मुंबई, 14 सप्टेंबर : उन्हाळ्यात फॅन आणि कूलरच्या तुलनेत खोलीत एसी (AC) असेल तर त्याचं सुख वेगळंच असतं. अगदी कुलरच्या समोर जरी बसलं, तरी एसीमध्ये जे समाधान, जो गारवा (Benefits of AC) मिळतो तो मिळत नाही. एसी असणाऱ्या रुममध्ये जाता क्षणी आपल्याला अगदी बरं वाटतं. अगदी भिंतीवर खूपवर जरी असला, तरी एसी संपूर्ण रुमला थंड (AC installed at top) करतो. पण कधी विचार केला आहे का की कुलरप्रमाणे एसीदेखील कमी उंचीवर लावला तर काय होईल?
रुममध्ये एसी फक्त वरच्या बाजूला लावण्यामागं शास्त्रीय कारण आहे. एसी खालच्या बाजूला किंवा कमी उंचीवर का लावत नाहीत हे जाणून घेण्यासाठी आधी आपल्याला एसी कसा काम करतो (How does AC work) ते पहावं लागेल. थंड हवा खाली जाणे आणि त्यामुळे गरम हवा वरती जाणे हे एक चक्र असतं. एसी सुरू असताना हे चक्र सतत सुरू असतं. या संपूर्ण प्रक्रियेला संवाहन म्हटलं जातं. यामुळेच रुममधील गरम हवा सतत बाहेर पडत राहते आणि रुम थंड (Why AC is installed at higher position) राहते.
हे वाचा - तुमच्या गाडीच्या Number Plate बाबतचं हे काम झालं का? नसेल तर वाढू शकतात अडचणी
उष्ण हवा ही थंड हवेपेक्षा हलकी (Hot air is lighter than cold air) असते. त्यामुळे एसीमधून जेव्हा थंड हवा बाहेर पडते, तेव्हा ती खोलीमध्ये एकसारखी न पसरता, जमिनीच्या दिशेने जाते. तर रुममध्ये आधीच असलेली गरम हवा वरच्या दिशेने (Hot air travels upwards) जाते. ही वर गेलेली गरम हवा एसीच्या माध्यमातून थंड करून बाहेर फेकली जाते आणि थोड्या वेळात संपूर्ण खोलीमध्ये केवळ थंड (How AC cools entire room) हवा राहते. थंड हवा जमिनीच्या आणि गरम हवा वरच्या दिशेला प्रवास करत असल्यामुळेच एसी रुममध्ये वरच्या बाजूला बसवतात.
हे वाचा - एका यंत्रणेमुळे मोफत मिळू शकते वीज; सरकारदेखील देतं अनुदान, जाणून घ्या सविस्तर
विशेष म्हणजे याच कारणामुळे हीटर हा रुममध्ये खालच्या बाजूला (Why Heater is installed at bottom) बसवलेला असतो. हीटरमुळे गरम झालेली हवा वरच्या दिशेने प्रवास (How does heater work) करते, आणि सगळी रुम गरम होऊन जाते. तसेच, रुममध्ये आधीपासून थंड असलेली हवा खालच्या दिशेने प्रवास करते; ज्यामुळे ती हीटरच्या संपर्कात येताच गरम होते.
जर एसी खाली लावाल तर काय होईल?
समजा तुम्ही एसी रुमच्या वरच्या भागात न लावता, खालच्या भागात लावला; तर केवळ जमीनीकडील भागच थंड होऊ शकेल. पण वरच्या बाजूला मात्र गरम हवा (Why we don’t fit AC at low height ) तशीच राहील. म्हणजे मग ज्या उद्देशाने एसी बसवत आहोत, तोच पूर्ण होणार नाही. त्यामुळेच एसी हा नेहमी रुमच्या वरच्या बाजूला लावला जातो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Lifestyle, Technology