेअर करण्यासाठी टाटांचेही कौतुक अनेकांनी केले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.