मराठी बातम्या /बातम्या /explainer /कोणती Corona Vaccine सर्वात प्रभावी? पाहा प्रत्येक कोरोना लशीचा Efficacy Rate

कोणती Corona Vaccine सर्वात प्रभावी? पाहा प्रत्येक कोरोना लशीचा Efficacy Rate

जे लोक लशीचा पहिला डोस घेतील, त्यांना अॅपल एअरपॉड्स, गिफ्ट कार्ड्स आणि स्कॉलरशिप दिली जाणार आहे. स्कॉलरशिप अशाच विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे, ज्यांनी लशीचा पहिला डोस घेतला आहे.

जे लोक लशीचा पहिला डोस घेतील, त्यांना अॅपल एअरपॉड्स, गिफ्ट कार्ड्स आणि स्कॉलरशिप दिली जाणार आहे. स्कॉलरशिप अशाच विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे, ज्यांनी लशीचा पहिला डोस घेतला आहे.

भारतासह जगभरातल्या अनेक कंपन्यांनी कोरोना लशी तयार केल्या आहेत.

  मुंबई, 06 जुलै : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने (Corona Pandemic Second Wave) जगभर खूप थैमान घातलं. गेल्या वर्षीपासून आतापर्यंत जगभरातल्या 183.01 दशलक्षहून अधिक नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तसंच जगभरात 3.96 दशलक्ष लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. आता मात्र दुसऱ्या लाटेचा जोर ओसरत असल्याचं चित्र जगाच्या अनेक भागांत दिसत आहे. याचं श्रेय भारतासह जगभरातल्या अनेक कंपन्यांनी विकसित केलेल्या कोरोना प्रतिबंधक लशींना (Anti Covid Vaccine) देता येऊ शकतं.

  लशींची इफिकसी व्हॅल्यू (Efficacy Value) म्हणजे लस किती प्रभावी आहे, हे सांगणारा आकडा. संसर्गाचा धोका तुलनात्मकदृष्ट्या किती कमी होऊ शकतो, हे इफिकसी व्हॅल्यूवरून कळतं. लस घेतल्यानंतर संसर्ग न होण्याची शक्यता किती टक्के आहे हे यावरून कळत नाही.

  एखाद्या लशीचा इफिकसी रेट (Efficacy Rate) काढण्यासाठी उत्पादक कंपनी निवडक व्यक्तींवर चाचण्या घेते. त्यात दोन गट पाडले जातात. एका गटाला लस दिली जाते, तर दुसऱ्या गटाला प्लासिबो (Placebo) दिली जाते. या दोन गटांतल्या किती व्यक्तींना कोविड-19चा संसर्ग झाला, याचा आढावा ठरावीक कालावधीनंतर घेतला जातो.

  या चाचण्यांमधून लक्षात आलेला लशींचा प्रभाव हे जागतिक स्थितीचं एक छोटंसं चित्र असतं. लस जेव्हा प्रत्यक्ष लोकसंख्येला दिली जाते, तेव्हा विषाणूची स्थिती बदललेली असू शकते किंवा वेगवेगळे व्हेरिएंट्सही तयार झालेले असू शकतात.

  हे वाचा - गंगा नदीत कोरोनाव्हायरस? मृतदेह आढळलेल्या पाण्याचा कोविड रिपोर्ट जारी

  जगभरात सध्या वापरात असलेल्या काही लशींच्या प्रभावाबद्दलची माहिती घेऊ या.

  फायझर-बायोएनटेक (Pfizer-BioNTech) : 11 डिसेंबर 2020 रोजी अमेरिकेच्या FDA कडून या कंपन्यांच्या लशीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी मिळाली. अशी मंजुरी मिळालेली ही जगातली पहिली लस ठरली. क्लिनिकल ट्रायल्सचा डेटा समाधानकारक असल्याने या लशीला मंजुरी देण्यात आली. मे महिन्याच्या सुरुवातीच्या कालखंडात प्रत्यक्ष लसीकरण कार्यक्रमातून नोंदवलेल्या निरीक्षणांनुसार, कोरोना विषाणूचा ब्रिटनमध्ये पहिल्यांदा आढळलेला अल्फा व्हेरिएंट आणि दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदा आढळलेला बीटा व्हेरिएंट यांच्या संसर्गामुळे गंभीर आजार होण्याची किंवा मृत्यू होण्याची शक्यता या लशीमुळे 95 टक्क्यांनी घटत असल्याचं आढळलं. या लशीचे दोन्ही डोस घेतलेले असल्यास भारतात पहिल्यांदा आढळलेल्या डेल्टा व्हेरिएंटपासून लक्षणयुक्त संसर्ग होण्याची शक्यता 88 टक्क्यांनी, तर हॉस्पिटलायझेशन करावं लागण्याची शक्यता 86 टक्क्यांनी घटत असल्याचं पब्लिक हेल्थ इंग्लंड या संस्थेच्या अभ्यासात आढळलं.

  मॉडर्ना (Moderna) : फायझर लशीनंतर एका आठवड्याभरातच मॉडर्ना कंपनीच्या लशीला अमेरिकेत आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळाली. फायझर-बायो-एन-टेकच्या लशीप्रमाणेच मॉडर्नाची लसही mRNA तत्त्वावरच विकसित करण्यात आली आहे. ही लसही कोरोनाचा लक्षणयुक्त आजार रोखण्यात 94.1 टक्के प्रभावी ठरत असल्याचं आढळलं. 65 वर्षं आणि त्यावरच्या वयोगटातल्या व्यक्तींमध्ये मात्र मॉडर्नाची लस केवळ 86 टक्के प्रभावी असल्याचं आढळलं. काही संशोधनांतून असे संकेत मिळाले आहेत, की मॉडर्नाची लस कोरोना विषाणूच्या अल्फा आणि बीटा व्हेरिएंट्सपासून संरक्षण देऊ शकते.

  हे वाचा - आश्चर्य! कोरोना लस घेतल्यानंतर डोळ्यांची दृष्टी परत आली; आजींनी केला दावा

  जॉन्सन अँड जॉन्सन (Johnson & Johnson) : 27 फेब्रुवारी 2021 रोजी FDAने एका वेगळ्या प्रकारच्या लशीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी दिली. ही लस विकसित केली होती जॉन्सन अँड जॉन्सन या कंपनीने. ही लस कॅरिअर किंवा व्हायरस व्हेक्टर या प्रकारची आहे. फायझर आणि मॉडर्ना या लशींच्या तुलनेत ही लस साठवणं सोपं आहे. ही लस साध्या फ्रीजच्या तापमानालाही साठवता येते. तसंच या लशीचा केवळ एकच डोस घेणं पुरेसं आहे. अमेरिकेत ही लस एकंदर 72 टक्के प्रभावी असल्याचं, तसंच गंभीर आजाराविरोधात 86 टक्के प्रभावी असल्याचं आढळलं. बीटा व्हेरिएंट पहिल्यांदा आढळलेल्या दक्षिण आफ्रिकेत ही लस एकंदर 64 टक्के प्रभावी असून, गंभीर आजाराविरोधात 82 टक्के प्रभावी असल्याचं FDA ने फेब्रुवारी महिन्यात उशिरा प्रसिद्ध केलेल्या विश्लेषणात म्हटलं आहे.

  अॅस्ट्राझेनेका (Astrazeneca) : निरुपद्रवी अॅडेनोव्हायरसमध्ये (Adenovirus) बदल करून अॅस्ट्राझेनेका कंपनीने कॅरिअर प्रकारची लस विकसित केली आहे. मार्च 2021 मध्ये या कंपनीने आपल्या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातल्या चाचण्यांच्या आधारे नवी आकडेवारी प्रसिद्ध केली. या लशीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर किमान 15 दिवस गेल्यानंतर कोरोना संसर्गामुळे लक्षणयुक्त आजार होण्याची शक्यता 76 टक्क्यांनी कमी होते, तसंच हॉस्पिटलायझेशन करावं लागण्याची शक्यता 100 टक्क्यांनी घटते. 65 वर्षांवरच्या नागरिकांमध्येही ही लस कोरोना संसर्ग होण्याचा धोका 85 टक्क्यांनी कमी करत असल्याचं कंपनीने म्हटलं आहे.

  हे वाचा - Good News! लवकरच Sputnik V लसही मोफत मिळणार; वाचा सरकारचा प्लॅन

  नोव्हाव्हॅक्स (Novavax) : ही लस कोविड-19वर प्रभावी आहेच; मात्र ब्रिटनमध्ये आढळलेल्या म्युटेशनवरही प्रभावी आहे. दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या म्युटेशनवरही ही लस काही प्रमाणात प्रभावी ठरल्याचं आढळलं आहे. 65 वर्षांवरच्या, अन्य आजार असलेल्या आणि सातत्याने संसर्गग्रस्तांशी संपर्क येणाऱ्या म्हणजेच संसर्गाची जोखीम जास्त असलेल्या गटातल्या नागरिकांमध्ये ही लस 91 टक्के प्रभावी असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. सध्याच्या काळजी करण्यासारख्या व्हेरिएंट्सवर ही लस 93 टक्के प्रभावी असून, काळजी करण्यासारख्या नसलेल्या व्हॅरिएंट्सवर ही लस 100 टक्के प्रभावी असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे.

  कोविशिल्ड (Covishield) : ऑक्सफर्ड विद्यापीठाने अॅस्ट्राझेनेका कंपनीसह कोविशिल्ड ही लस विकसित केली. पुण्यातल्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियात तिचं उत्पादन केलं जात आहे. या लशीच्या प्रभावाबद्दल व्यापक पातळीवर अभ्यास करण्यात आला. अॅस्ट्राझेनेका कंपनीच्या म्हणण्यानुसार, तिसऱ्या टप्प्यातल्या चाचण्यांच्या माहितीच्या प्राथमिक विश्लेषणानुसार ही लस लक्षणयुक्त कोविडविरोधात 76 टक्के प्रभावी आहे. दोन डोसमधलं अंतर 12 आठवडे किंवा त्याहून जास्त केलं, तर ही लस 82 टक्के प्रभावी ठरत असल्याचं आढळलं आहे.

  हे वाचा - कोरोना, म्युकरमायकोसिस, बोन डेथ आणि आता ग्रीन फंगस; मुंबईवर आजारांचं संकट

  स्पुतनिक व्ही (Sputnik V) : ही लस मॉस्कोच्या गॅमालिया रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमिऑलॉजी अँड मायक्रोबायोलॉजी या संस्थेने विकसित केली आहे. त्यासाठी रशियन डेव्हलपमेंट अँड इन्व्हेस्टमेंट फंडची (RDIF) मदत घेण्यात आली आहे. हैदराबादच्या डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीच्या (Dr. Reddy's Laboratory) माध्यमातून ही लस भारतात वितरित केली जात आहे. दी लॅन्सेटमध्ये प्रसिद्ध झालेल्या निष्कर्षानुसार, स्पुतनिक व्ही ही लस 91.6 टक्के प्रभावी असल्याचं तिसऱ्या टप्प्यातल्या चाचण्यांमध्ये आढळलं आहे.

  कोव्हॅक्सिन (Covaxin) : हैदराबादच्या भारत बायोटेक या कंपनीने विकसित केलेली कोव्हॅक्सिन ही लस लक्षणयुक्त कोविडविरोधात 77.8 टक्के प्रभावी असल्याचं आढळलं आहे. तसंच डेल्टा व्हॅरिएंटविरोधात 65.2 टक्के प्रभावी असल्याचंही आढळलं आहे. कंपनीने कोव्हॅक्सिन लशीच्या तिसऱ्या टप्प्यातल्या चाचण्यांमध्ये मिळालेल्या माहितीचं अंतिम विश्लेषण नुकतंच पूर्ण केल्याचं तीन जुलैला सांगण्यात आलं. गंभीर लक्षणयुक्त कोविडविरोधात ही लस 93.4 टक्के प्रभावी असल्याचं आढळलं आहे. केवळ 12 टक्के जणांना सर्वसाधारण साइड-इफेक्ट्स झाले, तर 0.5 टक्के लोकांना लस घेतल्यावर गंभीर साइड-इफेक्ट्स आढळले. ही लस लक्षण नसलेल्या कोविडविरोधात 63.6 टक्के प्रभावी असल्याचं सांगण्यात आलं आहे.

  सायनोफार्म (Sinopharm) : अलीकडेच आढळलेल्या डेल्टा व्हॅरिएंटच्या (Delta Variant) धोक्यापासून बचाव करण्यासाठी चीनपासून इंडोनेशिया, ब्राझील आदी देश चिनी लशींवर अवलंबून आहेत. डेल्टा व्हॅरिएंटमुळे गंभीर आजार होण्यापासून बचाव करण्यात सायनोफार्मसारख्या चिनी लशी काही प्रमाणात प्रभावी असल्याचं शास्त्रज्ञांना आढळलं आहे.

  First published:
  top videos

   Tags: Corona vaccine, Coronavirus