मराठी बातम्या /बातम्या /मनी /EPFO: Provident Fund खातेधारकांना मिळतात हे 5 मोठे फायदे, पाहा कसा होईल फायदा

EPFO: Provident Fund खातेधारकांना मिळतात हे 5 मोठे फायदे, पाहा कसा होईल फायदा

नोकरीच्या अगदी सुरुवातीपासून छोटी-छोटी दर महिना कट होणारी रक्कम सरकारी सहयोगाने रिटायरमेंटपर्यंत एक मोठी रक्कम तयार होते. पण पीएफ अकाउंटचे इतरही अनेक फायदे आहेत.

नवी दिल्ली, 7 जून : भारत सरकार 1952 पासून देशातील सर्व कर्मचारी वर्गाचं भविष्य सुरक्षित ठेवण्याच्या उद्देशाने प्रोविडेंट फंडची सुविधा देत आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO) देशात काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना पीएफची (PF) सुविधा देतं. त्यासाठी कर्मचाऱ्यांच्या सॅलरीमधून एक छोटा भाग PF खात्यात जमा करण्यासाठी केला जातो.

नोकरीच्या अगदी सुरुवातीपासून छोटी-छोटी दर महिना कट होणारी रक्कम सरकारी सहयोगाने रिटायरमेंटपर्यंत एक मोठी रक्कम तयार होते. पण पीएफ अकाउंटचे इतरही अनेक फायदे आहेत.

फ्री इन्शोरन्स -

कर्मचाऱ्यांचं जसं पीएफ अकाउंट ओपन होतं, तसं तो आपोआप इन्श्योर्डही होतो. एम्प्लॉई डिपॉझिट लिंक्ड इन्शोरन्स अंतर्गत त्या कर्मचाऱ्याचा 7 लाख रुपयांपर्यंतचा विमा होतो. ईपीएफओच्या सक्रिय सदस्याचा सर्विस कालावधीत मृत्यू झाल्यास, त्याच्या नॉमिनीला 7 लाख रुपयांपर्यंत पैसे दिले जातात.

रिटायरमेंटनंतर पेन्शन -

PF अकाउंटमध्ये जमा कॉन्ट्रिब्यूशनमधून 8.33 टक्के कर्मचारी पेन्शन स्किममध्ये जातात. जे रिटायरमेंटनंतर पेन्शन रुपात मिळतात. पेन्शन कोणत्याही महिला किंवा पुरूष कर्मचाऱ्याच्या वृद्धापकाळातील मोठा आधार ठरतो. त्यासाठी सरकारकडूनही अनेक स्किम राबवल्या जातात.

(वाचा - सरकारच्या या नियमामुळे तुमच्या पगारावर होणार परिणाम;इन हँड सॅलरी कमी होणार पण...)

टॅक्स सूट -

टॅक्समध्ये सूट हवी असल्यास, पीएफ सर्वात चांगला पर्याय आहे. परंतु आता नव्या टॅक्स सिस्टममध्ये अशी सुविधा नाही, जुन्या टॅक्स सिस्टममध्ये टॅक्सवर सूट मिळते. EPF खातेधारक इनकम टॅक्स कलम 80 C अंतर्गत सॅलरीवर 12 टक्क्यांपर्यंत कर वाचवू शकतात.

गरज पडल्यास रक्कम काढता येते -

पीएफ फंडची चांगली सुविधा म्हणजे, हे पैसे गरज पडल्यास, काढता येऊ शकतात. यामुळे कर्ज घेण्यापासून तुम्ही वाचू शकता. कोरोनाच्या कठीण काळात देशातील लाखो लोकांनी या सुविधेअंतर्गत आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्या पीएफमधील जमा रक्कम काढली आहे.

(वाचा - पंतप्रधान गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून नोव्हेंबरपर्यंत मोफत धान्य मिळणार- PM)

निष्क्रिय खात्यावर व्याज -

कर्मचाऱ्यांच्या निष्क्रिय पीएफ खात्यावरही व्याज दिलं जातं. 2016 मध्ये कायद्यात केलेल्या बदलानुसार, आता पीएफ खातेधारकांना त्यांच्या तीन वर्षाहून अधिक काळ निष्क्रिय असलेल्या पीएफ खात्यातील जमा रकमेवर व्याज दिलं जातं. यापूर्वी तीन वर्षापर्यंत निष्क्रिय असलेल्या खात्यावर व्याज देण्याची कोणतीही तरतूद नव्हती.

First published:

Tags: Epfo news, PF Amount, PF Withdrawal