मराठी बातम्या /बातम्या /explainer /Explainer: कोरोना काळात घरातील सोन्यावर कर्ज घेताय? वाचा काय आहे तज्ज्ञांचा सल्ला

Explainer: कोरोना काळात घरातील सोन्यावर कर्ज घेताय? वाचा काय आहे तज्ज्ञांचा सल्ला

आपल्या देशात सोन्याला भावनिक मूल्य अधिक आहे. त्यामुळे अगदीच कठीण प्रसंग आल्याशिवाय घरातलं सोनं विकलं जात नाही. पण कोरोना काळात आर्थिक चणचण भासत असताना तुमच्याकडे असलेलं सोनं गहाण ठेवावं किंवा विकावं का?

आपल्या देशात सोन्याला भावनिक मूल्य अधिक आहे. त्यामुळे अगदीच कठीण प्रसंग आल्याशिवाय घरातलं सोनं विकलं जात नाही. पण कोरोना काळात आर्थिक चणचण भासत असताना तुमच्याकडे असलेलं सोनं गहाण ठेवावं किंवा विकावं का?

आपल्या देशात सोन्याला भावनिक मूल्य अधिक आहे. त्यामुळे अगदीच कठीण प्रसंग आल्याशिवाय घरातलं सोनं विकलं जात नाही. पण कोरोना काळात आर्थिक चणचण भासत असताना तुमच्याकडे असलेलं सोनं गहाण ठेवावं किंवा विकावं का?

  नवी दिल्ली, 10 जुलै: गेल्या दीड वर्षात कोरोना विषाणूच्या साथीमुळे (Coronavirus Pandemic) जगभरातली अर्थव्यवस्था कोलमडली आहे. अनेक उद्योगधंदे बंद पडल्यानं किंवा त्यांची गती मंदावल्यामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. बेरोजगारी वाढली आहे. अनेक कुटुंबातली कर्ती माणसं कोरोनाने हिरावून नेल्याने अनेक कुटुंबांना रोजीरोटीचा प्रश्न सतावत आहे. विशेषत: मध्यम आणि निम्न उत्पन्न गटातल्या लोकांकडची साठवलेली पुंजी घरातल्या सदस्यांच्या अनपेक्षित आजारपणामुळे किंवा नोकरी गेल्यानं संपून गेली आहे. अशा परिस्थितीत अनेकांनी खर्च भागवण्यासाठी कर्ज घेण्याचा किंवा घरातलं सोने (Gold) विकण्याचा मार्ग पत्करला आहे.

  आपल्या देशात सोन्याला भावनिक मूल्य अधिक आहे. त्यामुळे अगदीच कठीण प्रसंग आल्याशिवाय घरातलं सोनं विकलं जात नाही. मुलांची लग्नं, शिक्षण आणि मोठं आजारपण अशा प्रसंगासाठी सोनं राखून ठेवलेलं असतं. अनेक लहान व्यावसायिक व्यवसायात थोडी गुंतवणूक करायची असेल, तर घरातल्या सोन्याचा उपयोग करतात. त्यामुळे सध्याच्या काळात लोकांनी सोनं तारण ठेवून कर्ज (Gold Loan) घेण्याचा मार्ग मोठ्या प्रमाणात स्वीकारलेला दिसत आहे. मे 2021 मध्ये संपलेल्या 12 महिन्यांच्या कालावधीत बँकांकडच्या गोल्ड लोन व्यवसायात सर्वाधिक म्हणजे 33.8 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. यावरूनच लोकांनी सोनं तारण ठेवून कर्ज घेण्याला प्राधान्य दिल्याचं स्पष्ट होतं. इंडियन एक्स्प्रेसने याबाबत वृत्त दिलं आहे.

  हे वाचा-तक्रार केल्यास प्रदर्शित झाल्यानंतरही चित्रपटाला लागू शकते कात्री,काय आहे कायदा?

  कोरोनाच्या साथीमुळे देशात गेल्या वर्षी लॉकडाउन (Lockdown) लागू करण्यात आला. राज्य सरकारही परिस्थितीनुरूप निर्बंध लादत आहे. यामध्ये छोट्या उद्योगांना फटका बसला आहे. विशेषत: ग्रामीण भागातले छोटे-मोठे व्यवसाय अडचणीत आले आहेत. मागणी कमी झाल्यानं रोख पैशांचा ओघ मंदावला आहे. त्यामुळे अनेक उद्योग, व्यवसायांमध्ये कामगारांचे पगार देण्यासाठी अडचण येत आहेत. त्यामुळे अनेकांनी सोने तारण कर्जाचा आधार घेतला आहे. परिणामी बँका (Bank) आणि बिगर बँकिंग कंपन्यांकडची (Non Banking Finance Companies- NBFC) सोने तारण कर्जाची मागणी वाढली आहे. त्यामुळे पूर्वी या प्रकारच्या कर्ज व्यवसायाकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारी बँकादेखील आता यावर भर देऊ लागल्या आहेत. देशातली सार्वजनिक क्षेत्रातली सर्वांत मोठी बँक असणाऱ्या स्टेट बँकेनं (State Bank of India-SBI) 2020-21 या आर्थिक वर्षामध्ये 20 हजार 987 कोटींची कर्जं देऊन सोने तारण कर्ज व्यवसायात तब्बल 465 टक्के वाढ नोंदवली आहे.

  बिगर बँकिंग कंपन्यांच्या गोल्ड लोन व्यवसायाचा आढावा घेतल्यास त्यातही चांगली वाढ झाल्याचं दिसून येतं. मणप्पुरम फायनान्सकडे (Mannapuram Finance) 31 मार्च 2021पर्यंत 25.9 लाख सोने कर्ज ग्राहक होते. त्यांचं सोने कर्ज वितरण गेल्या वर्षीच्या 1,68,909.23 कोटी रुपयांच्या तुलनेत यंदा 2,63,833.15 कोटींवर गेलं आहे. मुथूट फायनान्सच्या (Muthoot Finance) कर्जवितरणातही दर तिमाहीला किमान 4 टक्के वाढ झाल्याचं दिसत आहे. सोन्याचे दर 10 ते 12 टक्क्यांनी कमी होऊनही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही कर्जाची मागणी वाढलेली दिसत आहे.

  हे वाचा-खूशखबर! 12 जुलैपासून मिळेल स्वस्त सोनं, मोदी सरकार देत आहे खरेदीची संधी

  सोने तारण कर्ज व्यवसाय वाढण्याबरोबरच या क्षेत्रातल्या थकीत कर्जांचं प्रमाणही वाढलं आहे. गेल्या वर्षभरात बँकांकडील थकीत सोने कर्जात मोठी वाढ झाली असून, मे 2020 मधल्या 46 हजार 115 कोटी रुपयांवरून ते आता 62,101 कोटी रुपयांवर गेलं आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, मार्च 2020मध्ये कोविडचा प्रादुर्भाव वाढल्यापासून केवळ व्यावसायिक बँकांनी दिलेल्या सोने कर्जात तब्बल 86.4 टक्क्यांची म्हणजे 33,308 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. यात मुथूट फायनान्स आणि मणप्पुरम फायनान्ससारख्या बिगर बँकिंग कंपन्यांनी दिलेल्या सोने तारण कर्जाचा समावेश केल्यास ही वाढ आणखी जास्त असेल.

  ही कर्ज थकबाकी आणखी वाढण्याचा अंदाज जागतिक सुवर्ण परिषदेनं (World Gold Council) वर्तवला आहे. आर्थिक वर्ष 2021मध्ये ही थकबाकी 2020मधल्या 3,44,800 कोटींवरून 4,05,100 कोटींपर्यंत वाढण्याची अपेक्षा असल्याचं परिषदेनं म्हटलं आहे.

  सोनं कर्ज घ्यावं का?

  सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांनी (PSU Banks) सुवर्ण कर्जाच्या व्यवसायात मोठ्या प्रमाणात प्रवेश केल्यानं ग्राहकांना स्वस्त दरात कर्ज उपलब्ध होत आहे. बिगर बँकिंग कंपन्यांचा सोने तारण कर्जाचा दर 10 टक्के आहे, तर स्टेट बँक 7.5 टक्के दरानं कर्ज देत आहे. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला असला तरी स्वस्त दरात सोने तारण कर्ज मिळत आहे, म्हणून विनाकारण हे कर्ज घेऊ नये असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

  उत्पन्न घटलेलं असताना लग्नसमारंभासाठी (Marriage) किंवा चैनीच्या गोष्टींसाठी हे कर्ज घेणं योग्य नाही. कारण या कर्जाची परतफेड करू शकला नाहीत तर तुमचं गहाण ठेवलेलं सोनं कंपनी विकून टाकते. मणप्पुरम फायनान्सनं पहिल्या तीन तिमाहीमध्ये एकूण आठ कोटी रुपयांच्या सोन्याचा लिलाव (Auction) केला होता. मार्च 2021 रोजी संपलेल्या शेवटच्या तिमाहीत 404 कोटी रुपयांच्या सोन्याचा लिलाव कंपनीने केला. यावरून लोकांना कर्ज परतफेड करणं शक्य झालं नसल्याचं प्रमाण मोठं असल्याचं स्पष्ट होतं. आर्थिक परिस्थिती किती कठीण आहे, हेही यावरून लक्षात येतं. अशावेळी संभाव्य आर्थिक धोके लक्षात घेऊन असं कर्ज न घेणं सयुक्तिक ठरेल असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

  हे वाचा-घसघशीत कमाईची संधी! याठिकाणी पैसे गुंतवून मिळेल डबल रिटर्न

  एखाद्या छोट्या व्यावसायिकाला (Small Businessman) अल्प-काळासाठी भांडवलाची (Cash flow) गरज भागविण्यासाठी किंवा देणी वेळेत देण्यासाठी गरज असेल तर गोल्ड लोन घेणं योग्य आहे. त्यातही उत्पन्न कमी झालं असेल किंवा थांबलं असेल आणि कर्जाचा बोजा वाढला असेल, तर भावनिक न होता व्यावहारिक विचार करून सोनं विकण्याला प्राधान्य द्यावं, असा सल्ला प्लॅन हेड वेल्थ अ‍ॅडव्हायझर्सचे संस्थापक विशाल धवन यांनी दिला आहे. गेल्या 15 वर्षांत सोन्याच्या किमतीत चांगली वाढ झाली आहे. त्यामुळे कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी सोन्याची चांगली मदत होईल. परिस्थिती सुधारल्यावर सोनं पुन्हा विकत घेता येऊ शकतं, असंही धवन यांनी म्हटलं आहे.

  या साथीच्या काळात अनेक छोट्या-मोठ्या व्यवसायांची वाताहत झाली आहे. त्यामुळे व्यवसायाची परिस्थिती चांगली नसेल तर अशा वेळी कर्ज घेऊन बोजा वाढवणं धोकादायक आहे. अशा वेळी छोट्या व्यावसायिकांनी आयबीसीचं सहकार्य घेऊन नव्यानं सुरुवात करण्याचा विचार करावा, असा सल्ला कॉर्पोरेट सल्लागार श्रीनाथ श्रीधरन यांनी दिला आहे.

  First published:

  Tags: Explainer, Gold, Gold price