मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

आश्चर्य! कोरोना लस घेतल्यानंतर डोळ्यांची दृष्टी परत आली; 70 वर्षांच्या आजींचा दावा

आश्चर्य! कोरोना लस घेतल्यानंतर डोळ्यांची दृष्टी परत आली; 70 वर्षांच्या आजींचा दावा

9 वर्षांपूर्वी 70 वर्षांच्या महिलेने आपल्या दोन्ही डोळ्यांची दृष्टी गमावली होती.

9 वर्षांपूर्वी 70 वर्षांच्या महिलेने आपल्या दोन्ही डोळ्यांची दृष्टी गमावली होती.

9 वर्षांपूर्वी 70 वर्षांच्या महिलेने आपल्या दोन्ही डोळ्यांची दृष्टी गमावली होती.

  • Published by:  Priya Lad

वाशिम, 06 जुलै : एकिकडे अद्यापही काही लोक कोरोना लस (Corona vaccine) घेण्यासाठी घाबरत आहे. कोरोना लशीचे सौम्य दुष्परिणाम समोर येत असल्याने लस घेण्याची भीती वाटत आहे. तर दुसरीकडे मात्र कोरोना लशीचे काही आश्चर्यकारक असे परिणाम होत असल्याचा दावाही केला जातो आहे. नुकतंच राज्यातील एका आजींनी कोरोना लस घेतल्यानंतर आपली डोळ्यांची दृष्टी (Woman regain eyesight after corona vaccination) परत आल्याचा दावा केला आहे.

वाशिम जिल्ह्यातील 70 वर्षांच्या मथुराबाई बिडवे (Mathurabai Bidve) यांची 9 वर्षांपूर्वी आपली दृष्टी गमावली. त्यांना मोतीबिंदू झाला होता. त्यामुळे त्यांच्या दोन्ही डोळ्यांची दृष्टी गेली होती.

मथुराबाई मूळच्या जालना जिल्ह्यातील परतूर गावातील आहेत. आपल्या नातेवाईकांसोबत त्या रिसोडमध्ये राहत आहेत. 26 जून रोजी त्यांनी कोरोना लस घेतली. कोविशिल्डचा त्यांनी पहिला डोस घेतला आणि कमालच झाली. लस घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी आपल्याला दिसू लागलं आपली डोळ्यांची दृष्टी परत आली, असा दावा या महिलेने केला आहे.

हे वाचा - कोरोनामुक्त महिलेला बळावली अशी समस्या; पाहून डॉक्टरही झाले हैराण

झी न्यूजच्या रिपोर्टनुसार या महिलेनं आपल्या एका डोळ्याची तीस ते चाळीस टक्के दृष्टी परत आल्याचं म्हटलं आहे. पण कोरोना लशीमुळेच या महिलेला दिसू लागलं किंवा तिची दृष्टी परत आली, याला कोणताही वैज्ञानिक आधार किंवा पुरावा नाही आहे.

दरम्यान कोरोना लशीचा असा काही वेगळा परिणाम झाल्याचा दावा करणारी ही एकमेव महिला नाही. याआधीसुद्धा अनेकांनी असे दावे केले आहेत.

कोरोना लशीमुळे 10 वर्षांपूर्वीचा आजार 5 दिवसांत गायब

दरम्यान ही पहिलीच घटना नाही. याआधीसुद्धा मध्य प्रदेशच्या बडवानीतल्या एका शिक्षकाने कोरोना लस घेतल्यानंतर 10 वर्षांपासून असलेला आजार 5 दिवसांतच गायब झाल्याचा दावा केला होता. काशीराम कनोजे यांना गेल्या दहा वर्षापासून त्यांच्या पायांच्या तळव्यांना खाज येत होती, जळजळ होत होती. यामुळे त्यांना उठणं, बसणं, झोपणंही अशक्य झालं होतं. जमिनीवर ते पाय टेकवूच शकत नव्हते. शाळेतही ते खुर्चीवर पाय ठेवून बसायचे. दहा वर्षांत त्यांनी कित्येक डॉक्टर केले, कित्येक रुग्णालयं ते फिरले. पण काहीच फरक पडला नाही.

हे वाचा - कोरोनानंतर आता नवं संकट! Bone Death ची प्रकरणं वाढणार; मोदी सरकारने केलं सावध

आज तकच्या रिपोर्टनुसार, 11 एप्रिलला जामानिया उपआरोग्य केंद्रात त्यांनी कोरोना लशीचा पहिला डोस घेतला. त्याच्या पाच दिवसांनंतर त्याच्या पायांच्या तळव्यातील जळजळ कमी होऊ लागली आणि हळूहळू पूर्णपणे आराम मिळाला. आपण आपले जुने उपचार पूर्णपणे बंदच ठेवले होते. त्यामुळे कोरोना लशीमुळेच आपला हा आजार गायब झाला असा दावा त्यांनी केला आहे.

कोरोना लस घेतल्यानंतर पॅरालिसिस बरा झाला 

मध्य प्रदेशमध्ये (Madhya pradesh) एका व्यक्तीने कोरोना लस घेतली आणि अर्ध्या तासात त्याच्या पॅरालिसिस (Paralysis) झालेल्या शरीरात हालचाल झाल्याचं त्याने सांगितलं आहे. मध्य प्रदेशच्या राजगडमध्ये राहणारे अब्दुल मजीद खान. गेल्या सहा ते सात महिन्यांपासून पॅरालिसिसशी लढा देत होते. त्यांच्या चेहऱ्यावरही याचा परिणाम झाला होता. त्यांना नीट बोलता येत नव्हतं. त्यांनी किती तरी उपचार घेतले पण त्याचा त्यांना काही फायदा झाली. पण जे इतके उपचार करूनही शक्य झालं नाही ते एका कोरोना लशीने केलं. कोरोना लस घेतल्यानंतर त्यांचा पॅरालिसिस बरा झाला.

हे वाचा - पुढच्या महिन्यात धडकणार कोरोनाची तिसरी लाट; कसा कराल स्वतःचा बचाव?

टीव्ही 9 च्या रिपोर्टनुसार माजिद खान यांना कोविशिल्ड देण्यात आली होती. मजीद खान यांनी सांगितलं की, कोरोना लस घेतल्यानंतर फक्त अर्ध्या तासात त्यांचा आदार बरा झाला. लस घेतल्यानंतर लकवा मारलेल्या त्यांच्या शरीरात हालचाल होऊ लागली. बधीर झालेले अवयव काम करू लागले. कोरोना लस घेतल्यानंतर पॅरालिसीसपासून त्यांना 75  टक्के आराम मिळाला. पॅरालिसीसमुळे त्यांना बोलणंही शक्य होत नव्हतं. पण आता ते नीट बोलू शकत आहेत. बरं झाल्यानंतर त्यांनी सर्वांना कोरोना लस घेण्याचं आवाहन केलं आहे.

First published:

Tags: Corona vaccination, Corona vaccine