अनुज सिंह/ 06 जुलै, वाराणसी : कोरोनाव्हायरस (Coronavirus) पृष्ठभागाला स्पर्श केल्याने आणि हवेतूनही पसरतो हे सिद्ध झालं आहे. पण कोरोनाव्हायरस हा पाण्यातूनही (Coronavirus in water) पसरतो का, असा प्रश्न अद्यापही अनेकांच्या मनात आहे. दरम्यान कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गंगा नदीत मोठ्या प्रमाणात मृतदेह (Deadbody in ganga river) आढळले हे मृतदेह कोरोना संशयिताचे असल्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यामुळे पाण्यातून कोरोना पसरण्याची भीती (Coronavirus in Ganga river) अधिक वाटू लागली. आता याच गंगा नदीच्या पाण्याचा कोरोना रिपोर्ट (Gangajal corona report) आला आहे.
बीएचयूच्या शास्त्रज्ञांनी वाराणसीतीली 16 ठिकाणाहून गंगाजलाचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. मिळालेल्या माहितीनुसार पाणी जिथं स्थिर होतं तिथून हे नमुने घेण्यात आलेत. तसंच जेव्हा पाण्यात मृतदेह टाकले जात होते, तेव्हा हे नमुने घेतले होते. जेणेकरून गंगेच्या पाण्यात कोरोना तर आहे की नाही, याची तपासणी करता येईल.
लखनऊच्या बीरबल साहनी इन्स्टिट्यूट ऑफ पॅलिओ सायन्सला पाठवले होते. जवळपास महिनाभरानंतर तिथून या पाण्याचा रिपोर्ट आला आहे. गंगेच्या पाण्यात कोरोनाव्हायरस नाही आहे, हे पाणी पूर्णपणे शुद्ध आहे, असं या रिपोर्टमध्ये दिसून आलं आहे. गंगाजलातील औषधी गुणांमुळे हे शक्य झाल्याचं बीएचयूच्या शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे.
हे वाचा - कोरोना, म्युकरमायकोसिस, बोन डेथ आणि आता ग्रीन फंगस; मुंबईवर आजारांचं संकट
दरम्यान सध्या गंगेच्या पाण्यात शेवाळ जास्त दिसून येत आहे. याचा कोरोनाव्हायरसशी काही संबंध तर नाही ना, याचाही तपास आता शास्त्रज्ञ करत आहेत. गंगा नदीत जेव्हा मृतदेह आढळले तेव्हा हवेप्रमाणे पाण्यातूनही कोरोना पसरण्याचा धोका आहे का? याबाबत तज्ज्ञांनीही आपली मतं मांडली होती.
आयआयटी कानपूरचे प्राध्यापक आणि जलशक्ती मंत्रालयाच्या स्वच्छ गंगा मोहिमेशीही जोडलेले असलेले सतीश तरे म्हणाले होते, "या नद्यांमध्ये मृतदेह टाकणं तसं नवं नाही. पण गेल्या 10-15 वर्षांपासून हे प्रमाण कमी झालं आहे. गंगा आणि यमुना नद्या अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत आहे. देशात कोरोनाचं संकट असताना गंगा किंवा तिच्या उपनद्यांमध्ये असे मृतदेह टाकणं हे खूप चिंताजनक आहे. मृतदेह पाण्यात टाकल्याने नदीचं पाणी प्रदूषित होतं. जरी संशयित कोरोना रुग्णांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले असले तरी थोड्या फार प्रमाणात प्रदूषण झालंच असेल. पण यामुळे कोरोनाचा संसर्गाचा धोका नाही. जर हे पाण्याचा पुरवठा केला जात असेल तर ते पाणीपुरवठा प्रणालीमार्फत जाईल. पाण्यावर सामान्य प्रक्रिया केली जाते. जे लोक थेट नदीतून पाणी घेत असतील त्यांनी मात्र खबरदारी घेण्याची गरज आहे"
हे वाचा - पुढच्या महिन्यात धडकणार कोरोनाची तिसरी लाट; कसा कराल स्वतःचा बचाव?
तर मुख्य वैद्यकीय सल्लागार के. विजय राघवन यांनी सांगितलं, "पाण्याच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका नाही. एखादी व्यक्ती बोलली, दोन व्यक्तींचा एकमेकांशी अगदी जवळून संपर्क आला तर प्रामुख्याने संसर्ग होतं. जर कोरोनाग्रस्त व्यक्तीचे ड्रॉपलेट्स पृष्ठभागावर पडले आणि त्याच्याशी संपर्क आला तर कोरोना संसर्ग पसरतो. पण बहुधा हा हवेच्या माध्यमातूनच पसरतो. एअरफ्लोवरसुद्धा हे अवलंबून आहे. त्यामुळे काळजी करू नका, पाण्यातून कोरोना संसर्गाचा धोका नाही"
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Ganga river, Varanasi