Home /News /explainer /

आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी लागतोय का Vaccine Passport? काय आहे प्रकार, जाणून घ्या

आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी लागतोय का Vaccine Passport? काय आहे प्रकार, जाणून घ्या

Coronavirus ने जगण्याचे सारे नियम आणि प्रवासाच्या अटीच बदलल्या आहेत. 2021 मध्ये आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी व्हॅक्सिन पासपोर्ट (Vaccine Passport) हा महत्वाचा दस्तावेज ठरू शकतो. काय आहे हे प्रकरण?

नवी दिल्ली, 10 मार्च: Covid-19 च्या जागतिक साथीमुळे केवळ कामांमध्येच नाही तर प्रवासातही कायमस्वरुपी आणि महत्त्वपूर्ण बदल पाहायला मिळतील. यातील पहिला बदल म्हणजे यापुढे व्हॅक्सि पासपोर्टची अट घातली जाऊ शकते. लस पासपोर्ट किंवा व्हॅक्सिन पासपोर्ट (Vaccine Passport) म्हणजे नेमकं काय? 2021 मध्ये प्रवासासाठी व्हॅक्सिन पासपोर्ट हा महत्वाचा दस्तावेज ठरू शकतो. फ्लाइटस आणि पर्यटन आता हळूहळू सुरू होत असताना कोरोनाचा धोका टाळून कोणाला प्रवेश द्यायचा याची खात्री आता संबंधित देशांना करता येईल. त्यासाठी विविध अधिकृत लसीकरण आणि प्रवासाची परवानगी ही गरज बनली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक पर्यटन संघटनेचे (United Nations World Tourism Organisation (UNWTO)) सरचिटणीस झुरब पोलोलिकाश्विली (Zurab Pololikashvili) म्हणाले, की आंतरराष्ट्रीय प्रवास (International Travel) सुरक्षितपणे पुन्हा सुरू करण्यासाठी व्यापक उपाययोजनांचा एक भाग म्हणून व्हॅक्सिनेशन पासपोर्टचा जागतिक स्तरावर अवलंब केला जातोय. नुकत्याच झालेल्या यूएनडब्ल्युटीओच्या बैठकीत आंतरराष्ट्रीय आरोग्य आणि ट्रॅव्हल संस्थांना प्रमाणित डिजीटल प्रमाणपत्र प्रणाली आणि सामंजस्यपूर्ण चाचणी प्रोटोकॉलचे समन्वय वाढवण्यास सांगण्यात आले आहे. व्हॅक्सिन पासपोर्ट म्हणजे काय? हा यलो कार्ड (Yellow Card) प्रमाणे असतो. यलो फिव्हर (Yellow Fever) प्रतिबंधक लसीकरणासाठी यलो कार्ड हा मुख्य पुरावा असतो. अनेक आफ्रिकन देशांमधून अमेरिका किंवा भारतात प्रवास करणाऱ्या प्रवासी, पर्यटकांनी तो सादर करणं आवश्यक असतं. कोरोना प्रतिबंधक लस संबंधित व्यक्तीला दिली गेली आहे, असे सिध्द करणारा व्हॅक्सिन पासपोर्ट हा डिजीटल दस्तावेज (Digital Document) असतो. हा देशभरातील लसीकरणाच्या नोंदी डिजीटल करण्यासाठी देखील मदत करतो. तुमच्याकडे यापूर्वीच यासारखे डिजीटल डॉक्युमेंट आहे का? अनेक ना नफा ना तोटा यातत्वावरील तंत्रज्ञान कंपन्या सुरक्षित आणि व्हेरिफाईड पासपोर्ट तयार करण्याच्या दिशेने काम करीत आहेत. यातील काही कंपन्या अशा : कॉमनपास: वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आणि सार्वजनिक तसेच खासगी भागीदारांची एक विस्तृत साखळी कॉमनपास (Common Pass) सुरु करण्यासाठी सहकार्य करीत आहे. हा जागतिक प्लॅटफार्म असेल. एखाद्या देशात प्रवेशासाठी आवश्यक कोरोना तपासणी कागदपत्रांची पुर्तता करणे आणि लोकांच्या आरोग्य डाटा प्रायव्हसीचे संरक्षण करण्याचे काम या प्लॅटफार्मच्या माध्यमातून केले जाईल. वाचा -  'विमानात विनामास्क आल्यास थेट खाली उतरवा'; उच्च न्यायालयाची सूचना आयएटीए ट्रॅव्हल पास (IATA Travel Pass) : जागतिक आरोग्य संघटना अधिक सुरक्षित व्हॅक्सिन पाससाठी अशी डिजीटल मानके विकसित करीत असून त्या कोणाताही बदल करता येणार नाही परंतु नवीन जागतिक मानके त्यात समाविष्ट होतील. हे एक मोबाईल अप्लिकेशन असेल. यात प्रवाशांना डिजीटल पासपोर्ट तयार करता येईल, कोरोना चाचणी आणि लसीकरण (Corona test and vaccination) प्रमाणपत्र मिळवता येईल, तसेच प्रवासासाठी आपण सक्षम आहोत हे दर्शवेल. AOK पास : द आयसीसी एओके पास (AoK Pass) हा वैद्यकीय नोंदीची डिजीटल प्रमाणीकृत, सुरक्षित आणि पोर्टेबल प्रत पुरवतो. यातील वैद्यकीय नोंदी या केवळ संबंधित व्यक्तीच्या डिव्हाईसवर स्टोअर केल्या जातात. त्या अन्य कोठेही शेअर केल्या जात नाहीत. त्यामुळे याची निर्मिती विकेंद्रीकरणासाठी केली आहे, असे म्हणता येईल. कोणत्या देशांनी व्हॅक्सिन पासपोर्ट सुरु केलाय? आईसलॅंण्ड (Iceland) : लसीकरण प्रमाणपत्र देणारे नॉर्डिक राज्यं हे पहिले देश ठरले आहेत. या देशांमधील ज्या नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत ते हे प्रमाणपत्र मिळवण्यास पात्र ठरत आहेत. विमान उडताच महिलेने केले असे विचित्र चाळे की, अखेर सीटला ठेवलं बांधून! डेन्मार्क (Denmark) : ज्या देशांमध्ये प्रवेश करण्यापूर्वी लसीकरण बंधनकारक आहे, अशा देशांमध्ये डॅनिश नागरिकांना जाता यावे, यासाठी डेन्मार्कमधील आरोग्य मंत्रालय व्हॅक्सिन पासपोर्टवर काम करीत आहे. इस्त्राईल (Israel) : इस्त्राईल आरोग्य मंत्रालयाने नुकतेच ग्रीन पासपोर्टचे अनावरण केले आहे. हा पासपोर्ट मिळालेले नागरिक प्रवास करु शकतात तसेच मोठ्या संमेलनात भाग घेऊ शकतात, हा पासपोर्ट डिजीटल आणि भौतिक स्वरुपात उपलब्ध आहे. (हे वाचा:  Covid19: कोरोनासाठी तज्ञांची 7 कलमी रणनीती; हॉटस्पॉटमध्ये केल्या जाणार चाचण्या) हंगेरी (Hungery) : हा पूर्व युरोपीय देश इम्युनिटी पासपोर्ट तयार करण्याचे काम करीत आहे. या प्रवाशाला कधीही कोरोना संसर्ग झालेला नाही किंवा त्याच्या शरीरात अँटीबॉडीज नाही, हे पासपोर्टवरून सिद्ध होणार आहे. ग्रीस (Greece) : ब्लॉकमधील (Bloc) प्रवास सुलभ व्हावा, यासाठी लसीचे प्रमाणपत्र द्यावे, असे आवाहन ग्रीसचे पंतप्रधान किरियाकोस मित्सोटाकीस यांनी युरोपियन युनियनला केलं आहे. डिजिटल ट्रॅव्हल पासचे नेमके फायदे काय? याचा प्राथमिक फायदा पर्यटन आणि हॉस्पिटॅलिटी उद्योगाला होईल. तसेच यामध्ये आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासाचा समावेश होतो. महासाथीमुळे या सर्वच उद्योगाला मोठा फटका सहन करावा लागला आहे.
First published:

Tags: Corona vaccine, Coronavirus

पुढील बातम्या