नवी दिल्ली, 21 मे : देश सध्या कोरोनाच्यादुसऱ्या लाटेचा (Corona Second Wave) सामना करत आहे. त्यातच येत्या काही महिन्यांमध्ये कोरोनाची तिसरी लाट (Corona Third Wave) देखील येऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ही लाट नेमकी केव्हा येणार, ती किती जीवघेणी असेल याबाबत काही ठोस माहिती नाही, परंतु या लाटेचा फटका प्रामुख्याने लहान मुलं आणि तरुणांना बसू शकतो, असं मानले जात आहे. त्यामुळे येता काळ या वयोगटासाठी अधिक कठीण असू शकतो, असं मानायला काहीच हरकत नाही. मागील काही आठवड्यांपासून तज्ज्ञ तिसरी लाट येण्याचा अंदाज व्यक्त करत आहेत. मागील साथीच्या आजारांच्या आधारे अनुमान लावायचं झाल्यास सद्य लाट ओसरल्यानंतर 3 ते 5 महिन्यात पुढील लाट येऊ शकते. सध्या भारतात दुसऱ्या लाटेचा कहर सुरू आहे. त्यानुसार पुढील लाट ही नोव्हेंबर ते डिसेंबर दरम्यान येऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. महासाथीच्या (Pandemic) कालावधीत येणाऱ्या लाटांचा अर्थ काय असतो? याची निश्चित अशी कोणतीही व्याख्या नाही. तथापि साथीच्या आजारांदरम्यान विशिष्ट काळातील संक्रमणाची वाढ किंवा घट यास आलेखाच्या परिभाषेत लाट (Wave) म्हणून संबोधलं जातं किंवा समजलं जातं. ही वाढ ग्रोथ कर्व्हसारखी (Growth Curve) दिसते. महासाथ ही अनेक वर्षांतून एकदा येते. परंतु अनेक प्रकारचे संसर्ग एका विशिष्ट मोसमात हल्ला करतात. तेव्हा त्यांची तीव्रता जाणून घेण्यासाठी देखील लाट किंवा वेव्ह टर्मचा (Wave Term) उपयोग केला जातो. हे संसर्ग अचानक येतात, वाढतात आणि गायब होतात. परंतु एका विशिष्ट कालावधीत हे संसर्ग पुन्हा सक्रिय होतात. यालाच लाट म्हणतात. भौगोलिक स्थितीनुसार लाटेचा आलेख कोरोनाबाबत सातत्याने लाट या शब्दाचा प्रयोग होताना दिसतो. हा आजार मागील दीड वर्षांपासून जगातील अनेक देशांमध्ये पसरल्याचं दिसून येतं. मात्र भौगोलिक स्थितीनुसार (Geographical Situation) या आजाराच्या तीव्रतेत वैविध्य दिसून आलं आहे. काही देशात संसर्गाचं प्रमाण नगण्य तर काही देशांमध्ये याचा आलेख खूपच वर सरकल्याचं दिसून येत आहे. जसं की आपल्या देशात सध्या संसर्ग मोठ्या प्रमाणात आहे तर युरोपियन देशांमध्ये (European Countries) सध्या संसर्गाचं प्रमाण आटोक्यात आलं आहे. हे वाचा - खळबळजनक! कोरोनापाठोपाठ Mucormycosis सुद्धा लहान मुलांपर्यंत पोहोचला भारताचा विचार केला तर काही राज्यांमध्ये कोरोना संसर्गाचा आलेख उंचावलेला आहे तर काही राज्यांमध्ये त्याचा वेग कमी झाला आहे. ज्या ठिकाणी संसर्गाचं प्रमाण जास्त आहे, याचा अर्थ असा नव्हे की ही स्थिती कायम राहिल. हेच सूत्र कमी संसर्ग असलेल्या ठिकाणांसाठी लागू आहे. हा चढ-उतार एका विशिष्ट कालावधीपुरता असतो. याचा पॅटर्न सातत्याने बदलत असतो. संसर्गाचे सर्वोच्च शिखर म्हणजे काय**?** महासाथ कालावधीत अजून एक शब्द कायम चर्चेत राहिला तो म्हणजे सर्वोच्च स्थिती किंवा पीक (Peak Point). जेव्हा संसर्ग वेगात होत असतो, तो हा कालावधी म्हणता येईल. याला हिंदीत शीर्ष असंही म्हणतात. या कालावधीत रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. जर वेळेत रुग्णालय आणि उपचारांची व्यवस्था झाली नाही तर स्थिती हाताबाहेर जाते. ही सर्वोच्च स्थिती निवळल्यावर रुग्णसंख्या घटू लागते. लाटेचं धोका काय? तिसऱ्या लाटेसंदर्भात बोलायचं झालं तर दुसऱ्या लाटेपेक्षाही ही लाट अधिक गंभीर असेल असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. मात्र याला कोणतंही ठोस प्रमाण नाही. सर्वसामान्यपणे प्रत्येक लाटेनंतर विषाणूची (Virus) ताकद कमजोर पडत जाते. हे म्हणजे असं असतं की प्रथमच विषाणू आल्यानंतर संसर्ग नव्याने होतो. कोणत्याही व्यक्तीमध्ये याला विरोध करू शकणारी रोगप्रतिकारक शक्ती नसते, तसंच उपचार पद्धती देखील. त्यामुळे विषाणूचा संसर्ग वेगाने पसरतो आणि या संसर्गात जर एखादी व्यक्ती सापडली तर त्यांच्यावर गंभीर किंवा सौम्य परिणाम होतो. हे वाचा - VIDEO: करून दाखवलं! मराठवाड्यातल्या या गावानं कोरोना रुग्णाला पाहिलेलंच नाही! पहिल्या लाटेत संक्रमित झालेल्या लोकांमध्ये अँटीबॉडी (Antibody) तयार झालेल्या असल्याने दुसऱ्या लाटेत या लोकांवर फारसा परिणाम होत नाही. भारतामध्ये दिसली उलट स्थिती आपल्याकडे लाट पहिल्यांदा मोठी आणि नंतर कमजोर पडण्याच्या अनुमानाचा उलटा परिणाम दिसून आला. पहिल्यांदा ऑगस्ट 2020 मध्ये कोरोनाची लाट आली. मात्र त्या कालावधीत सध्याच्या तुलनेत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या फारशी नव्हती. या लाटेत मागील लाटेच्या तुलनेत पॉझिटिव्हीटी रेट (Positivity Rate) चौपट झाल्याचं दिसून आलं. पहिल्या लाटेत संक्रमित झालेले लोक या लाटेत देखील संक्रमित झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे तिसरी लाट यापेक्षा गंभीर असू शकते, या अंदाजामुळे तज्ज्ञ मंडळी चिंतेत आहेत. तिसरी लाट येणार हे नक्की आहे का**?** याबाबत मतभिन्नता आहे. काही तज्ज्ञ ही लाट येणारच असं सांगत आहेत तर काही तज्ज्ञ ही लाट रोखली जाऊ शकते, असं सांगत आहेत. जर लोकांनी प्रतिबंधात्मक नियमांचं कठोर पालन केलं तर ही लाट टाळता येऊ शकते आणि जरी तिसरी लाट आली तरी यामुळे तिचा कालावधी आणि तीव्रता खूपच कमी असेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.