
नवीन वर्षाचा पहिला आठवडा संपत आला असून सेलिब्रेशनमध्ये गुंतलेले लोक आपापल्या रुटीनकडे परतत आहेत. मात्र, एकीकडे संपूर्ण जगात 2022 वर्ष सुरू झाले आहे, तर दुसरीकडे जगात एक असा देश आहे जिथे 2013 अजूनही सुरू आहे. आफ्रिकन देश इथिओपियाचे कॅलेंडर जगाच्या तुलनेत 7 वर्षे, 3 महिने मागे आहे. हा देश इतर अनेक बाबतीत खूप वेगळा आहे, जसे की वर्षाचे 12 ऐवजी 13 महिने असतात. वर्ष आणि वेळेनुसार हा देश जगापेक्षा इतका वेगळा का आहे ते जाणून घ्या.

85 लाखांहून अधिक लोकसंख्येसह आफ्रिकेतील दुसरा सर्वाधिक लोकसंख्येचा देश म्हणून इथिओपियासा ओळखलं जातं. या देशाचे स्वतःचे कॅलेंडर ग्रेगोरियन कॅलेंडरपेक्षा सुमारे साडेआठ वर्षे मागे आहे. येथे नवीन वर्ष 1 जानेवारी ऐवजी 11 सप्टेंबरला दर 13 महिन्यांनी साजरे केले जाते.

वास्तविक ग्रेगोरियन कॅलेंडर 1582 मध्ये सुरू झाले, त्यापूर्वी ज्युलियन कॅलेंडर वापरले जात होते. कॅथोलिक चर्चला मानणाऱ्या देशांनी नवीन कॅलेंडर स्वीकारले. मात्र, अनेक देश याला विरोध देखील करत होते. इथिओपिया त्यापैकी एक होता.

रोमन चर्चचा इथिओपियामध्ये प्रभाव राहिला. म्हणजे इथिओपियन ऑर्थोडॉक्स चर्चने येशू ख्रिस्ताचा जन्म 7 बीसीमध्ये झाला असे मानले. त्यानुसार कॅलेंडरची मोजणी सुरू झाली. त्याचवेळी, उर्वरित जगात येशू ख्रिस्ताचा जन्म इसवी सन 1 मध्ये सांगण्यात आला आहे. यामुळे इथिओपियाचे कॅलेंडर 2013 मध्येच अडकून पडले आहे, तर सर्व देशांनी 2022 ची सुरुवात केली आहे.

इथिओपियन कॅलेंडरमध्ये वर्षात 13 महिने असतात. यापैकी 12 महिन्यात 30 दिवस असतात. शेवटच्या महिन्याला Pagyume म्हणतात, ज्यामध्ये पाच किंवा सहा दिवस असतात. काही कारणास्तव वर्षाच्या गणनेत समाविष्ट नसलेल्या वर्षातील त्या दिवसांची आठवण करून हा महिना तयार करण्यात आला आहे.

इथिओपियातील लोक या कॅलेंडरमुळे आणि त्यांच्या विश्वासामुळे पर्यटकांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये याची काळजी घेतात. मात्र, हॉटेल बुकिंग आणि इतर अनेक मूलभूत सुविधांमध्ये कुठेतरी या कॅलेंडरमुळे इथिओपियाला जाणाऱ्या लोकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

या देशाची इतरही अनेक वैशिष्ट्ये आहेत. उदाहरणार्थ, इथिओपियामध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये सर्वाधिक स्थाने समाविष्ट आहेत. जगातील सर्वात खोल आणि सर्वात लांब गुहेप्रमाणे, जगातील सर्वात उष्ण ठिकाण आणि नैसर्गिक सौंदर्याचा खजिना आहे, ज्यामुळे जगभरातील पर्यटक येथे येतात. 11 सप्टेंबरला साजरे होणाऱ्या नवीन वर्षाचेही येथे खास आकर्षण आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.