Home /News /lifestyle /

विमान उडताच महिलेने केले असे विचित्र चाळे की, अखेर सीटला ठेवलं बांधून!

विमान उडताच महिलेने केले असे विचित्र चाळे की, अखेर सीटला ठेवलं बांधून!

विमानानं (Russian Flight) उड्डाण केल्यानंतर थोड्या वेळात एका 39 वर्षीय महिला प्रवाशाने असं काही केलं की, तिला दोरी आणि टेपने बांधूनच प्रवास पूर्ण करावा लागला. वाचा काय झाला प्रकार...

मॉस्को, 10 मार्च: विमान प्रवासाची भीती (Flying phobia) वाटणारे अनेक लोक असतात. पहिल्यांदा प्रवास करणाऱ्या अनेक लोकांनाही भीती (Air sickness) वाटत असते. अशा वेळी विमानातील हवाई सुंदऱ्या, कर्मचारी धीर देत असतात. सहप्रवासीही मदत करतात. काही वेळा मात्र काही प्रवाशांचं विचित्र वर्तन सगळयांनाच हादरवून टाकतं. विमानात अनेकदा गोंधळ घालणारे प्रवासीही असतात. त्यांच्यामुळे सगळ्यांनाच त्रास होतो. अशा वेळी विमान कर्मचाऱ्यांची चांगलीच कसोटी लागते. असाच एक धक्कादायक अनुभव एका रशियन विमानातील कर्मचारी आणि प्रवासी यांनी घेतला. या रशियन विमानानं (Russian Flight) उड्डाण केल्यानंतर थोड्या वेळात एका महिलेनं (Female Passenger starts taking off clothes) आपले कपडे उतरवायला सुरुवात केली. त्यामुळे विमानात एकच गोंधळ उडाला. काही केल्या ही महिला ऐकत नसल्यानं अखेर तिला तिच्या सीटला बांधून ठेवावं लागलं. व्लादिवोस्तोकहून या विमानानं उड्डाण केल्यानंतर 15 मिनिटांतच एक 39 वर्षीय महिला आपल्या आसनावरून उठली आणि केबिनभोवती फिरू लागली. त्यानंतर, तिनं आपले कपडे काढण्यास आणि घालण्यास सुरूवात केली. तिचं हे विचित्र वागणं (Erratic Behavior) बघून केबिन क्रूनं तिला समजावण्याचा प्रयत्न केला. त्यांनी वारंवार सांगूनही ती काहीही ऐकायला तयार नव्हती. अंमली पदार्थ (Synthetic Drugs) घेतल्यानं ती नशेत होती. त्यामुळं काहीही समजण्याची तिची मनस्थिती नव्हती. हे बघून तिची आणि सर्वांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून विमान कर्मचारी आणि अन्य प्रवाशांनी तिला सीटवर बांधून ठेवण्याचा निर्णय घेतला. दोरी, सीट बेल्ट आणि चिकट टेपचा वापर करून या महिलेला तिच्या सीटवर जखडून ठेवण्यात आलं.

  हे वाचा -    धक्कादायक! प्रश्नांच्या भडिमाराने चिडून थायलंडच्या पंतप्रधानांनी केली पत्रकारांवर सॅनिटायझरची फवारणी

हे विमान सायबेरियातील(Siberia)नोव्होसिबिरस्क इथल्या टोलमाचेव्हो विमानतळाकडं जात होतं. तिथं हे विमान सुरक्षितपणे पोहोचल्यानंतर या महिलेला विमानातून बाहेर आणण्यात आलं त्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली. विमानात गोंधळ घालणाऱ्या या महिलेला सीटवर बांधून ठेवलं होतं त्याचा व्हिडिओ डेली मेलनं (Daily Mail) शेअर केला आहे. डेली मेलनं दिलेल्या वृत्तानुसार, पोलिस स्टेशनमध्ये नेल्यानंतर या महिलेनं व्लादिवोस्तोक इथं विमानात चढण्यापूर्वी ड्रग्ज घेतल्याची कबुली दिली. रशियाच्या अंतर्गत मंत्रालयानं (Russian Internal Ministry) दिलेल्या माहितीनुसार, या महिलेनं किती प्रमाणात नशेच्या पदार्थांचे सेवन केलं आहे हे समजण्यासाठी तिची वैद्यकीय तपासणीसाठी करण्यात आली. पोलिस स्टेशनमध्ये तिची हँडबॅग रिकामी असल्याचं दिसून आलं. डेली मेलच्या वृत्तानुसार, या महिलेवर किरकोळ गुंडगिरीचे गुन्हे दाखल असल्याचं मंत्रालयानं म्हटलं असून, पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला आहे.
First published:

Tags: Drugs, Russia, Travel by flight

पुढील बातम्या