Cyclone Tauktae कोकणात येतंय! वादळांना नावं कशी दिली जातात? 'तौत्के'चा नेमका अर्थ काय?

Cyclone Tauktae कोकणात येतंय! वादळांना नावं कशी दिली जातात? 'तौत्के'चा नेमका अर्थ काय?

Cyclone Tauktae in Arabian Sea: दोन दिवसात या तौत्के वादळाचा परिणाम महाराष्ट्रात दिसेल. वादळांची ही चमत्कारिक नावं देण्याचा प्रघात तसा जुनाच आहे. म्हणजे गेल्या शतकभरापासून चक्रीवादळांना नावं दिली जातात

  • Share this:

मुंबई, 14 मे: सध्या अरबी समुद्रात 'तौत्के' नावाचं (Cyclone Tauktae in Arabian sea) चक्रीवादळ घोंघावत आहे. पुढच्या दोन दिवसात या वादळाचा परिणाम महाराष्ट्राच्या पश्चिम किनारवट्टीवर दिसेल. हवामान विभागाने याबाबत सावधानतेचा इशारा दिला आहे. पण तौत्के म्हणजे नेमकं काय? या वादळाचं नामकरण कोणी केलं?

खरंतर समुद्रात एखाद चक्रीवादळ निर्माण झालं की हवामान खात्याकडून त्याचं नामकरण केलं जातं. वादळांची ही चमत्कारिक नावं देण्याचा प्रघात तसा जुनाच आहे. म्हणजे गेल्या शतकभरापासून चक्रीवादळांना नावं दिली जातात. यातली गंमतीची बाब म्हणजे, वादळाचं बारसे करण्यासाठी काही आंतरराष्ट्रीय संकेत सुद्धा आहेत. वादळांचं बारसं करण्याची काही महत्त्वाची कारणं आहेत.

वादळ पुढं सरकत असताना देशादेशात माहितीची देवाणघेवाण होतं असते. माहितीची देवाणघेवाण करत असताना एकाच वादळाला जर विविध नावानं संबोधलं गेलं तर घोळ निर्माण होऊ शकतो. अफवांना देखील ऊत येऊ शकतो. त्यामुळे हे सर्व टाळण्यासाठी वादळ निर्माण होणार्‍या व त्याच्या प्रभावाखाली येणार्‍या भौगोलिक प्रदेशातील देश मिळून एखाद्या सांकेतिक नावाचा वापर करतात. त्याबद्दलही काही नियम आहेत.

विशेषतः ताशी 65 किमीपेक्षा अधिक वेगाच्या चक्रीवादळाचं नामकरण केलं जातं. वादळांना नाव देण्याची पाश्चिमात्य देशांकडून सुरुवात झाली. अमेरिकेकडून चक्रीवादळांना महिलांची नावं दिली जातात. प्रादेशिक वैशिष्ट्यांची नावं देण्याचाही विचार असतो. वादळांना नावं देताना कुणाच्या भावना न दुखवणार नाहीत, याचीही काळजी घेतली जाते.

हे ही वाचा-लशीच्या 2 डोसमधील अंतर वाढवण्याचा भारताचा निर्णय योग्य? काय म्हणाले डॉ. Fauci

एखाद्या वादळाचा परिणाम कित्येक देशांना भोगावा लागतो. तेव्हा हे वादळ एकाच देशाचं न राहता, वादळ निर्मितीस कारणीभूत असलेल्या महासागरीय प्रदेशांच्या झोननुसार याचं नाव ठरवणं आवश्यक असतं. प्रत्येक देशाचे महासागरानुसार काही झोन पाडण्यात आले. भारत हा नॉर्थ इंडियन ओशनिक झोनमध्ये येतो. त्यामुळे त्या-त्या झोनमधील देशानी नावं सुचवायची असतात. भारतानं 2004 सालात उत्तर हिंदी महासागरात येणार्‍या वादळांना नावं देण्याची परंपरा सुरु केली.

हे ही वाचा-Alert! अरबी समुद्रातील चक्रीवादळाचा मुंबईला बसणार फटका; मुसळधार पावसाची शक्यता

भारताच्या भौगोलिक अथवा सागरी क्षेत्रात निर्माण होणार्‍या चक्रीवादळांना नावं देताना भारतीय हवामान खातं भारतीय उपखंडातल्या इतर देशांच्या वेधशाळांशी संपर्क करतं. भारताच्या झोनमध्ये ओमान, पाकिस्तान, मालदीव, श्रीलंका, बांग्लादेश, म्यानमार, थायलँड हे देश आहेत. यांच्याशी संपर्क करून सर्वांच्या संमतीनं एखादं नाव निश्चित केलं जातं.

'तॉक्ते' नाव कोणी दिलं?

हे चक्रीवादळ 2021 वर्षातील पहिलं चक्रीवादळ असणार आहे. याचे नाव तॉक्ते (Tauktae) ठेवण्यात आलं आहे. या चक्रीवादळाचं नाव म्यानमारने ठरवले आहे. तॉक्ते याचा अर्थ मोठा आवाज करणारी पाल असा होतो. गुजरातबरोबरच गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र, केरळ आणि लक्षद्वीपला या वादळाचा फटका बसू शकतो.

Published by: News18 Desk
First published: May 14, 2021, 5:37 PM IST

ताज्या बातम्या