मराठी बातम्या /बातम्या /explainer /

Explainer: संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांची काळजी कशी घ्यावी? जाणून घ्या सर्व प्रश्नांची उत्तरे

Explainer: संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांची काळजी कशी घ्यावी? जाणून घ्या सर्व प्रश्नांची उत्तरे

राष्ट्रीय वेळापत्रकानुसार सर्व लसी वेळेत घेणं गरजेचं आहे. कारण या लसी (Vaccine) तुमच्या मुलांचे संसर्गापासून संरक्षण करतात.

राष्ट्रीय वेळापत्रकानुसार सर्व लसी वेळेत घेणं गरजेचं आहे. कारण या लसी (Vaccine) तुमच्या मुलांचे संसर्गापासून संरक्षण करतात.

राष्ट्रीय वेळापत्रकानुसार सर्व लसी वेळेत घेणं गरजेचं आहे. कारण या लसी (Vaccine) तुमच्या मुलांचे संसर्गापासून संरक्षण करतात.

नवी दिल्ली, 27 मे : कोरोना (Corona) संसर्गापासून मुलांचे संरक्षण करण्याची जबाबदारी कुटुंबातील मोठया व्यक्तींची आहे. कारण ते मुलांसाठी संसर्गाचे वाहक असू शकतात. कोरोनाची तिसरी लाट (Third Wave) मुलांसाठी घातक ठरेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यात पुन्हा काळ्या बुरशीचे (Black Fungus) संकट देखील आहे. याअनुषंगाने मुलांची काळजी कशी घ्यायची, काय उपाययोजना करायच्या याबाबत डॉ. समीर हसन दलवाई, एएमपी आणि डॉ. गिरीश कुलकर्णी यांच्याशी साधलेला हा संवाद...

प्रश्न - जोपर्यंत लहान मुले लसीकरणाच्या निकषांत येत नाहीत, तोपर्यंत त्यांची काळजी कशी घ्यावी?

उत्तर – आम्ही मुलांवर घेतल्या गेलेल्या क्लिनिकल ट्रायल्सच्या (Clinical Trials) निकालाची प्रतिक्षा करीत आहोत. ही सर्व प्रक्रिया द्रुतगतीने राबवली गेली असून निकाल आणि शिफारशी लवकरच जाहीर होतील अशी अपेक्षा आहे. या दरम्यान, कुटुंबातील मोठ्या व्यक्तींवर मुलांची कोरोना संसर्गापासून बचाव करण्याची जबाबदारी आहे. कारण या मोठ्या व्यक्ती संसर्ग वाहक असू शकतात. दुसरे असे की जर मूल 2 वर्षांपेक्षा अधिक वयाचे असेल तर ती मास्क वापरु शकतात. मात्र मुलांनी एकत्र येऊन खेळणं टाळावं. मुलांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहावी, यासाठी त्यांना पोषक आहार द्यावा.

प्रश्न – कोरोनाची अशी कोणती सुरुवातीची लक्षणे आहेत की ज्याकडे पालकांनी लक्ष ठेवावे? तसेच त्यांनी कोणत्या कालावधीत अधिक लक्ष द्यावे?

उत्तर – बहुतेक मुलांमध्ये सौम्य ताप, खोकला, सर्दी, उलट्या-जुलाब होणं, चिडचिडेपणा, घशात वेदना, अंगदुखी आणि थकवा अशी लक्षणे दिसून येतात. ही लक्षणे सामान्यतः हंगामी फ्लूची आहेत. फॅमिली फिजिशियन किंवा बालरोगतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अशी लक्षणे असणाऱ्या मुलांना पॅरासिटामोल किंवा अन्य साधी औषधी दिली जातात. यात आम्ही अशी शिफारस करतो की पालकांनी घरात एक लक्षणांबाबतचा चार्ट (Chart) मेन्टेन करावा आणि डॉक्टरांसोबत शेअर करावा. मी वैयक्तिक शिफारस करतो की पालकांनी मुलांसाठी एक ते दोन दिवस वेळ काढून त्यांचे घरीच सातत्याने निरीक्षण करावे. मुलांच्या प्रकृतीत काही बिघाड झाल्यास त्यांना तातडीने रुग्णालयात हलवावे. दिर्घकाळ आणि प्रमाणापेक्षा जास्त ताप, श्वास घेण्यास त्रास होणे, जेवण न जाणे, उलट्या-जुलाब होणे, डिहायड्रेशन, ओटीपोटात तीव्र स्वरुपाच्या वेदना, डोकेदुखी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मुलाच्या वागण्यात कोणताही महत्वपूर्ण बदल होणे, डोळे लाल होणे आणि सुजणे, ओठ सुजणे आणि शरीरावर पुरळ उठणे ही लक्षणे धोक्याची घंटा असू शकतात. या स्थितीत बालरोगतज्ज्ञ किंवा तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.

Corona Third Wave : खरंच कोरोनाची तिसरी लाट येणार का? काय आहे तिचा धोका?

प्रश्न – ब्लॅक फंगस म्हणजे काय? या फंगसचा संसर्ग लहान मुलांना होऊ शकतो का?

उत्तर – ब्लॅक फंगर म्हणजेच म्युकरमायकोसिस (Mucormycosis) हा एक दुर्मिळ बुरशीजन्य आजार आहे. सामान्य रोगप्रतिकार शक्ती असलेल्या सुदृढ व्यक्तीला सहसा या बुरशीचा संसर्ग होत नाही. याचा धोका रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या व्यक्तींना जास्त असतो, म्हणूनच याला संधीसाधू सुक्ष्मजीव असंही म्हणतात. प्रौढांच्या तुलनेत कोरोनाग्रस्त लहान मुलांना याचा संसर्ग होणे हे अत्यंत दुर्मिळ आहे. मधुमेहासारख्या कोमॉर्बिडीटीमुळे (Co-Morbidity) तसेच स्टेरॉईडचा अतिवापर केल्यानं कोरोनाग्रस्त प्रौढ व्यक्तींमध्ये रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम झालेला असतो. असा प्रकार घडू नये, यासाठी आपल्याला आयसीयूमधील मुलांची अधिक काळजी घ्यावी लागेल.

प्रश्न – कोरोना विषाणू हवेमार्फत पसरत असल्याने लहान मुलांना घराबाहेर जाऊ देऊ नये का?

उत्तर – नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार, हवेतील ड्रॉपलेट्स 10 मिटरपर्यंत संसर्ग पसरु शकतात. त्यामुळे मुलांना मैदानावर खेळण्यासाठी जाऊ न देणं अधिक चांगलं आहे. मुलांनी घराबाहेर पडणं टाळलच पाहिजे तसेच मास्क वापरणं अत्यावश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणी तसेच ज्या व्यक्ती त्यांच्या कुटुंबातील नाहीत अशा व्यक्तींमध्ये मिसळताना 2 वर्ष किंवा त्यावरील वयाच्या मुलांनी मास्क वापरणं अनिवार्य आहे. मास्कचा वापर हा सोशल डिस्टन्सिंगला पर्याय ठरु शकत नाही. त्यामुळे कुटुंबाबाहेरील व्यक्तींमध्ये गेल्यास 6 फुटांपेक्षा जास्त अंतर मेन्टेंन करावे. मास्कने नाक व तोंड कसे पूर्णपणे झाकून घ्यावे, कुठेही अंतर ठेवू नये आदी बाबींचे प्रात्यक्षिक पालकांनी मुलांना दाखवावे. एखाद्या कुटुंबातील व्यक्ती आजारी असल्यास, कोरोनाची लक्षणे दिसत असल्यास किंवा कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह असल्यास अशा कुटुंबातील लहान मुलांनी मास्क वापरणं अनिवार्य आहे. किमान 20 सेकंद साबणाने आणि पाण्याने हात धुण्याचे तसेच मास्कला स्पर्श केल्यानंतर किंवा तो काढल्यानंतर 60 टक्के अल्कहोल असलेल्या सॅनिटायझरने हात कसे स्वच्छ करावेत याचे प्रशिक्षण लहान मुलांना देणं आवश्यक आहे.

प्रश्न – मुलांसाठी लसीकरण केव्हा सुरु होईल? त्यांना देखील 2 डोस घ्यावे लागतील का?

उत्तर – 12 वर्षांवरील मुलांसाठी सप्टेंबर 2021 पासून लसीकरण (Vaccination) सुरु होण्याची शक्यता आहे. त्यानंतर 12 वर्षांखालील मुलांच्या लसीकरणासाठी अजून 6 ते 8 महिने लागू शकतात. मुलांनीही 2 डोस घेणं गरजेचं आहे. नसल व्हॅक्सिनच्या (Nasal Vaccine) चाचण्या सुरु आहेत. या लसीमुळे श्वसनमार्गामध्ये स्थानिक रोगप्रतिकारक शक्ती वाढेल तसेच मानवी शरीरात विषाणू ज्या मार्गे प्रवेश करतो, त्याठिकाणीच त्याला थोपवणं शक्य होईल.

ब्लॅक फंगस रोगावरील उपचार खर्च कमी करण्याची मागणी, काय आहे ट्रीटमेंट?

प्रश्न – तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक परिणाम मुलांवर होईल, अशी चर्चा आहे. असं का?

उत्तर – लहान मुलांना धोकादायक ठरु शकतील असे कोरोना विषाणूने आपल्या पॅथॉलॉजीमध्ये काही बदल केले आहेत, याचे सध्या तरी पुरावे नाहीत. पहिल्या लाटेचा फटका ज्येष्ठ नागरिकांना तर दुसऱ्या लाटेचा फटका युवकांना बसला. मात्र आता या गटांतील बऱ्याच जणांमध्ये प्रतिकारकशक्ती विकसित झाली आहे. या गटांना लसीकरणामुळे देखील फायदा झाला आहे. ही स्थिती पाहता अद्याप 18 वर्षांखालील गट संसर्गापासून दूर असला तरी तो असुरक्षित देखील आहे. हा गट देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी सुमारे 40 टक्के आहे. त्यामुळे जर तिसरी लाट आली तर ती या गटामध्ये किंवा मुलांमध्ये पसरण्याची शक्यता आहे.

प्रश्न – जर एखादे मूल कोरोनाबाधित होऊन कोरोनामुक्त झाले असेल तर त्याची रोगप्रतिकारक शक्ती किती काळ टिकू शकते?

उत्तर – कोरोना संसर्गा नंतर रोगप्रतिकारक शक्ती 6 महिन्यांपासून अगदी दशकांपर्यंत टिकू शकते. त्यामुळे संरक्षणाचा नेमका कालावधी सांगता येत नाही.

प्रश्न- कोणते अन्नपदार्थ मुलांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर ठरु शकतात?

उत्तर – संतुलित, पौष्टीक, प्रथिनेयुक्त, लोहयुक्त मल्टी व्हिटॅमिन आणि इतर सुक्ष्म पोषक घटकयुक्त आहार रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतो. चांगली झोप, संतुलित जीवनशैली आणि फिजीकल अ‍ॅक्टिव्हीटी हे घटक प्रतिकारशक्ती वाढवण्यात महत्वाची भूमिका बजावू शकतात.

कोरोनापासून लहान मुलांना वाचवण्यासाठी धडपड; काय आहे सरकारचा प्लॅन?

प्रश्न- मुले घरीच असताना सक्रिय आणि तंदुरुस्त राहण्यासाठी पालकांनी काय करावे?

उत्तर – मुलांनी संतुलित आहार, दररोज व्यायाम आणि सकारात्मक राहावे. हे वेळापत्रक फॉलो करण्यासाठी सर्वात्तम असे आहे. या वेळापत्रकात मुलांचे रोजचे काम आणि वयानुसार योग्य घरगुती कामे समाविष्ट असावीत. घरात पालकांना कामांमध्ये मदत करणे अनेकदा मुलांना आनंददायी असते. यात स्वयंपाक करणे, झाडांना पाणी देणे, भावंडांसोबत खेळणे याचा समावेश असावा. घरातील एखाद्या कामात मुलांनी छोटेसे का होईना पण योगदान दिले तर त्यांचे जरुर कौतुक करावे. आपल्या घरात मुलांसाठी थोडासा मजेदार कोपरा ठेवा. या भागात मुले रंगकाम करु शकतात, कोडे सोडवू शकतात, पुस्तके वाचू शकतात किंवा अगदी नृत्य देखील करु शकतात. क्लिन अप टाईम या मार्गाचा अवलंब करुन कुटुंबाने एकत्रित येऊन संगीत ऐकत घरातील साफसफाई करावी.

राष्ट्रीय वेळापत्रकानुसार सर्व लसी वेळेत घेणं गरजेचं आहे. कारण या लसी (Vaccine) तुमच्या मुलांचे संसर्गापासून संरक्षण करतात. यामुळे विशेषतः पावसाळ्यात आजारांची भीती कमी होईल. मात्र यापैकी कोणतिही बाब कोरोना संसर्गास प्रतिबंध करु शकत नाही.

First published:

Tags: Coronavirus, School children