मराठी बातम्या /बातम्या /explainer /

ट्रम्प अमेरिकेत धर्माला राष्ट्रवादाचे रूप देत आहेत का? कॅपिटल हिल घटनेमागे कोणाचा होता हात?

ट्रम्प अमेरिकेत धर्माला राष्ट्रवादाचे रूप देत आहेत का? कॅपिटल हिल घटनेमागे कोणाचा होता हात?

गेल्या वर्षी अमेरिकेच्या सत्ता हंस्तातरणावेळी कॅपिटल हिलवर (USA) झालेल्या घटनेमागे ख्रिश्चन राष्ट्रवादाची (Christian Nationalism) मोठी भूमिका असल्याचे समोर आलं आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी आपल्या मतदारांना या राष्ट्रवादी भावनेवर विश्वास ठेवण्यासाठी काम केलं होतं.

पुढे वाचा ...
  • Published by:  Rahul Punde

न्यूयॉर्क, 7 जानेवारी : जगातील अनेक देशांमध्ये राष्ट्रवादाची (Nationalism) भावना तेथील राजकारणावर वर्चस्व गाजवताना पाहायला मिळत आहे. गेल्या काही वर्षांत हे जास्त घडत आहे. अमेरिकेचे (USA) माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पही (Donald Trump) याच राष्ट्रवादाच्या जोरावर सत्तेवर आले. गेल्या वर्षी त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. पण, सत्तेचे हस्तांतरण होताना गालबोट लागले. कॅपिटल हिलच्या घटनेने अमेरिकन लोकशाहीला काळीमा फासला. ही घटना अमेरिकेच्या ख्रिश्चन राष्ट्रवादी चळवळीच्या प्रभावाशिवाय घडली नसावी असे मानले जाते.

त्या आंदोलनाची मुळं खोलवर रुजलेली

विश्लेषकांचे म्हणणे आहे की गेल्या वर्षी 6 जानेवारीच्या घटना ह्या ख्रिश्चन राष्ट्रवादाचे प्रतीक आहे. मात्र, 2020 च्या निवडणुका उलथवून टाकण्यासाठी आणि निवडून न आलेला उमेद्वाराला अध्यक्ष करण्यासाठी जे प्रयत्न झाले त्याची मुळं त्या दिवसाच्या घटनांपेक्षा खोलवर रुजलेली होती.

महत्त्वाचा धडा?

या घटनेच्या एका वर्षानंतर या आंदोलनाचे विश्लेषण करणे आवश्यक आहे. न्यूयॉर्क टाईम्समध्ये कॅथरीन स्टीवर्ट लिहितात, की या आंदोलनाने धडा शिकल्याचे दिसते. म्हणजेच, पुढच्या वेळी अजून जोर लावला तरअमेरिकन लोकशाहीचा इतिहास घडवण्यात ती पूर्णपणे यशस्वी होऊ शकते.

दाव्यांवर विश्वास ठेवण्यासाठी

2020 मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या सत्तेवर परत येण्यासाठी एक महत्त्वाची अट अशी होती की ते त्यांच्या मतदारांना निवडणुकीत हेराफेरी झाल्याचा विश्वास पटवून देऊ शकतील. निवडणुकीच्या पहिल्याच दिवसापासून ट्रम्प या कल्पनेवर वाद घालत होते. निवडणुकीतील हेराफेरीबाबत सामाजिक आणि उजव्या विचारसरणीच्या माध्यमांचे दावे आता समजण्यासारखे आहेत.

अनेक मतदारांसाठी पोस्टर्स, मेळावे आणि धार्मिक माध्यमे हे विश्वसनीय स्रोत आहेत. या माध्यमातून वेळोवेळी संदेश दिला गेला की माहितीचे बाहेरचे स्रोत विश्वासार्ह नाहीत. माहितीचा बबल तयार करणे, ज्यामध्ये सुधारणा होण्याची शक्यता नाही, ही ट्रम्पची पहिली आवश्यकता होती.

जगभरात 2022 वर्ष सुरू झालं असताना एक देश अजूनही 2013 मध्येच! काय आहे भानगड?

ख्रिश्चन राष्ट्रवादाची भावना

पुराणमतवादी ख्रिश्चन अमेरिकन समाज हा समाजातील सर्वात शोषित वर्ग आहे या भावनेतून ख्रिश्चन राष्ट्रवाद सुरू होतो. या चळवळीतील नेत्यांमध्ये असे ऐकायला मिळते की ते हुकूमशाहीविरुद्ध युद्ध लढत आहेत. बायबल लवकरच बहिष्कृत केले जाईल.

लोकशाहीच्या भावनेपेक्षा अधिक महत्त्वाचे

या सत्तापालटाच्या प्रयत्नात, लोकांच्या एका भागाला हे पटवून देणे आवश्यक होते की अमेरिकन सरकार लोकशाही स्वरूपाने नव्हे तर त्याच्या काही धार्मिक आणि सांस्कृतिक वारशावर चालते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या हल्ल्यातील नेत्यांनी स्वतःला देशभक्त म्हणून दाखवले. पण, सत्य तेव्हा समोर येतं जेव्हा आपल्याला समजतं की लोकांचे, लोकांनी आणि लोकांसाठी असलेल्या सरकार या कल्पनेपेक्षा त्यांचा रक्त, जमीन आणि धर्म यावर अधिक विश्वास आहे.

चिनी ड्रॅगनच्या कुरापतीमागे 5 बोटांची रणनीती काय आहे? काय आहेत भविष्यातील धोके?

जो बिडेन अध्यक्षपदी निवडून आल्यानंतर निवडणुकीतील हेराफेरीच्या आरोपांची मालिका संपली असे नाही. गेल्या वर्षभरात अनेक रिपब्लिकन आणि ट्रम्प समर्थकांनी ट्रम्प यांच्या दाव्यांचे समर्थन केले आहे. बर्‍याच प्रसंगी, ख्रिश्चन राष्ट्रवाद कॅपिटल हिल काळातील घटनांच्या समर्थनात मिसळताना दिसला आहे. पुढील निवडणुकीच्या तयारीच्या रणनीतीचा भाग म्हणून हे सर्व समोर आले तर नवल वाटायला नको.

First published:

Tags: America, Donald Trump