Home /News /coronavirus-latest-news /

Covishield च्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याचा भारताचा निर्णय योग्य? वाचा काय म्हणाले डॉ. Fauci

Covishield च्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याचा भारताचा निर्णय योग्य? वाचा काय म्हणाले डॉ. Fauci

अमेरिकेतील व्हाईट हाऊसचे मुख्य वैद्यकीय सल्लागार डॉ. अॅन्थनी फॉसी (Dr. Anthony Fauci) यांनी गुरुवारी सांगितले की कोव्हिशिल्डच्या (Covishield) दोन डोसमधील अंतर वाढवणे हा वाजवी किंवा योग्य दृष्टीकोन आहे.

वॉशिंग्टन, 14 मे: अमेरिकेतील व्हाईट हाऊसचे मुख्य वैद्यकीय सल्लागार डॉ. अॅन्थनी फॉसी (Dr. Anthony Fauci) यांनी गुरुवारी सांगितले की कोव्हिशिल्डच्या (Covishield) दोन डोसमधील अंतर वाढवणे हा वाजवी किंवा योग्य दृष्टीकोन आहे. नुकतंच केंद्र सरकारने जगभरातील कोविशील्डच्या लसीकरणाचा (Vaccination Drive in India) आढावा घेऊन दोन डोसमधील अंतर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर फॉसी यांच्या सल्लाने शिक्कामोर्तब झालं आहे. एएनआयला दिलेल्या विशेष मुलाखतीत डॉ. फॉसी बोलत होते. ते म्हणाले की जेव्हा तुम्ही भारताप्रमाणेच कठीण परिस्थितीचा (Coronavirus in India) सामना करीत असाल तेव्हा तुम्हाला जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण व्हावे, यासाठी विविध मार्ग शोधून काढावे लागतील. त्यामुळे अशा पध्दतीनं निर्णय घेणं ही वाजवी पध्दत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तुम्ही (भारत) अन्य देश आणि कंपन्यांच्या मदतीने लस उत्पादन क्षमतेचा विस्तार केला आहे. भारत हा मोठा लस उत्पादक देश नसला तरी तो सर्वोत्कृष्ट लसींची निर्मिती करीत आहे. आपण आपल्या लोकांसाठी काही संसाधनांचा वापरही केला असल्याचे डॉ. फॉसी म्हणाले. कोरोना प्रतिबंधक कोविशिल्ड लशीच्या पहिल्या आणि दुसऱ्या डोसमधील अंतर सध्या 6 ते 8 आठवड्यांचे आहे. परंतु हे अंतर आता 12 ते 16 आठवडे वाढवण्यात आले आहे, अशी घोषणा भारत सरकारने नुकतीच केली आहे. कोविशिल्ड लसीच्या डोसमधील अंतर 3 महिन्यात दुसऱ्यांदा वाढवण्यात आले आहे. तथापि, लशीचे पुरेसे डोस उपलब्ध होत नसल्याने सरकारच्या या निर्णयावर पुन्हा एकदा टीकेची झोड उठवण्यात आली आहे. हे वाचा-ऑक्सिजनची फार लागत नाही गरज; कोरोना रुग्णांवर नेमकं कसं काम करतं 2 DG औषध? लशीच्या दोन डोसमधील अंतर वाढवणे हे लाभदायक असल्याचे सांगत डॉ. फॉसी म्हणाले, की जेव्हा आपल्याकडे पुरेशी लस उपलब्ध नसते तेव्हा लोकांना किमान 1 डोस मिळावा यासाठी पहिल्या आणि दुसऱ्या डोस दरम्यानचा कालावधी वाढवणे हा एक योग्य दृष्टीकोन म्हणता येईल. अन्यथा लशीच्या दीर्घकालीन परिणामांवर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. लशीच्या दोन डोस मधील अंतर वाढवल्यानं लसीच्या कार्यक्षमतेवर त्याचा विपरित परिणाम होण्याची शक्यता फारच कमी आहे. जेव्हा आपल्याकडे पुरेशी लस उपलब्ध नसते, तेव्हा असे निर्णय घेण्यात काही चुकीचे आहे, असे मला वाटत नाही. रशियाच्या स्पुतनिक व्हीचं (Sputnik V) लसीकरण देशात सुरू करण्यात आलं असून पहिला डोस शुक्रवारी हैद्राबाद येथे देण्यात आला. भारतात स्पुतनिकची आयात करणाऱ्या डॉ. रेड्डींज लेबोरेटरीने याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, 1 मे रोजी भारतात दाखल झालेल्या स्पुतनिक व्हीच्या लशीच्या आयातीतील पहिल्या डोसला 13 मे रोजी हिमाचल प्रदेशच्या कसौली येथील केंद्रीय औषध प्रयोगशाळेकडून नियामक मंजुरी मिळाली आहे. यामुळे 18 वर्षांवरील लोकांचे लसीकरण करण्यासाठी आणि मेगा लसीकरण मोहिमेला अधिक चालना देण्यासाठी भारताकडे आता 3 लस उपलब्ध आहेत. हे वाचा-Sputnik भारतात नवी लस उपलब्ध; कुणाला मिळाला पहिला डोस, किंमत किती, जाणून घ्या स्फुटनिक व्ही ही कोरोनाप्रतिबंधक लस कितपत प्रभावी आहे,असे विचारले असता डॉ. फॉसी म्हणाले की मी स्फुटनिक व्ही लसीबाबत ऐकले आहे. ही लस 90 टक्क्यांहून अधिक प्रभावी असल्याचे समजते. गेल्यावर्षी जेव्हा अमेरिका कोरोनाविरुध्द लढाई लढत होता, तेव्हा संरक्षण विभागाने न्यूयॉर्क आणि लॉस एंजेलिस च्या समुद्रकिनाऱ्यावरील नौदलाच्या 2 युध्दनौका युएसएनएस मर्सी आणि युएसएनएस कम्फर्ट यांची या लढ्यासाठी मदत घेतली होती. त्यामुळे अचानक घडणाऱ्या घटनांच्या विरोधात लढा देण्यासाठी भारताने या कामामध्ये सशस्त्र दलाचा (Armed Forces) सहभाग वाढवणं गरजेचं आहे,असं डॉ. फॉसी यांनी स्पष्ट केले. ज्या गोष्टींची पुर्तता खासगी क्षेत्रातून पुर्णपणे होऊ शकत नाही,अशा गोष्टींची तरतूद तातडीने होण्यासाठी तुम्ही लष्कराची मदत घेऊ शकता. उदाहरणार्थ, मला माहित आहे की सध्या रुग्णालयांमध्ये बेडसची कमतरता मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. बेडच्या कमतरतेमुळे रुग्णांना रुग्णालयात दाखल करुन घेतले जात नाहीये. या पार्श्वभूमीवर सैन्याच्या मदतीने फिल्ड हॉस्पिटल्स उभारण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. युध्दाच्या वेळी देखील हॉस्पिटल्स उपयुक्त ठरु शकतात, असे डॉ. फॉसी यांनी एएनआयशी बोलताना सांगितले. हे वाचा-Pune : भारत बायोटेकला जमीन देण्याची प्रक्रिया सुरू, अजित पवारांची माहिती विषाणूजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर भारतातील प्रवास पुन्हा सुरू करण्याबाबत प्रतिक्रिया देताना डॉ. फॉसी म्हणाले, की हे आताच्या संसर्ग पातळीवरच अवलंबून आहे. सध्या भारतात संसर्गाचा स्तर सर्वोच्च पातळीवर आहे. त्यामुळे सध्या अशा प्रकारचा प्रवास थांबवणेच उचित आहे. जगभरातील बऱ्याच लोकांचे लसीकरण झालेले असताना आणि समर ट्रॅव्हल्स सिझन तोंडावर असताना जगभरातील अनेक देश त्या ठिकाणी डिजिटल हेल्थ सर्टीफिकेशन प्रोग्राम किंवा व्हॅक्सीन पासपोर्ट (Vaccine Passport)तयार करण्यासाठी चाचपणी करीत आहेत,असे डॉ. फॉसी यांनी सांगितले.
First published:

Tags: Corona, Corona vaccination, Corona vaccine, Coronavirus

पुढील बातम्या